Summer Crop: मका पिकाला अमेरिकन लष्करी अळीने घेरले, उत्पादनात घट अन् चाऱ्याचाही प्रश्न

| Updated on: Apr 19, 2022 | 3:47 PM

वातावरण बदलाचा परिणाम आता चारा पिकावरही होऊ लागला आहे. यंदा मुबलक पाणी आणि पोषक वातावरणामुळे शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला होता. उत्पादन वाढीसाठी हा प्रयत्न असला तरी उन्हाळ्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटावा हा उद्देश देखील शेतकऱ्यांचा राहिलेला आहे. त्यामुळे हंगामी पिकांबरोबर येवला तालुक्यात मका या चारा पिकाचा मोठ्या प्रमाणात पेरा झाला होता. पण मध्यंतरीचे ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस यामुळे मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे.

Summer Crop: मका पिकाला अमेरिकन लष्करी अळीने घेरले, उत्पादनात घट अन् चाऱ्याचाही प्रश्न
वातावऱणातील बदलामुळे मका या चारा पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

लासलगाव: वातावरण बदलाचा परिणाम आता चारा पिकावरही होऊ लागला आहे. यंदा मुबलक पाणी आणि (A nurturing environment) पोषक वातावरणामुळे शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला होता. उत्पादन वाढीसाठी हा प्रयत्न असला तरी उन्हाळ्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटावा हा उद्देश देखील शेतकऱ्यांचा राहिलेला आहे. त्यामुळे हंगामी पिकांबरोबर येवला तालुक्यात (Maize Crop) मका या (Fodder Crop) चारा पिकाचा मोठ्या प्रमाणात पेरा झाला होता. पण मध्यंतरीचे ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस यामुळे मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. यामुळे मक्याची पाने तर कुरतडली जात आहेतच पण ही मका आता जनावरांनाही टाकता येत नाही अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे मुख्य पिकांबरोबर चारा पिकाचेही नुकसान झाले आहे.

रासानिक नियंत्रण

* अळीच्या वाढीच्या सुरवातीच्या काळात निमअर्क 1500 पीपीएम किंवा निंबोळी अर्क 5% यांची 5 मिली प्रतीलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
* थायमेथोक्झाम 12.6% + लॅम्डा सायहेलोथ्रीन 9.5% झेड सी या मिश्र कीटकनाशकाची 0.5 मिली प्रतीलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
* प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट 5 एम.जी या कीटकनाशकाची 0.4 ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
* अथवा भाताचा भुसा १० किलो व गुळ २ किलो पाण्यात एकत्र भिजत ठेवावे व दुसऱ्या दिवशी त्यात १०० ग्रॅम थायोडीकार्ब ७५ डब्लू.पी. मिसळून लहान गोळ्या तयार कराव्यात व अशाप्रकारे तयार गोळ्या मक्याच्या पोंग्यात टाकाव्यात.

भर उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याचा प्रश्न

पोषक वातावरण आणि मुबलक पाऊस होऊन देखील उन्हाळ्यात हिराव्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची वणवण भटकंती सुरु आहे. चाऱ्याचे सर्व नियोजन केले असतानाही ऐन वेळी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात तर घट झालीच आहे पण उभी मका आता जनावरांपुढेही टाकता येत नाही अशी अवस्था झाली आहे. कारण मकाची पाने तर कुरतडून टाकली जात आहेतच पण ही मका जनावरांसाठी योग्य राहणार नसल्याचा सल्लाही शेतकऱ्यांना दिला जात आहे. त्यामुळे ना उत्पादन आणि ना चारा म्हणून वापर अशी अवस्था मक्याची झाली आहे.

शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान

मक्याची कणसे दाणे भरण्याच्या अवस्थेत आणि जनावरांसाठी चारा म्हणून योग्य असलेल्या अवस्थेतच अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. मक्याच्या पाणाची चाळणी झाली आहे. शिवाय अळीने संपूर्ण मकाच पोखरली आहे. यामुळे एकीकडे उत्पादनात घट झाली असताना आता विकतच्या चाऱ्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकासान झाले असून आता अधिकेचे पैसे देऊन चारा विकत घ्यावा लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Raju Shetti On Sharad Pawar: शरद पवार ऊस उत्पादकांना आळशी म्हणालेच कसे? त्यांच्या ज्ञानाबाबत माझा गैरसमज, राजू शेट्टींचे आक्षेप काय?

PM kisan Yojna : 11 व्या हप्त्याची उत्सुकता शिघेला, तक्रार निवारण्यासाठीही सरकारने केली सोय

Marathwada : 3 लाख क्विंटल हरभऱ्याला हमीभावाचा ‘आधार’, कृषी विभागानेच केली शेतकऱ्यांची अडचण..!