कांदा आता सर्वानाच रडवणार, शेतकऱ्यांसह ग्राहकांनाही फटका बसणार; अवकाळी पावसानं कसं वाढवलं टेंशन?

कांदा उत्पादक शेतकरी यांच्या अडचणीत वाढ होट असतांना कांदा सर्वानाच रडवणार असल्याची स्थिती आहे. तर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसामोर नवं संकट निर्माण झाले आहे.

कांदा आता सर्वानाच रडवणार, शेतकऱ्यांसह ग्राहकांनाही फटका बसणार; अवकाळी पावसानं कसं वाढवलं टेंशन?
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 26, 2023 | 11:56 AM

नाशिक : कांद्याची पंढरी म्हणून नाशिकची ओळख आहे. नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादनात अग्रेसर आहे. नाशिकच्या कांद्याची चव देखील इतर ठिकाणच्या कांद्यापेक्षा वेगळी चव आहे. त्यामुळे नाशिकच्या कांद्याला जगभरातून मागणी असते. मात्र, यंदाच्या वर्षी कांदा उत्पादक शेतकरी मेटकुटीला आहे. सुरुवातीला लाल कांदा आणि आता उन्हाळ कांदा खराब झाला आहे. खरंतर लाल कांदा हा जास्त काळ टिकू शकत नाही. तर उन्हाळ कांदा हा काही महीने टिकत असतो. त्यामुळे त्याची साठवण करून ठेवतात. आणि नंतर दिवाळीच्या दरम्यान तो कांदा विक्रीस आणला जातो. मात्र, यंदाच्या वर्षी संपूर्ण वर्षे शेतकऱ्यांच्या दृष्टीने घातक ठरले आहे.

सुरुवातीला मुसळधार पाऊस पडल्याने लाल कांद्याच्या शेतीचे नुकसान झाले आहे. आणि आता अवकाळी पाऊसाने उन्हाळ कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे यंदा कांद्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणले आहे.

कांदा उत्पादक शेतकरी अवकाळी पाऊसामुळे अधिकच अडचणीत सापडला आहे. खरंतर कांदा पीक हातातून जात असतांना शेतकऱ्यांना पुढील वर्षाची चिंता निर्माण झाली आहे. कांद्याची सध्याची स्थिती पाहता कांद्याचे बियाणे तयार करण्यासाठी लावण्यात येणारे डोंगळे देखील भुईसपाट झाले आहे.

हे सुद्धा वाचा

कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी शेतकरी बियाणे घरीच तयार करण्यावर भर देत असतो. त्याचे कारण म्हणजे बाजारातून खरेदी केलेले बियाणे दुप्पटीने महाग असते. त्यातच त्याची खात्री देखील नसते. त्यामुळे वेळ आणि पैसा जातो त्यामुळे मोठी अडचण निर्माण होत असते.

त्यातच कांदा उत्पादन घेण्यासाठी वेळेत लागवड करण्यासाठी कांद्याचे रोप तयार करणे गरजेचे असते. त्यामुळे शेतकरी काही महीने अगोदरच तयारी करत असतो. त्याचाच एक भाग म्हणजे डोंगळे लावून बियाणे तयार केले जाते. पण यंदा डोंगळे पूर्णतः भुईसपाट झाले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणले असून पुढील वर्षाचे पीक कसे घ्यायचे हे मोठे संकट निर्माण झाले आहे. दरम्यान दुसरीकडे ग्राहकांच्या डोळ्यात देखील पाणी येणार आहे. कांद्याला मिळणारा भाव पुढील काळात वाढणार आहे. मात्र तेव्हा शेतकऱ्यांकडे कांदा उपलब्ध नसणार आहे.

बाजारात असलेला कांदा हात विक्री करणारे विक्रेते आणणार आहे. ते व्यापाऱ्यांकडून कांदा खरेदी करणार आहे. त्यानंतर बाजारात कांदा विक्री होईल. याशिवाय कांद्याची स्थिती पाहिली तर कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. त्यामुळे कांदा बाजारात कमी प्रमाणात शिल्लक असणार आहे.

परदेशात देखील कांदा जाणार नाहीये. बाहेरील राज्यात देखील कांदा पोहचू शकलेला नाही. अवकाळी पावसाने कांद्याचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे कांद्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कांद्याची परिस्थिती पाहता कांदा भाव खाऊन जाणार असून शेतकरी आणि ग्राहक दोघांच्या डोळ्यात पाणी आणणार आहे.

Non Stop LIVE Update
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.