AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांद्याला 30 रुपयांचा दर द्या, शेतकऱ्यांचं ‘आमचा कांदा आमचा दर’ आंदोलन सुरु

कांद्याचे दर कमी झाल्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एक आंदोलन सुरु केलं आहे. onion price today lasalgaon

कांद्याला 30 रुपयांचा दर द्या, शेतकऱ्यांचं 'आमचा कांदा आमचा दर' आंदोलन सुरु
कांदा
| Updated on: Mar 23, 2021 | 10:42 AM
Share

मुंबई : कांद्याचे दर कमी झाल्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एक आंदोलन सुरु केलं आहे. ‘आमचा कांदा आमचा दर’ या आंदोलनाचं नाव आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव या बाजारसमितीमध्ये सुरुवात झाली आहे. कांद्याचे दर शेतकऱ्यांनी ठरवावे, याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी कांदा उत्पाकांकडून हे आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. सध्या कांद्याचे दर बाजारातील परिस्थितीत ठरवले जातात. शेतकरी ज्यावेळी कांद्याचं उत्पादन घेतात त्यावेळी 1 किलोचे दर 5-7 रुपयांपर्यंत खाली येतात. व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी केल्यानंतर चार पाच महिन्यांनतर तेच दर 100 ते 150 रुपयांपर्यंत पोहोचतात. यामुळे शेतकरी आणि ग्राहक दोघांना नुकसान सोसावं लागतं. (onion price today lasalgaon onion farmers started movement to fix know msp for all farmers )

कांद्याला 30 रुपये किलो दर मिळावा

महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी, “देश स्वातंत्र्याचं 75 वं वर्ष साजरं करत आहे मात्र, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा दर ठरवण्याचा अधिकार मिळालेला नाही.”, असं म्हटलं आहे. सरकारनं कांद्याबाबत कोणतेही धोरण ठरवलेलं नाही. गावागावांमध्ये जाऊन कांद्याची विक्री किमान आधारभूत किमतीवर व्हावी म्हणून शेतकऱ्यांमध्ये जागरुकता व्हावी म्हणून पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती, भारत दिघोळे यांनी दिली. कांद्याला 30 रुपये किलो दर मिळावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली.

शेतकरी कांदा साठवू का शकत नाही?

आर्थिक समस्येमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा बाजारसमितीमध्ये लगेचच विकावा लागतो. कांदा साठवण्याची व्यवस्था कमी प्रमाणात असल्यानं कांदा उत्पादकांसमोर अडचणी निर्माण होतात. भारत दिघोळे यांनी एका गावामध्ये 100 शेतकरी असल्यास 10 शेतकऱ्यांकडेच कांदा साठवण्याची व्यवस्था आहे. सरकारकडून कांदा उत्पादकांना चाळ बनवण्यासाठी मदत दिली जाते. ही मदत फारच तोकडी असल्याचे भारत दिघोळे यांनी सांगतिलं. 25 टन कांदा साठवण्यासाठी चाळ बनवायची असल्यास 4 लाख रुपये लागतात. सरकार फक्त 87 हजार 500 रुपये देते, असं दिघोळे म्हणाले. एका तालुक्यात 2 हजार शेतकऱ्यांनी सरकारी अनुदानासाठी अर्ज केल्यास 100 शेतकऱ्यांना लाभ होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा कमी किमतीत विकावा लागतो.

कांदा उत्पादनासाठी खर्च किती?

भारत दिघोळे यांनी नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड 2017 च्या अहवालानुसार एक किलो कांदा उत्पादनासाठी 9.34 रुपये खर्च येतो, असं सांगितलं. तर चार वर्षात हा खर्च आता 15 रुपयांवर पोहोचला आहे. महाराष्ट्रात नाशिक, धुळे, अहमदनगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याचं उत्पादन होतं.

संबंधित बातम्या:

टोमॅटो झाला, आता वांग्यालाही कवडीमोल भाव, उद्विग्न शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल

कोरोनाचा फटका द्राक्ष उत्पादकांना झटका, निर्यातीवरील सबसिडी सुरु करण्याची केंद्राकडे हाक

(onion price today lasalgaon onion farmers started movement to fix know msp for all farmers )

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.