AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मान्सूनची महाराष्ट्राकडे वेगाने कूच, 2-3 दिवसात महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता

महाराष्ट्रासाठी चांगली बातमी असून पुढील 2-3 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात सक्रिय होईल, अशी माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी दिली आहे. (Monsoon Update IMD Maharashtra )

मान्सूनची महाराष्ट्राकडे वेगाने कूच, 2-3 दिवसात महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता
प्रतिकात्मक फोटो
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Jun 04, 2021 | 3:54 PM
Share

मुंबई: महाराष्ट्रासाठी चांगली बातमी असून पुढील 2-3 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात सक्रिय होईल, अशी माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी दिली आहे. मान्सून वेगानं पुढे सरकत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. पुढील पुढील 2-3 दिवसात मान्सून पुढे मध्य अरबी समुद्राच्या काही भागांमध्ये, महाराष्ट्र व गोव्यातील भागांमध्ये व आणखी काही भागांमध्ये जाण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. (Monsoon Update IMD officer K S Hosalikar said Monsoon will reach at Maharashtra within next two or three days)

मान्सून कुठे पोहोचला?

भारतीय हवामान विभागाची माहिती शेअर करत के.एस.होसाळीकर यांनी मान्सून कुठे पोहोचला आहे हे सांगितलंय. मान्सून पुढे सरकत असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार त्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. मान्सून अरबी समुद्रातून पुढे सरकत असून लक्षद्वीप, केरळ, किनारपट्टीचा काही भाग, दक्षिण कर्नाटक, उत्तर कर्नाटक, आंध्र प्रदेशातील काही भाग आण तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालच्या उपसागरात मान्सून पुढे सरकला असल्याचं त्यांनी सांगितलं.

दोन तीन दिवसात कोकण पश्चिम महाराष्ट्रात पाऊस

पुढचे 2, ३ दिवस राज्यामध्ये बहुतेक ठिकाणी गडगडासहित पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठाणे, रायगड, दक्षिण कोकण, पुणे, कोल्हापूर,सातारा, सांगली जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे.

मान्सून सरासरीच्या 101 टक्के बरसणार

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून 3 जूनला केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभाग म्हणजेच आयएमडीने यंदाचा मान्सून सरासरीच्या 101 टक्के असेल असा अंदाजानुसार यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. यंदा पाऊस सरासरीच्या 101 टक्के पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  96 टक्के ते 104 टक्क्यांपर्यंतच्या पावसाला सामान्य मान्सून म्हटलं जातं

कोणत्या विभागात किती पाऊस पडणार?

भारतीय हवामान विभागनं वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनचा पाऊस उत्तर पश्चिम भारतात 92-108 टक्के होण्याती शक्यता आहे. तर, दख्खनच्या पठारावर 93-107 टक्के पाऊस होऊ शकतो. उत्तर पूर्व भारतात 95 टक्के तर मध्य भारतात 106 टक्के पेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. भारतीय हवामान विभाग जून महिन्याच्या शेवटी जुलै महिन्याचा पावसाचा अंदाज व्यक्त करणार आहे.

संबंधित बातम्या:

Weather Alert Monsoon prediction : विदर्भात 100 टक्के, मराठवाड्यात 98 टक्के, यंदा कोणत्या विभागात किती पाऊस?

Weather Update: महाराष्ट्रावर मान्सूनपूर्व पाऊस बरसणार?, राज्यातील आजचं वातावरण कसं राहणार?

केरळमध्ये मान्सून दाखल झाला हे कसं ठरवलं जात? हवामान विभागाचे नेमके निकष काय?

(Monsoon Update IMD officer K S Hosalikar said Monsoon will reach at Maharashtra within next two or three days)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली