Pik Pahani : पावसाच्या रझाकारीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा, पीक पाहणीबाबत मोठी अपडेट, तुमचा काय फायदा?

e-pik pahani : राज्यात पावसाने धुमशान घातलं. पावसाच्या रझाकारीत शेतकऱ्यांना आता आणखी एक मोठा दिलासा मिळाला आहे. ईपीक पाहणीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. नैसर्गिक संकट आले असताना सरकारने पीक पाहणीला मुदतवाढ दिली आहे.

Pik Pahani : पावसाच्या रझाकारीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा, पीक पाहणीबाबत मोठी अपडेट, तुमचा काय फायदा?
| Updated on: Oct 02, 2025 | 3:46 PM

राज्यात सप्टेंबर महिन्यात पावसाने हैदोस घातला. अतिवृष्टीने राज्यातील शेतकरी संकटात आला. अनेक ठिकाणी जमिनी वाहून गेल्या. पीक हातचं गेलं. अनेक गावांना पूराचा वेढा पडला. गावात पाणी शिरले. मुसळधार पावसाने वाताहत झाली. पावसाच्या रझाकारीत शेतकऱ्यांना आता आणखी एक मोठा दिलासा मिळाला आहे. ईपीक पाहणीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. नैसर्गिक संकट आले असताना सरकारने पीक पाहणीला मुदतवाढ दिली आहे.

शेतकऱ्यांसाठी पीक पाहणीची मुदत 30 सप्टेंबरला संपत आली असताना एक महिना मुदतवाढ दिली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याविषयीचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या पीक पाहणीला 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती. गेल्या महिन्याच्या अखेरीस ही मुदतवाढ संपत असताना आता ही तारीख अजून वाढवण्यात आली आहे.

14 सप्टेंबरपर्यंत किमान 60 टक्के क्षेत्रावरील ई पीक पाहणी होण्याची गरज होती. पण राज्यातील एकूण लागवडी योग्य क्षेत्र 1.69 कोटी हेक्टरपैकी 81.04 लाख हेक्टर म्हणजेच 47.89 टक्के क्षेत्रावरील पिकांची ई-पीक पाहणीद्वारे नोंद झाली होती. सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने पीक पाहणीची नोंद होत नव्हती. ही नोंद रखडली होती.

त्यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. सर्व्हर डाऊन असल्याने आणि तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे शेतकऱ्यांना पीक पाहणे करण्यासाठी मोठा अडथळा येत होता. त्यामुळे शासनाने पुन्हा एकदा पीक पाहणी प्रणालीला मुदतवाढ द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत होती. अनुदान पिक विमा पीक नुकसान भरपाई यासारख्या योजनांच्या माध्यमातून मिळणाऱ्या लाभांपासून वंचित राहू नये यासाठी मुदत वाढ द्यावी अशी मागणी होत होती. अखेर शासनाने शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेत ई पीक पाहणीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली.

अतिवृष्टीने मुदतवाढ

सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान केले. नदीकाठची जमीन वाहून गेली. पीकं सडली. पीकं हातची गेली. अतिवृष्टीचे पंचनामे सुद्धा होऊ शकले नाही. अजून काही शेतात पाणी आहे. दुबार पेरणीचं मोठं संकट शेतकऱ्यांवर येऊन ठेपलं आहे. त्यामुळे त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या पीक पाहणीला 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती. गेल्या महिन्याच्या अखेरीस ही मुदतवाढ संपत असताना आता ही तारीख एक महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.