AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Grape : द्राक्ष उत्पादकांवर आता दुहेरी संकट, हंगामाच्या अंतिम टप्प्यात सर्वकाही गमावले..!

यंदा द्राक्ष हंगामाला लागलेली घरघर ही द्राक्ष तोडणी पश्चातही कायम आहे. निसर्गाची अवकृपेमुळे उत्पादनात घट तर झालीच पण पदरी पडलेला निकृष्ट माल खरेदीस व्यापारी फिरकेनात अशी अवस्था झाली आहे. दरवर्षी द्राक्षामधूनच मोठी उलाढाल होत असल्याने बेदाणा निर्मितीकडे दुर्लक्ष केले जात होते. यंदा परस्थिती वेगळी आहे. द्राक्षाचे नुकसान झाल्यामुळे किमान बेदाण्यातून का होईना चार पैसे मिळतील ही उत्पादकांना आशा आहे. मात्र, वाढत्या महागाईमुळे बेदाणा निर्मितीही सोपी राहिलेली नाही.

Grape : द्राक्ष उत्पादकांवर आता दुहेरी संकट, हंगामाच्या अंतिम टप्प्यात सर्वकाही गमावले..!
बेदाणा निर्मिती
| Updated on: Mar 18, 2022 | 1:40 PM
Share

सांगली : यंदा द्राक्ष हंगामाला लागलेली घरघर ही (Grape Crushing) द्राक्ष तोडणी पश्चातही कायम आहे. (Untimely Rain) निसर्गाची अवकृपेमुळे उत्पादनात घट तर झालीच पण पदरी पडलेला निकृष्ट माल खरेदीस व्यापारी फिरकेनात अशी अवस्था झाली आहे. दरवर्षी द्राक्षामधूनच मोठी उलाढाल होत असल्याने (Raisin Production) बेदाणा निर्मितीकडे दुर्लक्ष केले जात होते. यंदा परस्थिती वेगळी आहे. द्राक्षाचे नुकसान झाल्यामुळे किमान बेदाण्यातून का होईना चार पैसे मिळतील ही उत्पादकांना आशा आहे. मात्र, वाढत्या महागाईमुळे बेदाणा निर्मितीही सोपी राहिलेली नाही. बेदाणा निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या किंमती वाढल्या असून उत्पादन हे कमी झाले आहे. बेदाणा साहित्य हे दीडपटीने वाढलेले आहे. त्यामुळे चोहीबाजूंनी द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे.

बेदाणा निर्मितीसाठाचे साहित्य

बेदाणा निर्मितीसाठी कार्बोनाईट, डिपींग ऑईल, नेटींग मशीन या साहित्याची आवश्यकता असते. बेदणा तयार करण्यासाठी प्रतिकिलो 31 रुपये खर्च येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सध्या मार्केटमध्ये बेदाण्याचा दर 180 रुपये असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी तो 130 रुपये इतकाच मिळणार आहे. याशिवाय इतर साहित्य व त्यासाठी राबली जाणारी प्रणाली याच्या दरात मोठी वाढ झालेली आहे. बेदाणा सुकवण्यासाठी लागणारे साहित्य व प्रक्रिया करणारे औषधे याचे दर वाढलेले आहेत.

साहित्य दरात अशी झाली आहे वाढ

द्राक्षावर प्रक्रिया करुन सुकवण्यासाठी ठेवण्यात येणाऱ्या बॉक्सचे दर गतवर्षी 34 रुपये होते ते यंदा 43 असे झाले आहेत. 100 मी चिकटपट्टी रोल 2 हजार 800 रुपयांना मिळत होता तो आता 3 हजार 100 रुपयांना मिळत आहे. स्टोरेजच्या भाड्यामध्ये 200 रुपयांची भर पडली आहे. बेदाणा सुकवण्यासाठी भाडेतत्वावर देण्यात येणाऱ्या शेडच्या भाड्यात 2 हजार रुपयांची वाढ झालेली आहे. एवढेच नाही तर कामगारांचे पगारही वाढलेले आहेत.

द्राक्ष खरेदीकडे व्यापाऱ्यांनी फिरवली पाठ

सततच्या पावसामुळे यंदा द्राक्षांचा दर्जा खालावलेला आहे. गतआठवड्यात झालेल्या अवकाळी व ढगाळ वातारणामुळे सर्वकाही गमावले असेच चित्र झाले आहे. व्यापारी द्राक्ष खरेदीलाही येत नाहीत अशी अवस्था यंदा झाली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनावर अधिकचा खर्च तर झालाच पण बदल्यात काहीच नसल्याने द्राक्ष उत्पादक दुहेरी संकटात आहे. द्राक्षाची विक्री नाही आणि बेदाण्याची निर्मिती परवडत नाही अशी अवस्था झाली आहे.

संबंधित बातम्या :

आता मोबाईलच्या माध्यमातूनही PM Kisan Sanman Nidhi योजनेची नोंदणी, जाणून घ्या सर्वकाही..!

Sugarcane : अतिरिक्त ऊस फडातच त्यात वाढत्या ऊन्हाचा परिणाम, कृषी आयुक्तांच्या आश्वासनानंतरही समस्या कायमच..!

Guarantee Price Centre : बाजार समित्या बंद, शेतकऱ्यांना आधार खरेदी केंद्राचा, जनजागृतीनंतर आवक वाढली

अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.