Nanded | हे काय भलतंच? केळीचं पिक घेतल्यास ब्रह्मदेवाचा प्रकोप? नांदेडमधल्या येळेगावकरांना कसली ही भीती?

केळीऐवजी येथील शेतकरी ऊस, हळद अशी पिके घेतात. पण केळी लागवडीची हिंमत कुणीही करत नाही. काही शेतकऱ्यांनी हा प्रयत्न केला असता त्या कुटुंबाचा सर्वनाश झाल्याची उदाहरणं असल्याचा दावा इथले शेतकरी करत आहेत.

Nanded | हे काय भलतंच? केळीचं पिक घेतल्यास ब्रह्मदेवाचा प्रकोप? नांदेडमधल्या येळेगावकरांना कसली ही भीती?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 2:45 PM

नांदेडः नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) अर्धापूर तालुक्यातील (Ardhapur Banana) केळीची ख्याती दूरदूरवर पसरली आहे. इथले बहुतांश शेतकरी केळीची लागवड करतात. पण याच तालुक्यात असंही एक गाव आहे, ज्या गावचे शेतकरी केळीचं पिक (Banana Crop) घेण्यासाठी घाबरतात. किंबहुना गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी केळीचं पिक घेतलेलंच नाही. केळीचं पिक घेतलं तर त्या शेतकऱ्यावर ब्रह्मदेवाचा प्रकोप होतो, अशी भीती गावकऱ्यांना आहे. दर्जेदार केळी उत्पादनासाठी अर्धापूर तालुका देश-विदेशात प्रसिद्ध आहे. मात्र याच तालुक्यातील एक अख्खं गाव या ओळखीपासून वंचित आहे. त्यांनी केळीपिकापासून स्वतःला दूर ठेवलंय.

येळेगावकरांची व्यथा काय?

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूत तालुक्यात येळेगाव आहे. येळेगावात श्री ब्रह्मदेवाचे देववस्थान आहे. गावाशेजारील एका लिंबाच्या झाडाखाली शेकडो वर्षांपूर्वी पासून ब्रह्मदेवाचे स्थान आहे. या देवस्थानच्या अनेक आख्यायिका गावात सांगितल्या जातात. केळीची लागवड केल्यास गावातील ग्रामदैवत असलेल्या ब्रह्मदेवाचा प्रकोप होतो आणि केळीची लागवड करणाऱ्या शेतकरी कुटूंबाचा सर्वनाश होतो ही त्यापैकीच एक आख्यायिका. त्यामुळेच केळी उत्पादसाठी अनुकुल वातावरण असूनही येळेगावचे लोक मात्र हे पिक घेऊ शकत नाहीत.

Nanded yelegaon

हे सुद्धा वाचा

मंदिर बांधण्यासही धजावत नाहीत…

गावाचे दैवत ब्रह्मदेव असल्याने त्याचे मंदिर बांधण्याची अनेकांची इच्छा झाली. कारण ब्रह्मदेवाचे स्थान एका लिंबाच्या झाडाखाली आहे. अनेकांनी आतापर्यंत मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला. जो कुणी मंदिर बांधेल, त्या मंदिराच्या शिखरावरून गोदावरी नदीचे पाणी दिसले पाहिजे, असं म्हणत ब्रह्मदेव त्या व्यक्तीच्या स्वप्नात येतात, अशीदेखील आख्यायिका आहे. त्यामुळए कुणीही हे मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला नाही. गोदावरी नदी येळेगावापासून 20 ते 25 किलोमीटर अंतरावर आहे.

अनेकांनी जमिनी विकल्या

येथील चित्र-विचित्र आख्यायिका ऐकून अनेक शेतकऱ्यांनी बाहेर गावातील शेतकऱ्यांना आपल्या जमिनी विकल्या. बाहेरगावच्या शेतकऱ्यांनीही शेती घेऊन येळेगावच्या शिवारात केळी लावण्याचा प्रयत्न केला नाही. केळीऐवजी येथील शेतकरी ऊस, हळद अशी पिके घेतात. पण केळी लागवडीची हिंमत कुणीही करत नाही. काही शेतकऱ्यांनी हा प्रयत्न केला असता त्या कुटुंबाचा सर्वनाश झाल्याची उदाहरणं असल्याचा दावा इथले शेतकरी करत आहेत.

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.