अखेर शेवट गोड : अवकाळीमुळे नुकसान तर आता थंडीमुळे आंबा पाठोपाठ काजूही बहरला

वाढत्या थंडीचा फायदा हा फळबागांचा मोहर वाढण्यासाठी होणार असल्याचा अंदाज कृषी तंज्ञांनी वर्तवलेला होता. अखेर तो खरा होताना दिसत आहे. कारण कोकणात आंब्याचा दुसऱ्या टप्प्यातील मोहर चांगला लागला असून या वातावरणाचा काजू पिकालाही चांगलाच फायदा होत आहे. त्यामुळे फळधारणा होणार असून उत्पादनातही मोठा फरक पडणार आहे.

अखेर शेवट गोड : अवकाळीमुळे नुकसान तर आता थंडीमुळे आंबा पाठोपाठ काजूही बहरला
यंदा वातावरणातील बदलामुळे काजू बीचे उत्पादन घटले आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 11:31 AM

सिंधुदुर्ग : (cold swells the nutritious environment) वाढत्या थंडीचा फायदा हा (Orchards) फळबागांचा मोहर वाढण्यासाठी होणार असल्याचा अंदाज कृषी तंज्ञांनी वर्तवलेला होता. अखेर तो खरा होताना दिसत आहे. कारण कोकणात आंब्याचा दुसऱ्या टप्प्यातील मोहर चांगला लागला असून या वातावरणाचा काजू पिकालाही चांगलाच फायदा होत आहे. त्यामुळे (fruit bearing) फळधारणा होणार असून उत्पादनातही मोठा फरक पडणार आहे. मध्यंतरी अवकाळी, अतिवृष्टीनंतर फळबागांचे न भरुन निघणारे नुकसान झाले होते. आता केवळ थंडीवरच सर्वकाही अवलंबून होते. मात्र, गेल्या 15 दिवसांपासून पडलेल्या थंडीचा परिणाम केवळ फळबागांवरच झाला असे नाही तर रब्बी हंगामातील पिकांनाही झालेला आहे.

अवकाळी अन् ढगाळ वातावरणाचा असा झाला परिणाम

अधिकच्या उत्पादनासाठी फळबागांचे व्यवस्थापन हे दरवर्षी चांगलेच केले जाते. यंदा मात्र, निसर्गाचा लहरीपणाचा फटका बागायतदारांच्या व्यवस्थापनाला अडसर ठरला. अन्यथा यंदा पोषक वातावरणामुळे विक्रमी उत्पादन होईल असा अंदाज शेकतरी वर्तवत होते. मात्र, ऑक्टोंबर महिन्यात परतीच्या पावसामुळे फळबागांचे नुकसान झाले होते. त्यानंतरही काजू बागा बहरु लागल्या होत्या पण पुन्हा डिसेंबरमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. सलग 20 दिवस पावसामध्ये सातत्य राहिल्याने फळधारणा सोडूनच द्या पण मोहर तरी लागतो की नाही अशी आवस्था झाली होती. हे कमी म्हणून की काय ढगाळ वातावरणामुळे फळबागांवर रोगराई अन् किडीचा प्रादुर्भाव वाढलेला होता. त्यामुळे उत्पादनाची आशा बागायत शेतकऱ्यांनी सोडून दिली होती.

फळधारणेसाठी पोषक वातावरण

पहिल्या टप्प्यात फळबागांचे नुकसानच झाले आहे. पण आता दुसऱ्या टप्प्यातील वातावरण फळधारणेसाठी पोषक आहे. यापूर्वी आंबा बागांना मोहर लागला होता. आता थंडीचा फायदा हा काजू पिकाला होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रावर काजूचे उत्पादन घेतले जाते. मात्र, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत असल्याने शेतकरी पीकपध्दत बदल्याण्याच्या विचारात आहे. यंदा सर्वकाही नुकसानीचे होत असताना वाढत्या थंडीमुळे दिलासा मिळालेला आहे.

थंडीमुळे रब्बी हंगामातील पिकांचीही वाढ जोमात

फळांमध्ये केळी बागा सोडता थंडी ही सर्वच पिकांसाठी पोषक मानली जात आहे. आंबा, काजूच्या तर फळधारणेसाठी पोषक थंडी ठरत आहे. तर दुसरीकडे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, मका या पिकांच्या वाढीसाठी देखील हे वातावरण पोषक ठरत आहे. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते. हरभऱ्यावर घाटीअळीचा प्रादुर्भाव वाढला होता. मात्र, औषध फवारणीनंतर पुन्हा ही पिके बहरत आहेत. यातच राज्यात थंडीचा लाट असल्याने त्याचा फायदा पिकांची वाढ होण्यासाठी होत आहे.

संबंधित बातम्या :

Sangli Market : राज्य सरकारच्या निर्बंधानंतरही हळद अधिकच पिवळी, सांगली बाजारपेठेत सर्वोच्च दर

तूर पीक : हमीभावाने खरेदी, मात्र, संपूर्ण तुरीच्या खरेदीची हमी नाही, वाचा सविस्तर

हिवाळ्यात ब्रॉयलर कोंबड्यांची ‘अशी’ घ्या काळजी मगच मिळेल कमी कालावधीत अधिकचे उत्पन्न

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.