MSP Hike 2026-27: शेतकर्‍यांना मोदी सरकारचे गिफ्ट; 14 खरीप पिकांच्या हमीभावात मोठी वाढ

MSP Hike of 14 Kharif Crops: मोदी सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. 14 खरीप पिकांच्या हमीभावात मोठी वाढ केली आहे. 2026- 27 साठीच्या खरीप हंगामात MSP मध्ये वाढ करण्यात आली आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

MSP Hike 2026-27: शेतकर्‍यांना मोदी सरकारचे गिफ्ट; 14 खरीप पिकांच्या हमीभावात मोठी वाढ
किमान आधारभूत किंमत
Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 14, 2026 | 11:04 AM

MSP Hike of 14 Kharif Crops: मोदी सरकारने शेतकऱ्यांना गिफ्ट दिले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 2026- 27 च्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 2026- 27 साठीच्या खरीप हंगामात MSP मध्ये वाढ केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयात धान आणि कापूस उत्पादकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आहे. धानाच्या एमएसपी किमतीत प्रतिक्विंटल 72 रुपये वाढ करण्यात आली आहे तर कापसाच्या एमएसपी मध्ये प्रतिक्विंटल 557 रुपये वाढ करण्यात आली आहे.

शेतकर्‍यांसाठी 2 लाख 60 हजार कोटींची तरतूद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात खरीप पिकांसाठी किमान आधारभूत हमीभाव वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. एमएसपी खर्चावर कमीत कमी 50 टक्के फायदा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यातंर्गत आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये शेतकऱ्यांना जवळपास 2 लाख 60 हजार कोटी रुपये देण्यात येतील. या बैठकीत कोल गॅसिफिकेशन, सरखेज-धोलेरो या दरम्यान सेमी हायस्पीड रेल्वे लाईन आणि नागपूर विमानत आंतरराष्ट्रीय करण्याला मंजूरी देण्यात आली.

खरीप पिकांसाठी MSP ला मंजूरी

केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कॅबिनेटमधील निर्णयाची माहिती सार्वजनिक केली. खरीप पिकासांठी यंदा जवळपास 824.41 लाख मॅट्रिक टन खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या माहितीनुसार, एमएसपीमधील वाढीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला भाव मिळेल आणि शेतीला फायदा होईल. गेल्या वर्षीच्या तुलनेत कापूस (मध्यम धागा) 6.86%, (लांब धागा) 7.22%, धान साधारण 3.03%, धान ग्रेड वन 3.01%, मका 0.4%, तूर 5.62%, उडीद 5.12%, सोयाबीन 7.12% वाढ करण्यात आली आहे.

सूर्यफुलाला सर्वाधिक भाव

सूर्यफुलाला किमान आधारभूत किंमतीत(MSP) सर्वाधिक भाव मिळाला आहे. 2026-27 च्या खरीप हंगामासाठी सरकारने धानाचा हमीभाव 72 रुपयांनी वाढली आहे. हा भाव 2,441 रुपये प्रति क्विंटलवर पोहचला आहे. 14 खरीप पिकांपैकी सूर्यफुलाच्या किमान आधारभूत किंमतीला सर्वाधिक वाढ मिळाली आहे. ही वाढ प्रति क्विंटल 622 रुपये इतकी मिळाली आहे.

1.5 पट किंमत निश्चित

सर्व पिकांसाठी MSP उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 पट निश्चित करण्यात आली आहे. या निर्णयानुसार मूग पिकावरील उत्पादन खर्चावर 61 टक्के नफ्याचा अंदाज आहे. तर बाजरी आणि मका या दोन्ही पिकांसाठी 56 टक्के, तूर डाळीसाठी 54 टक्के नफ्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर उर्वरीत खरीप पिकांच्या नफ्यात 50 टक्के नफ्याची तरतूद करण्यात आली आहे.

Follow Us