AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतीसाठी स्वस्तात कर्ज घ्यायचंय? किसान क्रेडिट कार्डविषयी मोठी अपडेट; अर्ज कसा करणार, निकष काय? जाणून घ्या

Kisan Credit Card Scheme: किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. हे कार्ड तयार करण्यासाठी कागदपत्रांची गरज आहे. जर वेळेआधी कर्ज फेडले तर व्याजदरात मोठी सवलत मिळते.

शेतीसाठी स्वस्तात कर्ज घ्यायचंय? किसान क्रेडिट कार्डविषयी मोठी अपडेट; अर्ज कसा करणार, निकष काय? जाणून घ्या
किसान क्रेडिट कार्ड फायदा
| Updated on: Jul 21, 2026 | 4:33 PM
Share

Kisan Credit Card Scheme: शेतीचे काम करण्यासाठी अनेकदा पैशांची गरज पडते. कधी बि-बियाणे खरेदी तर कधी खत खरेदीसाठी पैशांची गरज पडते. ट्रॅक्टरची दुरुस्ती तर कधी सिंचनासाठी मोठा निधी लागतो. पण शेती मालाला भाव मिळाला नाही. बचत सरली की शेतकऱ्यांसमोर कर्जाशिवाय पर्याय उरत नाही. अनेक बँका हात अखडता घेतात. तर काही ठिकाणी सावकरांकडून मोठ्या व्याजदराने उचल करावी लागते. त्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना अत्यंत फायदेशीर मानली जाते. या कार्डच्या मदतीने शेतकर्‍यांना अत्यंत कमी व्याजदरावर कर्ज मिळते. यामुळे शेतीसंबंधीच्या कामासाठी त्याच्या हाती पैसे राहतात. किसान क्रेडिट कार्ड तयार करण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या बाबी समजून घेणे आवश्यक आहे. यामुळे तुमचा अर्ज बाद होणार नाही आणि वारंवार बँकेच्या फेऱ्या माराव्या लागणार नाही.

तुमची पात्रता तपासा

किसान क्रेडिट कार्डचा फायदा घेण्यासाठी तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही ते अगोदर तपासा. तुमची कागदपत्रं तपासा. हे कार्ड केवळ त्यांनाच मिळते, ज्यांच्या नावावर शेती करण्यायोग्य जमीन असते. बटाईने शेती करणारे सुद्धा या योजनेसाठी पात्र आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांकडे करारपत्र असायला हवे.

अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या कागदपत्रे

केसीसीसाठी काही कागदपत्रांची अत्यंत गरज आहे. त्यासाठी तुमच्याकडे जमिनीसंबंधीची कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्यात खासरा, ओळखपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो असावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकर्‍यांचा सिबिल स्कोअर चांगला असावा. यापूर्वी शेतकऱ्याने कोणतेही कर्ज बुडवलेले नको. नाहीतर मग बँक व्यवस्थापक हे कार्ड तयार करण्यासाठी आवश्यक ती मंजूरी देणार नाही.

किसान क्रेडिट कार्डसाठी व्याजदर काय?

किसान क्रेडिट कार्डचे वैशिष्ट्ये म्हणजे शेतकऱ्यांना अत्यंत स्वस्त व्याजदरावर कर्ज मिळते. या योजनेत शेतकऱ्यांना 9 टक्के व्याजदराने कर्ज मिळते. पण सरकार त्यावर 2 टक्के सबसिडी देते. व्याजदर 7 टक्के दराने फेडावे लागते. इतकेच नाही तर वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळतो. जर वेळेत अथवा निश्चित तारखेपूर्वी कर्जाची परतफेड केली तर सरकार अशा कर्जावर 3 टक्क्यांची अतिरिक्त सवलत देते. याचा अर्थ किसान क्रेडिट कार्डवर कर्जाची परतफेड करताना केवळ 4% दराने व्याज भरावे लागते. या योजनेत वेळेत कर्ज रक्कम परतफेड करणे हे मोठ्या फायद्याचे ठरते. अजून एक फायदा होतो की, बँक कार्डची क्रेडिट लिमिट वाढवते. पुढील वर्षी अधिक कर्ज मिळते.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी