आनंदाची बातमी; 12 हजार कोटींचा निधी मंजूर, प्रत्येक शेतकऱ्याला 4 हजार मिळणार

मुख्यमंत्री कृषी कल्याण योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षातून दोनदा प्रत्येकी 2000 रुपये जमा केले जातात. | Mukhyamantri kisan kalyan yojana

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:44 PM, 27 Jan 2021
आनंदाची बातमी; 12 हजार कोटींचा निधी मंजूर, प्रत्येक शेतकऱ्याला 4 हजार मिळणार
मध्य प्रदेश सरकारने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातही शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती. पीएम किसान योजनेतंर्गत वर्षाला शेतकऱ्यांना 6000 रुपये मिळतात.

नवी दिल्ली: मध्य प्रदेश सरकारने शेतकऱ्यांसाठी (Farmers) एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्री कृषी कल्याण योजनेसाठी 12 हजार कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील प्रत्येक शेतकऱ्याला 4 हजारांची आर्थिक मदत मिळणार आहे.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री कृषी कल्याण योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षातून दोनदा प्रत्येकी 2000 रुपये जमा केले जातात. त्यासाठी संबंधित शेतकऱ्याची पंतप्रधान कृषी योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये नोंद असणे गरजेचे आहे. मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेशिवाय मुख्यमंत्री कृषी कल्याण योजनेचेही पैसे मिळतात. (Mukhyamantri kisan kalyan yojana money will distribute soon)

कधी मिळणार पैसे?

शिवराज चौहान सरकारने घोषणा केल्यानुसार 30 जानेवारीला मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 400 कोटी रुपये जमा केले जातील. मध्य प्रदेश सरकारने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातही शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती. पीएम किसान योजनेतंर्गत वर्षाला शेतकऱ्यांना 6000 रुपये मिळतात. तर मुख्यमंत्री कृषी कल्याण योजनेतंर्गत वार्षिक 4000 रुपयांची मदत मिळते. अशाप्रकारे मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारकडून 10 हजारांची आर्थिक मदत दिली जाते.

मध्य प्रदेश सरकारने हा निर्णय का घेतला?

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आर्थिक मदत देण्याचा हा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यास मदत होईल. तसेच त्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल. या पैशातून ते शेतीसाठीची अवजारे व इतर सामुग्री खरेदी करू शकतात.

80 लाख शेतकऱ्यांना लाभ

मध्य प्रदेशातील 80 लाख शेतकऱ्यांना चौहान सरकारच्या या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात ही योजना सुरु झाली होती. पीएम किसान योजनेच्या धर्तीवरच राज्य सरकारच्या या योजनेची अंमलबजावणी होते.

लाभार्थ्यांमध्ये आपले नाव कसे चेक कराल?

मध्य प्रदेश कृषी कल्याण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये आपले नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जावे. त्याठिकाणी फार्मर ऑप्शनवर क्लिक करून बेनिफिशियरी हा पर्याय निवडावा. त्यानंतर एक नवी टॅब ओपन होईल. यामध्ये तुम्हाला राज्य, तालुका, ब्लॉक आणि गाव असे तपशील भरावे लागतील. त्यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक केल्यास लाभार्थ्यांची यादी तुम्हाला दिसेल.

संबंधित बातम्या:

आनंदाची बातमी! मोदी सरकारच्या ‘या’ योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार

कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर, केंद्र सरकारने नारळाची एमएसपी वाढवली!

मोती शेतीतून बंपर कमाई, 2 हेक्टरमध्ये 30 लाखांचा फायदा मिळवणाऱ्या शेतकऱ्याची गोष्ट

(Mukhyamantri kisan kalyan yojana money will distribute soon)