AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आभाळ फाटलं, सोयाबीन हातचं गेलं, बी-बियाण्यांचा खर्चही मातीमोल, शेतकऱ्यांच्या अश्रुंचा बांध फुटला

Dharashiv Soybean Crop: मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्याने हातातोंडाशी आलेले सोयाबीन पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. धाराशिवमध्ये हेक्टरी अवघे 2.2 क्विंटल उत्पादन झाले. तर काही ठिकाणी पीकच आले नाही. शेतकऱ्यांच्या व्यथांनी अधिकाऱ्यांचेही काळीज पिळवटले आहे.

आभाळ फाटलं, सोयाबीन हातचं गेलं, बी-बियाण्यांचा खर्चही मातीमोल, शेतकऱ्यांच्या अश्रुंचा बांध फुटला
सोयाबीन हातचे गेलेImage Credit source: फाईल चित्र
| Updated on: Oct 07, 2026 | 1:21 PM
Share

कोरड्या दुष्काळाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर संकटाची मालिका आणली आहे. अन्नधान्याचा, पिण्याच्या पाण्याचा, गुराढोरांच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न आ वासून समोर आहे. धाराशिव जिल्ह्यात पावसाच्या मोठ्या खंडामुळे हातातोंडासी आलेले सोयाबीन पीक पूर्णपणे उदध्वस्त झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार जिल्ह्यातील केंदुरमला येथील शेतकरी एम. ए. कुरेशी यांना यंदा हेक्टरी अवघे 2.2 क्विंटल सोयाबीन मिळाले. यापूर्वी त्यांनी याच शेतातून 6 ते 8 क्विंटल उत्पादन मिळत होते. अनेक भागात सोयाबीन कापणीनंतर हाती काहीच लागले नाही. यामुळे शेतकऱ्यांनी हंबरडा फोडला. या व्यथा पाहून अधिकाऱ्यांचेही काळीज पिळवटले.

पावसाची मोठी तूट

या हंगामात मराठवाड्यात सोयाबीनची मोठी लागवड करण्यात आली होती. सोयाबीनचा पेरा वाढला होता. पण पावसाने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाठ फिरवली. पावसाच्या दीर्घ खंडामुळे सोयाबीन जळाले. फुल येण्याच्या आणि दाणे भरण्याच्या टप्प्यावर पिकाला आर्द्रतेची अत्यंत गरज असते. पण पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात यंदा पावसाची मोठी तूट नोंदवली गेली. चार महिन्यांत सरासरी 679.5 मिमी पावसाची अपेक्षा असते. पण त्याऐवजी 445 मिमी पावसाची नोंद झाली. लातूर जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला. जिल्ह्यात सरासरी केवळ 51.4 टक्के पाऊस झाला. धाराशिवमध्ये हे प्रमाण 62.2 टक्के, बीडमध्ये 63 टक्के पाऊस झाले. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातही फारशी चांगली स्थिती नाही. जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनीही सोयाबीनची फारशी चांगली स्थिती नसल्याचे TIO च्या बातमीत म्हटलं आहे.

ग्रामीण अर्थव्यवस्था धोक्यात

मराठवाड्यात पावसाच्या भरवशावर शेती होते. सिंचनाचे पर्याय मर्यादित आहेत. शेतकरी आणि शेती ही पावसावर अवलंबून आहे. सोयीबीनचे पीक हातचे गेल्याने अल्प भूधारक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या शेतकऱ्यांनी दोन महिन्यांत बी-बियाणे, खते, कीटकनाशके आणि मजूरीवर मोठा खर्च केला आहे. पण आता सोयाबीनला दाणेच न लागल्याने हा खर्चही भरून निघणार नाही. शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना पीक विमा आणि आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.

Follow Us
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील...
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील प्रवासावर मोदींचं मनोगत
25 वर्षांचा राजकीय प्रवास; मोदींच्या कार्याचा विशेष गौरव
25 वर्षे जनसेवेची! PM मोदींच्या सत्तेतील प्रवासाचे नीतिन नबीन यांच्याकडून कौतुक
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप,
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप, म्हणाले...
पंतप्रधान मोदींनी सलग 25 वर्षे अखंड सेवेचा टप्पा गाठला
PM Modi : मुख्यमंत्री ते पंतप्रधान; नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात