पाऊस, वादळ वाऱ्याचा अंदाज शेतकऱ्यांना सांगणारं मेघदूत ॲप नेमकं काय?

पाऊस, वादळ वाऱ्याचा अंदाज शेतकऱ्यांना सांगणारं मेघदूत ॲप नेमकं काय?
मेघदूत

मेघदूत ॲपद्वारे शेतकऱ्यांना तापमान, वारे, पाऊस आणि पीक याविषयी सल्ला दिला जातो. (Meghdoot App)

Yuvraj Jadhav

|

Apr 13, 2021 | 4:55 PM

मुंबई: भारतीय शेती प्रामुख्यानं नैऋत्य मोसमी पावसावर अंबलंबून आहे. मात्र, गेल्या काही वर्षापासून पावसाची अनियमितता वाढली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये तर वर्षातील 12 महिन्यांमध्ये प्रत्येक महिन्यात पाऊस पडल्याची उदाहरण आहेत. त्यामुळे अवकाळी पावसानं शेतकऱ्याला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागत आहे. पिकांची हानी होतेच तर कधी कधी जीवितहानी देखील होती. जनावरांचे देखील प्राण जातात. शेतकऱ्यांना पूर्वसूचना मिळाल्यास हे नुकसान कमी होऊ शकतं. हा विचार करुन भारतीय कृषी विभाग आणि भारतीय हवामान विभागनं मेघदूत हे अ‌ॅप तयार केलं आहे. (Meghdoot app gives out timely weather forecast based agro advisories to farmers)

मेघदूत अ‌ॅप नेमकं काय?

शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज आणि त्या आधारीत पीक सल्ला देण्याचं काम मेघदूत अ‌ॅपमधून केलं जाते. शेतकऱ्यांना मेघदूत अ‌ॅपद्वारे वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा, हवेतील आर्द्रता, तापमान आणि पावसाच्या अंदाजाची माहिती दिली जाते. याशिवाय अ‌ॅपद्वारे पिकाची माहिती दिली जाते. हे अ‌ॅप दर मंगळवारी आणि शुक्रवारी अपडेट केलं जातं.

मेघदूत अ‌ॅप मराठी भाषेत आहे का?

मेघदूत अ‌ॅप भारतातील 10 प्रादेशिक भाषांमध्ये वापरता येते. भारतीय हवामान विभाग, भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र आणि भारतीय कृषी परिषदेकडून हे अ‌ॅप विकसित करण्यात आलं आहे. इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, ओडिया, बंगाली , कन्नड आदी मराठी भाषांमध्ये वापरता येते.

मेघदूत अ‌ॅप कसं वापरायचं ?

शेतकऱ्यांना प्रथम गुगल प्लेस्टोरवरुन मेघदूत अ‌ॅप डाऊनलोड करावं लागेल. त्यानंतर नोंदणीवर क्लिक करा, तिथे शेतकऱ्यांनी त्यांचं नाव, मोबाईल नंबर , अ‌ॅपची भाषा , जिल्हा आदी माहिती भरावी. त्यानंतर शेतकऱ्यांना मेघदूत अ‌ॅपवरुन पाऊस, वारे, तापमान, पीक सल्ला मिळवता येईल. मेघदूत अ‌ॅप देशातील 668 जिल्ह्यांमध्ये वापरता येणार आहे.

संबंधित बातम्या:

एका एकरात दोन लाख रुपयांची कमाई, गवती चहा शेतीतून शेतकऱ्यांना नवी संधी, वाचा सविस्तर

कोल्हापुरी गुळाला जीआय टॅग मिळालाय, जीआय टॅग का दिला जातो? वाचा सविस्तर

(Meghdoot app gives out timely weather forecast based agro advisories to farmers)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें