Sugarcane : ऊस उत्पादकांसाठी महत्वाची बातमी, आगामी ऊस गाळप हंगामात काय होणार बदल?

यंदा अतिरिक्त ऊसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आगामी गाळप हंगामात प्रति दिवसाची गाळप क्षमता ही 25 हजार टनांनी वाढवली जाणार आहे. शिवाय ऊसाचे क्षेत्र किती आहे? हे समजण्यासाठी अॅप्लिकेशनची निर्मिती केली जाणार आहे. ज्याप्रमाणे ई-पीक पाहणीतून पिकांच्या नोंदी केल्या जातात त्याचप्रमाणे आता सातबाऱ्यावर ऊसाची नोंदही घेतली जाणार आहे.

Sugarcane : ऊस उत्पादकांसाठी महत्वाची बातमी, आगामी ऊस गाळप हंगामात काय होणार बदल?
साखर आयुक्त कार्यालयाकडून आगामी गाळपाचे आतापासूनच नियोजन केले जात आहे.
Image Credit source: TV9 Marathi
राजेंद्र खराडे

|

Jun 16, 2022 | 1:33 PM

पुणे : यंदाचा (Sugarcane Sludge) ऊस गाळप हंगाम दोन दिवसांपूर्वीच संपल्याचे (Sugar Commissioner) साखर आयुक्त कार्यालयाने जाहिर केले आहे. अतिरिक्त ऊस आणि वाढते उत्पादन यामुळे हंगाम तब्बल 6 महिने सुरु होता. या कालावाधीत प्रशासनाला आलेले अनुभव आणि ऊस उत्पादकांची झालेली गैरसोय पाहता आगामी हंगामासाठी आतापासूनच तयारी केली जात आहे. (Surplus Sugarcane) अतिरिक्त उसाबाबत शासनाला उशीराचे शहाणपण सुचले असले तरी ज्या उपाययोजना नियोजित आहेत त्याची पूर्तता होणे गरजेचे आहे. गाळपाचे उद्दिष्ट साधण्याबरोबर ऊस लागवडीचा लेखाजोखा साखर आयुक्त कार्यालयाकडे उपलब्ध होण्यासाठी महत्वाचे बदल केले जाणार आहेत.यंदा गाळपात आलेल्या अडचणी पुन्हा येऊ नयेत यासाठी आताच महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

काय होणार नेमके बदल ?

यंदा अतिरिक्त ऊसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आगामी गाळप हंगामात प्रति दिवसाची गाळप क्षमता ही 25 हजार टनांनी वाढवली जाणार आहे. शिवाय ऊसाचे क्षेत्र किती आहे? हे समजण्यासाठी अॅप्लिकेशनची निर्मिती केली जाणार आहे. ज्याप्रमाणे ई-पीक पाहणीतून पिकांच्या नोंदी केल्या जातात त्याचप्रमाणे आता सातबाऱ्यावर ऊसाची नोंदही घेतली जाणार आहे. एवढेच नाही तर यंदा 6 महिने हंगाम सुरु राहूनही अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम होता. त्यामुळे आगामी काळात लवकर गाळप सुरु केले जाणार आहे तर हार्वेस्टरची संख्या देखील वाढवली जाणार आहे.

हंगामात सुरु होते 200 साखर कारखाने

यंदाच्या हंगामात ऊसाचे गाळप आणि साखरेचे उत्पादन विक्रमी होऊनदेखील अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम होता. गेल्या सहा महिन्यापासून सुरु असलेला गाळपाचा हंगाम आता कुठे संपुष्टात आला आहे. राज्यात तब्बल 200 साखर कारखाने सुरु होते. शिवाय गाळप क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप ह्या साखर कारखान्यांनी केले आहे. असे असतानाही शिल्लक उसासाठी राज्यातील अजून तीन साखर कारखाने हे सुरु आहेत.

हे सुद्धा वाचा

हंगामापूर्वीच घेतला जाणार क्षेत्राचा अंदाज

यंदा हंगाम अंतिम टप्प्यात असताना देखील अतिरिक्त उसाचे संकट हे कायम होते. विशेषत: मराठवाड्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे अतिरिक्त उस किती क्षेत्रावर आहे याची तपासणी करण्यासाठी यंत्रणा राबविण्यात आली होती. पण आता गाळप हंगाम सुरु होण्यापूर्वीच क्षेत्राचा आणि लागवडीच्या तारखेचा सबंध आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात का होईना गाळप पूर्ण व्हावे हीच अपेक्षा आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें