Sugarcane : उसाची तोड झाली, मग खोडव्याचे व्यवस्थापन करा अन् उत्पादन वाढवा

ऊस हे सर्वात मोठे नगदी पीक आहे. शिवाय या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. केवळ पश्चिम महाराष्ट्रच नाही तर मराठवाड्यात देखील क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. वाढत्या क्षेत्राबरोबर उत्पादन वाढणेही तेवढेच गरजेचे असून शेतकरी खोडवा उसाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे उत्पादनात घट होते. उसाचे उत्पादन घटण्यामागे अनेक कारणे असली तरी खोडवा पीकाचे कमी उत्पादन हे त्यामागेच मुख्य कारणही आहे.

Sugarcane : उसाची तोड झाली, मग खोडव्याचे व्यवस्थापन करा अन् उत्पादन वाढवा
खोडवा उसाचे उत्पादन घेताना योग्य ते व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 5:37 AM

लातूर : ऊस हे सर्वात मोठे (Cash Crop) नगदी पीक आहे. शिवाय या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. केवळ पश्चिम महाराष्ट्रच नाही तर मराठवाड्यात देखील क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. वाढत्या क्षेत्राबरोबर उत्पादन वाढणेही तेवढेच गरजेचे असून (Farmer) शेतकरी खोडवा उसाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे (Sugarcane Production) उत्पादनात घट होते. उसाचे उत्पादन घटण्यामागे अनेक कारणे असली तरी खोडवा पीकाचे कमी उत्पादन हे त्यामागेच मुख्य कारणही आहे. मात्र, खोडवा पिकाची जोपासणा आधुनिक तंत्राने केल्यास खोडव्याचे उत्पादन हे लागणीच्या उसाएवढेच मिळू शकते. योग्य व्यवस्थापन झाले तर त्यापेक्षाही अधिक. मात्र, त्यासाठी आत्याधुनिक पध्दतीचा अवलंब होणे गरजेचे आहे.

  1. हे आहेत खोडवा उसाचे फायदे 1) खोडवा उसाच्या पिकासाठी लागण उसाप्रमाणे पुर्वमशागत ही करावी लागत नाही. त्यामुळे लागण आणि मशागतीच्या खर्चात बचत होते. 2) खोडवा घेतल्यामुळे ऊस लागवडीसाठी लागणारे बेणे, बीजप्रक्रिया व ऊस लागवड इत्यादीबाबतीत खर्चात बचत होते. 3) विशेष म्हणजे खोडवा ऊस हा लागण उसापेक्षा एक ते दीड महिना लवकर येतो. 4) खोडवा पीक पाण्याचा ताण जास्त प्रमाणात सहन करते. त्यामुळे पाण्याचा ताण पडला तरी थेट उत्पादनावर त्याचा परिणाम होत नाही. 5) खोडवा पिकात पाचटाचा पूर्ण वापर करणे सहज शक्य होते. पाचटात आच्छादन म्हणूनही उपयोग होत असल्याने पाण्याची कमतरता असल्यास खोडवा पीक चांगले तग धरते.
  2. खोडव्याचे उत्पादन घेताना महत्वाच्या बाबी सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या ऊस लागणीच्या ऊसाचे उत्पादन हेक्टरी 100 टन आणि उसाची संख्या ही 1 लाखापेक्षा जास्त आहे अशाच उसाचा खोडवा ठेवावा. तर ऊस पीक हे विरळ झाल्यास ते क्षेत्र भरुन काढण्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशवीत तयार केलेले रोपे वापरावी लागणार आहेत. तर खोड किडींच्या नियंत्रणासाठी 35 टक्के एण्डोसल्फॉन प्रवाही 700 मि. ली. 500 लिटर पाण्यास मिसळून प्रति हेक्टरी फवारावे. तसेच ट्रायकोग्रामा या परोपजीवी किटकाचा खोड किडींच्या नियंत्रणासाठी उपयोग करावा.
  3. खोडवा ऊसात पाचटाचा वापर: ऊसाच्या पाचटामध्ये 0.42 ते 0.50 टक्के नत्र 0.17 ते 0.20 टक्के स्फुरद, 0.90 ते 1.00 टक्के पालाश आणि 32 ते 40 टक्के सेंद्रीय कर्ब असते. एक हेक्टर क्षेत्रामधून 7 ते 10 टन पाचट मिळते आणि त्यापासून 31.5 ते 50 किलो नत्र, आणि 3 ते 4 हजार किलो सेंद्रीय कर्ब जमिनीत घातले जाते. खोडव्यात पाचट, सुरवातीच्या कालावधीमध्ये आच्छादन म्हणून आणि नंतर याच पाचटाचे जागेवरच चांगले सेंद्रिय खत तयार करण्याचे नविन तंत्र विकसित केले आहे. त्यामुळे ऊसाची पाचट न जाळता खोडव्यामध्ये ह्या नैसर्गिक साधन संपत्तीचा पुन्हा वापर करून खोडवा व्यवस्थापन करणे सहज शक्य आहे. त्यामुळे खोडव्याचे उत्पादनात वाढ तर होतेच शिवाय जमिनीची सर्व प्रकारची सुपिकता व उत्पादकता देखील वाढते.
  4. रासायनिक खतांचा वापर: खोडवा उसाला पाणी दिल्यानंतर 3 ते 4 दिवसांनी वापसा आल्यावर रासायनिक खतांची पहिली मात्रा पहारीच्या सहाय्याने द्यावी. खोडव्यासाठी रासायनिक खतांची मात्रा दोन समान हप्त्यात द्यावी. पहिली खत मात्रा खोडवा ठेवल्यानंतर 15 दिवसांच्या आतच पूर्ण करावी व दुसरी खतमात्रा 130 दिवसांनी द्यावी लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Onion Market : ‘नाफेड’ कडूनच शेतकऱ्यांची फसवणूक, कांदा खरेदीच्या नावाखाली असा दुजाभाव

Akola : मका पिकाने शेतकऱ्यांना भरभरुन दिले, मुख्य पिकांतून नाहीपण हंगामी पिकातून शेतकऱ्यांचे साधले

Thane: माणुसकी जिवंत आहे, हे सिद्ध करणारी घटना! गरोदर असलेल्या जखमी गाईचं संवेदनशील कुटुंबाकडून बाळंतपण

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.