पुदिन्याची शेती शेतकऱ्यांसाठी छपाईचं मशीन?, पाहा हे गणित काय सांगतंय…!

उत्तर प्रदेशातील बदायूँ, रामपूर, मुरादाबाद, बरेली, पीलीभीत, बाराबंकी, फैजाबाद, आंबेडकर नगर, लखनऊ इत्यादी जिल्ह्यांतील शेतकरी मोठ्या प्रमाणात पुदिन्याची लागवड करतात. | Mentha Cultivation

पुदिन्याची शेती शेतकऱ्यांसाठी छपाईचं मशीन?, पाहा हे गणित काय सांगतंय...!
आता औषधी वनस्पतींची करा लागवड, चांगले पैसे मिळवण्याची संधी

मुंबई : उत्तर प्रदेशातील बदायूँ, रामपूर, मुरादाबाद, बरेली, पीलीभीत, बाराबंकी, फैजाबाद, आंबेडकर नगर, लखनऊ इत्यादी जिल्ह्यांतील शेतकरी मोठ्या प्रमाणात पुदिन्याची लागवड (Mentha Farming) करतात. गेल्या काही वर्षांपासून पुदीना या जिल्ह्यांमध्ये प्रमुख पिक म्हणून उदयास येत आहे. पुदिन्याच्या तेलाचा उपयोग सुगंधी वासासाठी तसंच औषधे तयार करण्यासाठी केला जातो. गेल्या दोन वर्षांत पुदिन्याच्या तेलाची किंमत सुमारे 1200 रुपये 1800 रुपये असल्याने शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पुदिन्याची लागवड केली आहे.  (Mentha Farming Growing mint profitable)

खर्च किती, उत्पन्न किती?

शेतकर्‍याला जर 1 एकरमध्ये पुदिन्याची लागवड करायची असेल तर लागवडीसाठी सुमारे 30 हजार रुपये खर्च येतो. 1 एकरमधील पुदिन्यात सुमारे 1 लाख पुदिन्याच्या तेलाचं उत्पादन होते. अशाप्रकारे उत्पादन खर्च वजा करुन एकरी सुमारे 70 हजार रुपये उत्पन्न मिळते.

भारत पुदिना तेलाचा जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यात करणारा देश आहे. उत्तर प्रदेशात पुदिना तेलाचे सर्वाधिक उत्पादन होतं. देशातील एकूण पुदिना तेल उत्पादनात यूपीचा वाटा सुमारे 80 टक्के आहे.

पश्चिम उत्तर प्रदेशातील संभळ, रामपूर, चंदौसी हे जिल्हे पुदिना उत्पादक क्षेत्रे आहेत तर लखनऊ जवळील बाराबंकी जिल्हा देखील पुदिना तेलाचा प्रमुख उत्पादक देश आहे. याशिवाय पंजाब, बिहार आणि मध्य प्रदेशातील काही भागांत पुदिन्याची लागवड होते. पुदिन्याचा सर्वाधिक वापर औषधे, सौंदर्य उत्पादने, टूथपेस्ट तसेच मिठाई उत्पादनांमध्ये केला जातो.

कशी केली जाते पुदिन्याची शेती

उत्तर प्रदेशच्या कृषी मंत्रालयाच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, पुदिना लागवडीसाठी माती चांगली हवी जिचा पी.एच. 6 ते 7.5 असावा. शेतात व्यवस्थित नांगरणी करून, तिची मशागत करुन ती लागवडीयोग्य केली जाते. पुदिना लागवडीनंतर ताबडतोब शेतात हलकंस पाणी दिलं जातं लावले जाते, यामुळे मेंथाचे बीज योग्य प्रकारे लावावे.

ऑगस्ट महिन्यात नर्सरीमध्ये पुदिन्याची बिया पेरल्या जातात. रोपवाटिका एका उच्च ठिकाणी बांधली जाते जेणेकरून पाणी साचण्यापासून ती जागा लांब असेल. नाहीतर जास्त पाऊस पडल्यास नुकसान होण्याची भिती असते.

साधारणपणे फेब्रुवारी-मार्चमध्ये त्याची लागवड केली जाते. तथापि, या जातीच्या विकासामुळे जानेवारीत पेरणी होणे शक्य झाले आहे. याशिवाय अर्ली मिंट तंत्राच्या साहाय्याने शेतकऱ्यांना मोठा फायदाही झालाय.

या कृषी तंत्रामुळे शेतकर्‍यांच्या उत्पादन किंमतीत मोठी घट झाली आहे. साधारणत: एक किलो पुदिना तेलाच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांना 500 रुपये खर्च येत होता. परंतु हे तंत्रज्ञान सुरू झाल्यामुळे किंमतीत 200 रुपये प्रति किलो घट झाली आहे. यामुळे शेतकरी पुदिना लागवडीकडे वळले आहेत.

खत किती टाकलं पाहिजे?

सर्वसामान्यपणे पुदिन्याच्या चांगल्या उत्पादनासाठी 120 ते 150 किलो नायट्रोजन, 50-60 किलो फॉस्फरस, पोटॅश 40 किलो आणि २० किलो गंधक प्रति हेक्टर वापरावे.

कापणी/ काढणी

पुदिन्याची कापणी दोनवेळा केली जाते. 100-120 दिवसांनंतर जेव्हा वनस्पतींमध्ये कळ्या यायल्या सुरुवात होते तेव्हा जमिनीच्या पृष्ठभागाच्या वरच्या 4 ते 5 सेमी उंचीवर रोपे काढली पाहिजेत.

पहिली कापणी किंवा काढणी झाल्यानंतर 70 ते 80 दिवसानंतर दुसरी काढणी होत असते. कापणीनंतर झाडे खुल्या उन्हात 2 ते 3 तास ठेवायला हवीत. कापलेल्या पुदिन्याच्या पानांना सावलीत हलकंस वाळवल्यानंतर डिस्टिलेशन पद्धतीने मशीनमधून तेल पटकन काढून घ्यावं.

(Mentha Farming Growing mint profitable)

हे ही वाचा :

World Water Day: जागतिक पाणी दिनानिमित्त जलशक्ती अभियानाची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून घोषणा होणार

कांदा शेतकऱ्यांना रडवणार, कांद्याचे दर 500 रुपये क्विंटलपर्यंत घसरले

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI