परभणीतील दुष्काळग्रस्त पान्हेरा 'जलयुक्त'

सलीम शेख, टीव्ही 9 मराठी, परभणी : परभणी तालुक्यातील पान्हेरा या गावी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सामूहिक शेततळे आणि साखळी सिमेंट नाला बांध तयार करण्यात आले आहेत. यामुळे गावातील पाण्याचा प्रश्न सर तर सुटलाच आहे, शिवाय परिसरातील शेतकऱ्यांना संरक्षित पाणी सिंचनासाठी उपलब्ध झाल्याने गावाचे रंग रुपच बदलले आहे. ही किमया केवळ जलयुक्त शिवार अभियानाची असल्याचे गावकरी …

परभणीतील दुष्काळग्रस्त पान्हेरा 'जलयुक्त'

सलीम शेख, टीव्ही 9 मराठी, परभणी : परभणी तालुक्यातील पान्हेरा या गावी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सामूहिक शेततळे आणि साखळी सिमेंट नाला बांध तयार करण्यात आले आहेत. यामुळे गावातील पाण्याचा प्रश्न सर तर सुटलाच आहे, शिवाय परिसरातील शेतकऱ्यांना संरक्षित पाणी सिंचनासाठी उपलब्ध झाल्याने गावाचे रंग रुपच बदलले आहे. ही किमया केवळ जलयुक्त शिवार अभियानाची असल्याचे गावकरी सांगतात.

पान्हेरा हे गाव परभणी शहरापासून पश्चिमेस 20 किमी अंतरावर आहे. या गावाचे भौगोलिक क्षेत्र 527 हे आहे. त्यापैकी 493 हे क्षेत्र लागवडी लायक आहे आणि गावाची एकूण लोकसंख्या 1253 आहे. कापूस, सोयाबीन, मूग, तूर, भाजीपाला, फळबाग असे एकूण 480 हे लागवड क्षेत्र आहे. तसेच संत्रा, आंबा, डाळींब, पपई इत्यादी फळपिकेही घेतली जातात.

सामूहिक शेततळे अंतर्गत एकूण 60.00 टीसीएम पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे. जलसंधारणातर्गत ढाळीचे बांध 497.00 हे क्षेत्रावर घेण्यात आले आहेत. दोना सिनाबामधील लोकसहभागातून 2400 घनमिटर गाळ काढण्यात आलेला आहे.

जलयुक्त शिवार अंतर्गत विहीर पुर्नभरण अंतर्गत 4 टीसीएम, साखळी सिमेंट बंधारे 36.00 टीसीएम, सि.ना.बा.खोलीकरण 36.00 टीसीएम, लोकसहभागातून गाळ काढणे (सीएनबी) 12 टीसीएम, रिचार्ज शाफ्ट  5.40 टीसीएम, सिनाबा खोलीकरण 6.00 टीसीएम याप्रमाणे पाणीसाठा निर्माण झालेला आहे.

जलयुक्त शिवारच्या या कामांमुळे जमिनीतील पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर शेती सिंचनासाठी संरक्षित पाणीसाठा मिळत आहे या पाण्यावरच शिवारातील शेतामध्ये सध्या अनेक प्रकारची पिके मोठ्या डौलाने उभे आहेत. ढाळीचे बांध 223.65 टीसीएम, सिनाबा 28.00 टीसीएम, जुन्या खदानी 40.00 टीसीएम याप्रमाणे जुन्या कामामुळे आडवलेला पाणीसाठा निर्माण झाला आहे.

मौजे पान्हेरा येथे जलयुक्त शिवार अभियानातर्गत झालेल्या कामांमुळे पाणी पातळीत वाढ झाल्याने पीक पद्धतीत बदल घडला असून, ठिबक सिंचनाद्वारे संरक्षित पाण्याचा झालेला वापराने डाळिंब व पपई काढण्यात आलेली आहे.

या कामांमुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले असून, यापूर्वी पाने, राहेगाव, पान्हेरा हे गाव दुष्काळी गाव म्हणून गणले जायचे. मात्र आता येथील शेतकरी फळपीक कापूस हळद भाजीपाला आदी पिके घेत आहेत. 525 हेक्टरपैकी जवळपास 500 हेक्‍टरवर पेरणी झाली आहे.

जलयुक्त शिवार अभियानाच्या शेततळ्याने शेतकऱ्यांच्या जीवनात हिरवळ आणली आहे. या शेततळ्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिले आहे यामुळे शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न सुटले आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *