‘झिरो बजेट शेती’चे जनक सुभाष पाळेकर आहेत तरी कोण?

| Updated on: Dec 16, 2021 | 11:30 AM

काळाच्या ओघात शेती उत्पादनात वाढ झाली असली तरी शेतीमालाचा दर्जा हा खालावलेला आहे. शिवाय रासायनिक खतांच्या माऱ्याने जमिनीचे आरोग्य हे धोक्यात आले असून पुन्हा नैसर्गिक शेतीची संकल्पना समोर येऊ लागली आहे. नैसर्गिक शेती म्हणजेच झिरो बजेट शेतीची मूळ संकल्पना मांडणारे आणि अस्तित्वात आणणारे सुभाष पाळेकर हे महाराष्ट्रातले असून त्यांची हीच संकल्पना राबवण्याचे अवाहन आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

झिरो बजेट शेतीचे जनक सुभाष पाळेकर आहेत तरी कोण?
नैसर्गिक शेतीचे जनक सुभाष पाळेकर,
Follow us on

मुंबई : काळाच्या ओघात शेती उत्पादनात वाढ झाली असली तरी शेतीमालाचा दर्जा हा खालावलेला आहे. शिवाय रासायनिक खतांच्या वापराने जमिनीचे आरोग्य हे धोक्यात आले असून पुन्हा नैसर्गिक शेतीची संकल्पना समोर येऊ लागली आहे. नैसर्गिक शेती म्हणजेच झिरो बजेट शेतीची मूळ संकल्पना मांडणारे आणि अस्तित्वात आणणारे (Subhash Palekar) सुभाष पाळेकर हे महाराष्ट्रातले असून त्यांची हीच संकल्पना राबवण्याचे अवाहन आता (PM Narendra MOdi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. विदर्भातील बेलोरा गावचे सुभाष पाळेकर यांच्या 30 वर्षाच्या तपश्चार्या नंतर हे झिरो बजेट शेतीची संकल्पना प्रत्यक्षात उतरलेली आहे. पाळेकर यांनी नागपूर येथील कृषी विद्यापीठात Mscकरीत असतानाच शिक्षण सोडून थेट शेतीमधल्या प्रयोगाला सुरवात केली होती.

महाविद्यालयीन काळात अदिवासी नागरिकांना मदत

सुभाष पाळेकर यांचे वडीलही शेतकरीच होते. माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पाळेकर यांनी नागपूर येथील कृषी विद्यापीठात प्रवेश घेतला होता. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सातपुडा भागातील अदिवासी नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे कामही त्यांनी केले आहे. आदिवासी भागात काम करत असताना त्यांनी आपली जीवनशैली आणि सामाजिक रचना यांचा अभ्यास केला. जंगलातील निसर्गव्यवस्थेचा त्यांनी अभ्यास केला. 1986-88 या काळात त्यांनी जंगली वनस्पतींचाही अभ्यास केला.

कृषी संदर्भातील लेखही प्रकाशित

महाविद्यालयात रासायनिक शेतीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कृषी संदर्भातील लेखही वेगवेगळ्या माध्यमात प्रकाशित केले आहेत. 1996-98 या काळात पुणे येथील प्रसिद्ध ‘बळीराजा’ मराठी कृषी पत्रिका यांच्या संपादकीय यामध्ये लिखान केले आहे. त्यांनी मराठीमध्ये 20, इंग्रजीत 4 आणि शेती विषयी हिंदीमध्ये 3 पुस्तके लिहिली. मराठी भाषेमध्ये लिहिलेली पुस्तके सर्व भारतीय भाषांमध्ये संभाषित करण्यात आली आहेत. त्यांच्या लिखानाच्या माध्यमातून राजकारणी, शेतकरी यांच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या खऱ्या समस्याकडे लक्ष वेधले गेले होते.

कृषी क्षेत्रातील कार्यामुळे वेगवेगळे पुरस्कार

सुभाष पाळेकर यांचे कृषी क्षेत्रातील योगदान पाहता त्यांना सन 2016 मध्ये पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. यापूर्वी कर्नाटक राज्याने 2005 मध्ये श्री श्री मरिघ राजेंद्र मठ, चित्रदुर्ग यांनी क्रांतिकारक संत बसवराज यांच्या नावाने “बसवश्री” पुरस्कार प्रदान केला होता. 2006 मध्ये कर्नाटक राज्य रयत संघ, कर्नाटक यांनीही त्यांना किसान संघ भारत कौशाक रत्न पुरस्काराने सन्मानित केले होते.

संबंधित बातम्या :

पंतप्रधान ठिबक सिंचन योजनेत नवी घोषणा, कुणाला मिळणार लाभ, काय आहेत फायदे ? जाणून घ्या

आता शेतकऱ्यांची चिंता वाढली, सर्वकाही पोषक असतानाही सोयाबीनचे दर…

दुग्धोत्पादन वाढीसाठी देशी गायींवर कृत्रिम गर्भधारणा, राज्यात संकरीत गायींची संख्या वाढली