शेतकऱ्यांची सोशल मीडियावर नवी मोहीम, वाढदिवसाला बेकरी केकऐवजी फळं कापण्याचं अभियान

वाढदिवसानिमित्त बेकरीतून केक आणून कापण्यापेक्षा बाजारातून फळ आणून त्याचा केक बनवा, असं आवाहन केलं जात आहे. farmers appealing cutting fruit cake

शेतकऱ्यांची सोशल मीडियावर नवी मोहीम, वाढदिवसाला बेकरी केकऐवजी फळं कापण्याचं अभियान
फळांपासून बनवलेला केक
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 7:57 AM

मुंबई: सोशल मीडियावर कधी काय ट्रेंड होईल हे सांगता येत नाही. सध्या ग्रामीण आणि शहरी भागात शेतकऱ्यांच्या सोशल मीडिया ग्रुपवर एक अनोखी मोहीम राबवली जात आहे. वाढदिवसानिमित्त बेकरीतून केक आणून कापण्यापेक्षा बाजारातून फळ आणून त्याचा केक बनवा, असं आवाहन केलं जात आहे. ग्रामीण भागात या मोहिमेला प्रतिसाद मिळत आहे. व्हॉटसअ‌ॅपवर फळांचे केक कापण्याचं आवाहन करणारे मेसेज फॉरवर्ड केले जात आहेत. काही फेसबुक ग्रुपनी यांची स्पर्धा देखील आयोजित केली आहे. (New trend on Social Media from farmers appealing cutting fruit cake at Birthday and other Programmes)

शेतकऱ्यांच्या मुलांकडूनही मोहिमेला प्रतिसाद

सध्या सोशल मीडियावर वाढदिवसासाठी केक ऐवजी शेतातील फळे कापून वाढदिवस साजरा करा’ हा ट्रेंड जोरात गाजत आहे.जेणेकरून शेतकऱ्यांनी पिकवलेल्या फळांचा सन्मान होऊन त्यांची विक्री होईल.. याचेच अनुकरण करून पुण्यातल्या युवकांनी ती सत्यात उतरवली आणि कलिंगड व खरबूज व इतर फळांपासून अगदी जमेल तसा कापून केक बनवला अन्‌ आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा केला, अशी माहिती शर्मिला येवले यांनी दिली.

fruit cake viral photo

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो

अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांना मदत

बेकरी मधील केकची किमंत एरव्ही केकसाठी चारशे-पाचशे रुपये लागातात.सध्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांनी पिकविलेल्या फळांचे दर उतरलेले आहेत. वाढदिवस आणि इतर आनंदाच्या कार्यक्रमात बेकरीतील केक कापण्याऐवजी फळ कापल्यास याचा अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांना फायदा होईल. गावातील प्रत्येक कुटुंबाने कलिंगड, खरबूज, चिक्कू, द्राक्ष, पपई आदी फळांचा वापर केक म्हणून केल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल, सर्वांनी असा वाढदिवस करावा, असं मत वैभव लोमटे यानं व्यक्त केलं आहे.

थेट शेतकऱ्यांकडून खरेदीचं आवाहन

शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल कमी किमतीला विक्री करावा लागतो. वाढदिवस आणि इतर आनंदाच्या कार्यक्रमात फळांचा केक कापल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. थेट शेतकऱ्यांकडून खरेदी केल्यास शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. शाकाहारी मित्र केक खाण्यास नकार देतात, फळांपासून बनवल्यामुळे तोही प्रश्न मिटतो. फळांपासून बनवलेला केक बनवलेला केक हा सुंदर दिसत आहे. शेतकऱ्यांप्रती आत्मीयता असणाऱ्यांनी फळांचा केक कापून शेतकऱ्यांच्या आर्थिकदृष्ट्या सुबत्ता येण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन त्या विद्यार्थ्यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या:

Video | बळीराजाला अवकाळीचा पुन्हा तडाखा , काढणीला आलेली पिकं मातीमोल

नाशिकच्या शेतकऱ्यांची कामगिरी दमदार, किसान रेल्वेद्वारे द्राक्ष निर्यातीतून 45 लाखांची कमाई

(New trend on Social Media from farmers appealing cutting fruit cake at Birthday and other Programmes)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.