‘या’ ठिकाणी शेणाच्या बदल्यात गॅस सिलेंडर, काय आहे कारण? वाचा…

शेण देऊन थेट गॅस सिलिंडर मिळाला तर प्रत्येकालाच आनंद होईल. मात्र, हा आनंद सध्या भारतातील एका ठिकाणी लोक घेत आहेत.

'या' ठिकाणी शेणाच्या बदल्यात गॅस सिलेंडर, काय आहे कारण? वाचा...


नवी दिल्ली : ‘तुम मुझे गोबर दो, मैं तुम्हें गॅस सिलेंडर दूंगा’, असं कुणी म्हटलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. कारण शेणाचा उपयोग खत आणि गोवऱ्यांच्या रुपात इंधन म्हणून होतो. मात्र, शेण देऊन थेट गॅस सिलिंडर मिळाला तर प्रत्येकालाच आनंद होईल. मात्र, हा आनंद सध्या भारतातील एका ठिकाणी लोक घेत आहेत. डॉक्टर राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठाने (समस्तीपूर पूसा) हा अनोखा प्रयोग केलाय. या प्रयोगात गावातील शेतकऱ्यांकडून शेण घेऊन त्यांना गॅस सिलिंडर भरुन दिला जातोय. विद्यापीठाने ही योजना प्राथमिक स्तरावर मधुबनी जिल्ह्यातील सुखेत गावात केलीय. लोकांचा प्रतिसाद पाहता ही योजना आजूबाजूच्या आणखी गावांमध्ये सुरू करण्याचाही हे विद्यापीठ विचार करतंय (Initiative of Gas cylinder for cow dunk in a village of India compost).

प्रतिदिवस 20 ते 25 किलो शेण देणं आवश्यक

दर दिवशी एक गाडी शेतकऱ्यांच्या घरी जाते. या गाडीत दररोज त्यांच्याकडून प्रत्येकी 20 ते 25 किलो शेण आणि घरातील इतर कचरा गोळा केला जातो. याशिवाय गवत आणि जलफुटी देखील जमा केल्या जातात. पूर आल्यानं सध्या पाण्यात जलफुटीची वेगाने वाढ होतेय. यामुळे शेतकऱ्यांना त्याची अडचणच होते. 60 टक्के शेण आणि 40 टक्के वाया गेलेले पदार्थ एकत्र करुन कंपोस्ट तयार केले जाते. या गावातील शेणापासून 500 टन कंपोस्ट खत तयार करण्याच योजना आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात केवळ 250 टन कंपोस्ट खत बनवण्याचं नियोजन आहे.

या गावात स्मोकलेस रूरल सॅनिटायजेशन प्रोग्राम अंतर्गत आतापर्यंत विद्यापीठाने 28 कुटुंबांना सिलेंडर दिले आहेत. या योजनेमुळे आतापर्यंत एकूण 56 कुटुंबांना भेटलो. या गावात केवळ 104 कुटुंबं आहेत. या सर्वांचे मिळून 500 टन गांडुळ खत तयार होतं. यामुळे वर्षाला लाखो रुपयांची बचत होते. सोबतच शेतकऱ्यांना सेंद्रीय खत मिळून रोजगारही तयार होईल. 5 वर्षानंतर विद्यापीठ हा प्रकल्प गावांकडेच सुपुर्द करणार आहे.

हेही वाचा :

PM Kisan: बनावट शेतकऱ्यांनी सावधान, गावा-गावात चौकशी सुरू, कुणाचा फायदा आणि कुणाचं नुकसान?

जळगावात अजूनही दमदार पावसाची प्रतिक्षा, खरीप हंगामातील पेरणी रखडली

शेतकरी, त्याचं कुटुंब शेतात राबल्यानं कोरोना संकटात अन्न धान्य पुरलं, दादा भुसेंचं वक्तव्य, पुरेशा पावसानंतर पेरणीचं आवाहन

व्हिडीओ पाहा :

Initiative of Gas cylinder for cow dunk in a village of India compost

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI