अहमदनगर : अचानक बाजारात टोमॅटोचे दर कमालीचे घसरल्यानं राज्यभरात शेतकऱ्यांचा संताप पाहायला मिळतोय. बाजारातील भाव इतके कोसळले आहेत की त्याचा उत्पादन खर्चही निघणं कठिण झालंय. त्यामुळेच अखिल भारतीय किसान सभेने सरकारला धारेवर धरलंय. सरकारने राजकारण थांबवून टॉमेटो उत्पादकांना दिलासा द्यावा. अन्यथा सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्याही दारात टोमॅटो ओतून आंदोलन करू, असा इशारा किसान सभेचे नेते अजित नवले यांनी दिलाय.