Weather Report | राज्यात अवकाळी पावसाची शक्यता, मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा अंदाज

कोरोनाच्या काळानंतर अतिवृष्टी झाली होती, त्यातून शेतकरी कुठेतरी सावरताना दिसत होता. पण सध्याच्या खराब हवामानाने त्यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याची पाहायला मिळत आहे.

Weather Report | राज्यात अवकाळी पावसाची शक्यता, मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा अंदाज
File photoImage Credit source: google
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 8:22 AM

मुंबई – संपुर्ण महाराष्ट्र (maharashtra) राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून (Weather department) व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा चितेंत सापडण्याची शक्यता आहे. कारण आता महाराष्ट्रातील अनेक पीकं काढणीला आली असल्याने शेतक-यांना (farmer)मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त कऱण्यात आली आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या गारपिटीची होण्याची देखील शक्यता आहे. पावसाच्या दरम्यान हवेचा वेग वाढणार असून ताशी 40 कि.मी वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. विशेष म्हणजे मध्य भारतात पुर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा संगम होणार आहे त्यामुळे महाराष्ट्र, राजस्थान,गुजरात,पश्चिम मध्य प्रदेश या ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आलाय. सध्या पाऊस झाल्यास शेतक-यांच्या हातातोंडाला आलेलं पीक जाईल या भीतीखाली अनेक शेतकरी आहेत.

हवामान वेधशाळेने वर्तविलेला अंदाज

  1. संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता
  2. मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या गारपिटीची शक्यता
  3. मध्य भारतात पुर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा संगम होणार आहे त्यामुळे महाराष्ट्र, राजस्थान,गुजरात,पश्चिम मध्य प्रदेश या ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आलाय
  4. महाराष्ट्रात ताशी 40 कि.मी वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे

शेतक-यांना चिंता

कोरोनाच्या काळानंतर अतिवृष्टी झाली होती, त्यातून शेतकरी कुठेतरी सावरताना दिसत होता. पण सध्याच्या खराब हवामानाने त्यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याची पाहायला मिळत आहे. सध्या गारपीठीसह महाराष्ट्रात पाऊस झाल्यास गहू, हरभ-यासह अनेक पीकांना त्याचा फटका बसेल. अशा परिस्थितीत शेतक-यांनी जगावं कसं असा प्रश्न नक्कीचं पडला असेल.

एसटी संपाबाबतचं गोपनीय पत्र व्हायरल, कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कडक कारवाई होणार; नुकसान भरपाई म्हणून लाखो रूपये घेणार

Punjab Assembly Election 2022: केजरीवालांची ‘चाणक्य’निती! ‘आप’ची चक्क सेन्च्युरी होण्याचा अंदाज

सौंदर्याचा आणि श्रीमंतीचा दूरदूरपर्यंत संबंध नाही, हे सिद्ध करणारे फुगे विकणाऱ्या मुलीचे खास फोटो

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.