शेतीमधल्या नव्या वाटा, गवतापासून सीएनजी गॅसची निर्मिती, प्रकल्प नेमका काय?

विशिष्ट प्रकारच्या गवतापासून सीएनजी - पीएनजी गॅस आणि सेंद्रिय खताची निर्मिती करण्यात येणार आहे. CNG PNG gas project

शेतीमधल्या नव्या वाटा, गवतापासून सीएनजी गॅसची निर्मिती, प्रकल्प नेमका काय?
लातूरमध्ये गवतापासून गॅस निर्मिती होणार
Follow us
| Updated on: May 15, 2021 | 1:38 PM

लातूर: लातूर जिल्ह्यातल्या शिरूर-अनंतपाळ इथं सेंद्रिय खत आणि सीएनजी गॅस निर्मितीच्या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं आहे. हा प्रकल्प ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. विशिष्ट प्रकारच्या गवतापासून सीएनजी – पीएनजी गॅस आणि सेंद्रिय खताची निर्मिती करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवलिंग शिवाचार्य महाराज प्रोड्यसर कंपनीचे चेअरमन दत्ता शिवणे यांनी दिली. (Latur Shivlinga Shivacharya Maharaj Producer company laying foundation of CNG PNG gas project made from grass)

शिवलिंग शिवाचार्य महाराज प्रोड्युसर कंपनीने हा प्रकल्प उभा करण्यासाठी म्हणून दहा हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांची सभासद म्हणून नोंदणी केली आहे . या शेतकऱ्यांना नेपिअर ग्रासची लागवड करायला प्रोत्साहन देऊन त्याची खरेदी केली जाणार आहे .

पारंपारिक नगदी पिकांना पर्याय ठरणार

सेंद्रिख खत आणि सीएनजी आणि पीएनजी गॅस निर्मिती ही नेपिअर ग्रास या गवतापासून केली जाणार आहे. यामुळे परिसरातील ऊस आणि सोयाबीन शेतीच्या मागे लागलेल्या शेतकऱ्यांना नेपिअर ग्रासचे उत्पादन पर्याय ठरू शकते.

प्रकल्प उभारण्यासाठी 60 कोटींचा खर्च

नेपिअर गवतापासून सेंद्रिय खत आणि सीएनजी, पीएनजी गॅस निर्मितासाठी मोठा खर्च येणार आहे. साधरणतः हा प्रकल्प उभा करण्यासाठी 60 कोटींचा खर्च येणार आहे. शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला उभा करण्यासाठी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे दहा हजार शेतकऱ्यांनी सभासद म्हणून नोंदणी केली आहे, असं शिवलिंग शिवाचार्य महाराज प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन दत्ता शिवणे यांनी सांगितलं.

ग्रामीण भागाला काय फायदा?

नेपिअर सुपर ग्रासचं बियाणं शेतकऱ्यांना दिलं जाईल. नेपिअर ग्रास शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येईल. शेतकऱ्यांना यासाठी एका टनाला 1 हजार भाव दिला जाईल. शेतकऱ्यांना एकरी वार्षिक 1 ते 2 लाख रुपयांचं उत्पन्न होईल. या कारखान्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झालेली दिसेल, असं मत दत्ता शिवणे यांनी व्यक्त केलं.

शेतकऱ्यांनी काय करायचे?

शिवलिंग शिवाचार्य महाराज प्रोड्युसर कंपनीचं सभासदत्व स्वीकारलेल्या शेतकऱ्यांना नेपिअर ग्रासचं बियाणं देण्यात येईल. शेतकऱ्यांनी त्याची पेरणी करायची. नेपिअर ग्रासची कापणी करुन कंपनीला दिले जाईल. कंपनी त्यावर प्रक्रिया करेल आणि त्यापासून सेंद्रिय खत, सीएनजी आणि पीएनजी गॅसची निर्मिती होईल.

संबंधित बातम्या:

LPG नंतर आता CNG आणि PNG गॅसही महागला, इथे वाचा ताजे दर

India’s first CNG Tractor: आता जुन्या ट्रॅक्टरमध्ये CNG किट बसवता येणार, नितीन गडकरींची मोठी घोषणा

(Latur Shivlinga Shivacharya Maharaj Producer company laying foundation of CNG PNG gas project made from grass)

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.