AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Onion : ठिबक सिंचनातूनच बहरेल उन्हाळी कांदा, काय आहेत फायदे?

ऊसापाठोपाठ कांदा हेच सर्वात मोठे नगदी पीक आहे. शिवाय यंदा वर्षभर सरासरीच्या प्रमाणात दर राहिलेले आहेत. त्यामुळे उन्हाळी हंगामातील पोषक वातावरणात क्षेत्र वाढत आहे. मात्र, या दरम्यान शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचे नियोजन ठिबकद्वारे केले तर अधिकचा फायदा होणार आहे.

Onion : ठिबक सिंचनातूनच बहरेल उन्हाळी कांदा, काय आहेत फायदे?
काळाच्या ओघात कांदा लागवडीसाठी ठिबक सिंचनाचा वापर वाढलेला आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ होत आहे.
| Edited By: | Updated on: Jan 22, 2022 | 7:05 AM
Share

लातूर : केवळ नाशिक जिल्ह्यातच नाही तर सबंध राज्यात कांदा लागवडीवर शेतकऱ्यांचा भर आहे. अधिकच्या पावसामुळे खरिपासह रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले असले तरी यंदा प्रथमच (Summer Season) उन्हाळी हंगामाला या पावसाचा फायदा होत आहे. उन्हाळी हंगामात यंदा नव्यानेच सोयाबीनचे क्षेत्र वाढलेले आहे. खरिपात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी हा प्रयोग केला जात आहे तर दुसरीकडे उन्हाळी कांद्यावरही शेतकऱ्यांचा भर आहे. ऊसापाठोपाठ (Onion) कांदा हेच सर्वात मोठे नगदी पीक आहे. शिवाय यंदा वर्षभर सरासरीच्या प्रमाणात दर राहिलेले आहेत. त्यामुळे उन्हाळी हंगामातील पोषक वातावरणात क्षेत्र वाढत आहे. मात्र, या दरम्यान शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचे नियोजन (Drip) ठिबकद्वारे केले तर अधिकचा फायदा होणार आहे. यंदा मुबलक प्रमाणात पाणी आहे पण योग्य नियोजन केले तर उत्पादनात वाढ तर होणारच आहे पण शेतकऱ्यांचे परिश्रम कमी होणार आहे. त्यामुळे ठिबक सिंचनाचे नेमके फायदे काय याची माहिती घेणार आहोत.

बदलती लागवड पध्दती शेतकऱ्यांच्या फायद्याची

योग्य नियोजनाच्या माध्यमातून कमी कालावधीत अधिकचे उत्पादन ही शेतकऱ्यांची मानसिकता झाली आहे. शिवाय उपलब्ध साधनसामुग्री यामुळे हे शक्यही आहे. त्यामुळे कांदा पिकामध्ये खत, कीड-रोग याबरोबरच आता सिंचन व्यवस्थापनही रुजत आहे. यापूर्वी रिकाम्या क्षेत्रावर गादी वाफे न करता कांदा लागवड केली जात होती. पण आता गादी वाफे तयार करुनच लागवड केली जात आहे. यामध्ये ठिबकच्या माध्यमातून पाण्याची तर बचत होतेच पण शेतकऱ्यांना श्रमही कमीच पडते. ठिबक सिंचनामुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढत असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे. या संबंध पध्दतीमध्ये उत्पादनात वाढ होत असल्याने हा बदल शेतकरी स्वीकारत आहेत.

ठिबक सिंचनाचे काय आहेत फायदे?

ठिबक सिंचनामुळे पाण्याचा अपव्यय तर टळला जातोच पण पिकाला एकसारखे पाणी मिळते. यासह पिकाला विद्राव्य खते देता येत असल्याने लागवड क्षेत्र हे वाढवता येते. यामुळे एकरी उत्पादनात वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाठाद्वारे पाणी न सोडता ठिबक सिंचनाचाच वापर करणे गरजेचे आहे. शिवाय काळाच्या ओघात आता मजूर टंचाई तर आहेच पण अनियमित विद्युत पुरवठा होत असल्याने ही ठिबक सिंचनाची पध्दतच शेतकऱ्यांच्या कामी येणार आहे.

ठिबक सिंचनासाठी 80 टक्के अनुदान

सर्वप्रथम इच्छूकाला महाडीबीटी ऑनलाइन पोर्टल ओपन करायचे आहे. यामध्ये मुखपृष्ठावर अर्ज करा असा टॅग दिसेल त्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर सिंचन साधने सुविधा यावर क्लिक करुन समोरील बाबी निवडा हा पर्याय ओपन करायचा आहे. यामध्ये जिल्हा तालुका गाव आणि वैयक्तिक माहिती भरायची आहे. ही माहिती भरून झाल्यानंतर मुख्य घटक मध्ये सिंचन साधने आणि सुविधा हा घटक निवडायचा आहे.

*यानंतर दिलेली माहिती पूर्ण भरायचे आहे. ज्या पिकासाठी आपल्याला ठिबक सिंचन पाहिजे आहे त्याची माहिती देते भरावी लागणार आहे. यानंतर पूर्वसंमती शिवाय मी योजनेचा लाभ घेणार नाही अशी नोंद करावी लागणार आहे. यानंतर भरलेली माहिती सेव्ह करायचे आहे. यानंतर मुख्य मेनू वर जाऊन ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. मेनू वर आल्यानंतर सर्वात प्रथम ‘अर्ज सादर करा’ यावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला तालुका हे ऑप्शन दिसेल शिवाय तुम्ही ज्यासाठी अर्ज केला आहे त्या योजनेचे नाव देखील येते समोर येईल.

*यानंतर प्राथमिक प्रधान्य क्रमांक देऊन अटी-शर्ती त्या मान्य असल्याचे नमूद करावे लागणार आहे. यानंतर आपल्याला अर्ज सादर करावा लागणार आहे. पूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर 23 रुपये 60 पैसे आपल्या अकाउंट मधून भरावे लागणार आहेत याची प्रक्रिया ही ऑनलाइन करता येणार आहे.

संबंधित बातम्या :

KCC : पशूपालकांनो योजनेत लाभ घ्या अन् 3 लाखापर्यंतचे कर्ज मिळवा, अशी आहे प्रक्रिया अन् अंतिम मुदत

द्राक्ष बागायतदार संघाच्या निर्णयानंतरही शेतकऱ्यांची कोंडी- निर्यातदारांची मनामानी

फुल शेतीतून शेतकऱ्याच्या जीवनात दरवळेल उत्पन्नाचा सुगंध, जाणून घ्या लागवडीची योग्य पध्दत..!

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.