AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan Yojana: यापूर्वीचा हप्ता नाही मिळाला? मग पीएम किसानचा 23 वा हप्ता सुद्धा थांबणार?

PM Kisan 23rd Installment Date: पीएम किसान योजनेविषयी मोठी अपडेट समोर येत आहे. ज्यांना यापूर्वी रक्कम मिळाली नाही त्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 23 वा हप्ता सुद्धा मिळणार नाही का?

PM Kisan Yojana: यापूर्वीचा हप्ता नाही मिळाला? मग पीएम किसानचा 23 वा हप्ता सुद्धा थांबणार?
पीएम किसानचा 23 वा हप्ता सुद्धा थांबणार?Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 10, 2026 | 10:11 AM
Share

PM Kisan Pending Installment Solution: पीएम किसान योजनेत कोट्यवधी शेतकऱ्यांना दोन हजार रुपये सन्मान निधी मिळतो. तर वर्षाला सहा रुपये बँकेच्या खात्यात जमा होतात. यापूर्वी ज्यांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला नाही, त्यांना 23 वा हप्ता सुद्धा मिळणार नाही का? असा सवाल अनेकांच्या मनात आला आहे. काही तांत्रिक अडचणी, कारणांमुळे अनेकांचा 22 वा हप्ता अडकला होता. म्हणजे ज्यांचा यापूर्वी हप्ता झाला नाही. आता त्यांना पुढील हप्ताही मिळणार नाही असा दावा करण्यात येत आहे. काय आहे त्यामागील तथ्य?

हप्ता थांबणार नाही

पण याचा अर्थ तुमच्या खात्यात पीएम किसान योजनेची रक्कम येणार नाही असे नाही. केवायसी केलेली नसेल. अथवा काही तांत्रिक चुकांमुळे पैसे अडकले असतील तर हप्ता थांबवल्या जातो. तांत्रिक चुका दूर केल्या तर शेतकऱ्यांच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा होते. या चुकाही अत्यंत छोट्या असतात. एकदा तुमची माहिती अपडेट झाली की हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा होतो.

मागील हप्ता का नाही झाला जमा?

तांत्रिक माहिती योग्यरितीने जमा केली नसेल. अथवा किरकोळ चुका केल्या असतील. केवायसी करण्यात आळस केला असेल तर अशा शेतकर्‍यांना 22 वा हप्ता मिळाला नसेल. ही चूक आता परत करू नका. नाहीतर तुमचा 23 वा हप्ताही जमा होणार नाही.

eKYC अपूर्ण – जर तुमची ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नसेल तर हप्ता अडकण्याची शक्यता अधिक आहे.

शेतजमिनीचा पडताळा- बँक खाते आणि पीएम किसान पोर्टलवर जमीनीचे दस्तावेजांचा पडताळा करणे आवश्यक आहे.

आधार लिंकिंगची अडचण- तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. DBT (Direct Benefit Transfer) हा पर्याय इनेबल असावा

दस्तावेजावरील नावात चूक – आधार कार्ड आणि बँकेच्या खात्यातील नावात स्पेलिंग वेगळे असेल तर हप्ता जमा होत नाही

एकदाच मिळतील दोन्ही हप्ते?

यापूर्वी 22 वा हप्ता 13 मार्च 2026 रोजी प्राप्त झाला होता. तांत्रिक कारणामुळे जर एखादा हप्ता थांबला असेल तर ती दुरुस्ती करून घ्या. ही तांत्रिक बाब सोडवली तरी 23 व्या हप्त्यासोबतच यापूर्वीचा थांबलेला हप्ताही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. जर तुमचा डेटा व्यवस्थित भरल्या गेला नसेल आणि त्यामुळे हप्ता थांबला असेल तर अगोदर त्यात दुरुस्ती करून घ्या म्हणजे हप्ता थांबणार नाही.

थांबलेला हप्ता प्राप्त करण्यासाठी काय कराल?

शेतकऱ्यांनी अगोदर pmkisan.gov.in या पोर्टलवर जाऊन फार्मर कॉर्नरवर लॉगिन करावे. ‘Know Your Status’ हा पर्याय निवडून स्टेट्‍स चेक करा. त्यात ‘Land Seeding’ वा ‘e-KYC’ समोर ‘No’ असे लिहिलेले असेल तर लगेचच जवळच्या CSC केंद्रावर जाऊन ती माहिती अपडेट करा.

तर फार्मर कॉर्नरवर एडिट अथवा अपडेट आधार, बँकेचा तपशील हा पर्याय निवडावा. तिथे तुमचे योग्य नाव, बँकेचा योग्य खाते क्रमांक, IFSC क्रमांक टाकावा. त्यानंतर ही माहिती योग्य आहे की नाही याचा पडताळा करावा. त्यानंतर ही माहिती सबमिट करावी.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?