AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हे’ शेतकरी घेऊ शकतात पीएम पीक विमा योजनेचा लाभ, अशा प्रकारे सहज करू शकता अर्ज

प्रधानमंत्री पीक विमा योजना जी शेतकऱ्यांना विशेष दिलासा देणारी ठरली जाणार आहे. या योजनेअंतर्गत एखाद्या शेतकऱ्याच्या पिकाचे पाऊस, दुष्काळ किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास सरकार त्याला नुकसान भरपाई देणार आहे.

'हे' शेतकरी घेऊ शकतात पीएम पीक विमा योजनेचा लाभ, अशा प्रकारे सहज करू शकता अर्ज
| Updated on: Nov 12, 2024 | 4:11 PM
Share

भारतातील केंद्र आणि राज्य सरकार अनेक उपाय योजना राबवत आहे, या योजनांच्या आधारे देशातील विविध वर्गातील लोकांना या गोष्टींचा लाभ घेता यावा म्हणून सरकारकडून काही ठिकाणी आर्थिक मदत दिली जाते, तर कुठे जीवनावश्यक वस्तू पुरविल्या जातात. अशीच एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना जी शेतकऱ्यांना विशेष दिलासा देणारी ठरली जाणार आहे. या योजनेअंतर्गत एखाद्या शेतकऱ्याच्या पिकाचे पाऊस, दुष्काळ किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास सरकार त्याला नुकसान भरपाई देणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघण्यास मदत होते, जेणेकरून ते आर्थिक संकटावर मात करू शकतील.

तुम्हीही शेतकरी असाल आणि या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर सर्वप्रथम त्याची पात्रता समजून घ्यावी लागेल. चला तर मग जाणून घेऊया, पंतप्रधान पीक विमा योजनेचे लाभार्थी कोण आहेत आणि त्यासाठी अर्ज कसा करावा.

पात्रतेच्या अटी

या योजनेचा लाभ केवळ भारतीय शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.

जे शेतकरी अनुसूचित क्षेत्रात जमीनचे मालक आहेत किंवा भाड्याने शेती करतात, ते पात्र आहेत.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ घेता यावा, यासाठी मध्यमवर्गीय शेतकऱ्यांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

बँक खाते पासबुक

खसरा नंबर

पेरणी प्रमाणपत्र

जमिनीशी संबंधित इतर कागदपत्रे

अर्ज करण्याची प्रक्रिया

स्टेप १ : सर्वप्रथम तुम्हाला पंतप्रधान पीक विमा योजनेच्या वेबसाईटवर जावे लागेल.

स्टेप २ : वेबसाईटवरील ‘फार्मर्स कॉर्नर’ या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप ३ : येथे तुम्हाला ‘गेस्ट फार्मर’ ऑप्शनवर क्लिक करावं लागेल.

स्टेप ४ : यानंतर दिसणाऱ्या फॉर्ममध्ये सर्व आवश्यक माहिती भरा.

स्टेप ५ : फॉर्म पूर्ण झाल्यानंतर कॅप्चा कोड भरा आणि “क्रिएट युजर” वर क्लिक करा.

स्टेप ६ : आपला नोंदणीकृत मोबाइल नंबर वापरून पोर्टलवर लॉगिन करा आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.