Milk Price: दुधालाही हवा आता हमीभावाचा ‘आधार’, उत्पन्नापेक्षा उत्पादनावरच खर्च अधिक

ज्या व्यवसायातून उत्पन्नच जर पदरी पडत नसेल तर तो व्यवसाय करुन काय उपयोग असेच विचार दुग्ध व्यवसयाकांचे आजचे चित्र पाहून येत आहेत. जनावरांच्या संगोपनावर होणारा खर्च पाहता जर डेअरी सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या दुधाच्या दरात वाढ केली नाही, तर मग लोक हे काम का करतील?खर्चानुसार सरकारने दुधाला किमान आधारभूत किमतीच्या कक्षेत आणून दर निश्चित करावी.

Milk Price: दुधालाही हवा आता हमीभावाचा 'आधार', उत्पन्नापेक्षा उत्पादनावरच खर्च अधिक
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: tv9
राजेंद्र खराडे

|

May 04, 2022 | 5:10 AM

मुंबई : गेल्या महिन्याभरात राज्यात दोन वेळा (Milk Rate) दूधाच्या दरात वाढ झाली असली तरी उत्पादन खर्च आणि प्रत्यक्षात दूध व्यवसयातून मिळत असलेले उत्पन्न म्हणजे चहा पेक्षा कॅटली गरम अशीच अवस्था म्हणावी लागेल. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाडे पाहिले जाते. पण हा जोड व्यवसाय देखील अडचणीत आला आहे. (Green Fodder) हिरवा चारा दुरापस्त आणि (Rates of animal feed) पशूखाद्यांचे वाढते दर यामुळे शेतकरी मेटाकूटीला आला आहे. त्यामुळे आता कांद्यापाठोपाठ दुधालाही हमीभाव देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. जनावरांचा चारा म्हणून कडब्याचा वापर केला जातो. पण ज्वारी 2 हजार रुपये क्विंटल तर त्याच बरोबरीने कडब्याचे दर आहेत. केवळ चारा आणि जनावरांचे करावे लागणारे संगोपन यामुळे शेतकऱ्यांनी जनावरे विकणे पसंत केले आहे.

दूध दरवाढ झाली तरच होणार फायदा

जनावरांचा चारा, पशुखाद्य आणि औषधे खूप महाग झाली आहेत, तर त्या तुलनेत दुधाच्या किंमतीत वाढ झालेली नाही. अशा परिस्थितीत पशुपालन खूप महाग झाले आहे. दुधाच्या दरात वाढ झाली तरच या जोड व्यवसायाची शेतीला जोड देता येणार आहे. त्यामुळे गायीच्या दूधाला 45 रुपये लिटर असा भाव मिळाला तरच या व्यवसायाचे गणित जुळणार आहे. सध्या गायीच्या दुधाला केवळ ३० ते ३२ रुपये लिटर दर मिळत आहे.

चारा किती महाग आहे?

*दरवर्षी नव्हे तर सहा महिन्यातून एकादा कडब्याचे दर वाढत आहेत. गतवर्षी 6 ते 7 रुपयांना मिळणारी कडब्याची पेंडी यंदा 1o रुपयांपर्यंत गेली आहे. शिवाय जूनमध्ये या दरात आणखीन वाढ होईल असा अंदाज आहे.

* दुसरीकडे अधिकचे उत्पादन मिळावे म्हणून कळणा, पेंड, सरकी यासारखे पशूखाद्य गरजेचे आहे.20 रुपये किलो असणारे हे पशूखाद्य आता 38 रुपये किलोंवर गेले आहे.

* गायी उष्णतेच्या बाबतीत अतिशय संवेदनशील असतात. त्यामुळे ते अनेकदा आजारी पडतात. एकदा त्यांना भेटायला अॅनिमल डॉक्टर आले की हजार ते दीड हजार रुपये घेतात.

* 2016-17 मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून एका जनावरामागे शेतकऱ्यांना रोजचे 7 ते 50 रुपये मिळतात. शिवाय जनावरे दुभती असली तर अन्यथा त्यांच्या सांभाळण्याचाही खर्च यातून निघत नाही.राज्यात दुधाचे विक्रमी उत्पादन असून वाढीव दरासाठी सातत्याने आंदोलने करावी ही दुर्देवी बाब आहे. दूध दरवाढीबाबत ठोस निर्णय घेऊन त्या दृष्टीकोनातून प्रयत्न केले तर अधिक फायद्याचे राहणार आहे.

* राज्यातील वेगवेगळ्या दूध डेअऱ्या ह्या दिवसाकाठी 44 लाख लिटर दूधाची खरेदी करतात.

तरच दूध व्यवसयाची स्थिती सुधारेल

ज्या व्यवसायातून उत्पन्नच जर पदरी पडत नसेल तर तो व्यवसाय करुन काय उपयोग असेच विचार दुग्ध व्यवसयाकांचे आजचे चित्र पाहून येत आहेत. जनावरांच्या संगोपनावर होणारा खर्च पाहता जर डेअरी सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या दुधाच्या दरात वाढ केली नाही, तर मग लोक हे काम का करतील?खर्चानुसार सरकारने दुधाला किमान आधारभूत किमतीच्या कक्षेत आणून दर निश्चित करावी. खर्चावर 50% नफा घेऊन किमान किंमत निश्चित करावी. अन्यथा अर्थव्यवस्थेत भरीव योगदान देणाऱ्या या दुग्धव्यवसाय क्षेत्राची स्थिती बिघडेल असे भारत डिघोळे यांनी सांगितले आहे.

पशूपालक संकटात, डेअरी चालक मालामाल

स्थानिक पातळीवर उभारण्यात आलेल्या डेअरी शेतकऱ्यांकडून 30 रुपये लिटरने दूध खरेदी करून ग्राहकांना 60 रुपयांना विकत आहे. फक्त मार्केटिंगसाठी तो लिटरमागे 30 रुपये कमावतात. यामध्ये पशुपालक आणि ग्राहकांचे नुकसान होत असून दुग्ध व्यवसायिकांना नफा मिळत आहे. पशुखाद्य आणि पशुखाद्याच्या किंमती जवळपास दुप्पट झाल्या आहेत. त्यामुळे दर वाढले तर दूध व्यवसायाला उभारी मिळेल असे शेतकरी भाऊराव गायकवाड यांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें