AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घराच्या छतावर करा भाजीपाल्याची शेती; हजारो रुपयांची होईल बचत

घरी भाजीपाला काढून हजारो रुपये वाचवले जाऊ शकतात. यासाठी थोडीसी मेहनत करावी लागेल.

घराच्या छतावर करा भाजीपाल्याची शेती; हजारो रुपयांची होईल बचत
| Updated on: Aug 08, 2023 | 8:06 PM
Share

नवी दिल्ली : देशात महागाई वाढत आहे. भाजीपाल्यासह खाण्या-पिण्याच्या वस्तूंच्या किमती वाढत आहेत. सामान्य व्यक्तीच्या किचनचे बजेड कोलमडत आहे. विशेषतः टोमॅटोच्या किमतीने साऱ्यांना बेजार केले आहे. टोमॅटो १४० ते २०० रुपये किलोपर्यंत पोहचले आहेत. शिमला मिरची, भेंडी, कारले, लवकी, सांभार आणि हिरवी मिरची यांचे भावही वाढले आहेत. यामुळे काही जणांनी टोमॅटोसह हिरवी मिरची खाणे सोडले आहे. घरी भाजीपाला काढून हजारो रुपये वाचवले जाऊ शकतात. यासाठी थोडीसी मेहनत करावी लागेल.

शहरात टेरेस फार्मिंगचे प्रमाण वाढत आहे. टोमॅटो, हिरवी मिरची, काकडी, वांगे यासह इतर भाजीपाला काढता येऊ शकतो. यामुळे लोकांना ताजा आणि हिरवा भाजीपाला मिळेल. महागाईच्या दिवसांत हजारो रुपयांची बचत होऊ शकेल. राज्य सरकार वेळोवेळी टेरेस गार्डनिंगसाठी अनुदानही देत असते. बिहार सरकार टेरेस फार्मिंगसाठी जिल्ह्यानुसार अनुदान देते.

८० ते १०० रुपयांत एक कुंडी

घरी शेती करत असाल तर २१ बाय २१ इंचीच्या १० कुंड्या खरेदी कराव्या लागतील. ८० ते १०० रुपयांपर्यंत या कुंड्या मिळू शकतात. माती, शेण टाकून टोमॅटोची लागवड करू शकता. मध्यंतरी पाणी द्यावे लागते. अडीच महिन्यानंतर टोमॅटोचे उत्पादन सुरू होते. पुसा हायब्रीड २, पुसा हायब्रीड ४ अशा जातीचे टोमॅटो लावता येतील. या जातीच्या टोमॅटोचे चांगले उत्पादन मिळते. घराच्या छतावर टोमॅटो काढल्यास महिन्याचे हजार रुपये वाचवू शकता.

६५ दिवसांनंतर शिमला मिरचीचे उत्पादन

बाजारात शिमला मिरची खूप महाग झाली आहे. दिल्लीत शिमला मिरचीची किंमत ६० ते ८० रुपये किलो आहे. टोमॅटोप्रमाणे शिमला मिरचीसुद्धा घरी काढू शकता. यासाठी तुम्हाला २१ इंज बाय २१ इंचीच्या कुंड्या खरेदी कराव्या लागतील. त्यात माती भरून शिमला मिरची सोलन हायब्रीड २ आणि ओरोबेल जातीच्या शिमला मिरच्या लावता येईल. बीज लावल्यानंतर ६० ते ६५ दिवसानंतर उत्पादन सुरू होईल. दहा कुंड्यांमध्ये शिमला मिरची लावत असाल तर ६५ दिवस रोज एक किलो शिमला मिरची मिळेल.

सांभार लावा घरी

सांभार बाजारात २०० रुपये किलो विकला जातो. सांभार लावून तुम्ही शेकडो रुपये वाचवू शकता. ताजी आणि हिरव्या सांभाराची भाजी खायला मिळेल. सांभारासाठी तुम्हाला आयात आकाराचा ट्रे खरेदी करावा लागेल. माती टाकून सांभार टाकता येईल. तीस दिवसानंतर सांभाराचे उत्पादन सुरू होते.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.