AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan Yojana:… तर खात्यात 4,000 रुपये जमा होणार… ती चूक दुरुस्त केली का? पीएम किसान योजनेची मोठी अपडेट

PM Kisan Yojana: कर्जमाफी योजनेचा दुसरा टप्पा मिळून जवळपास 12 लाख 56 हजार शेतकऱ्यांना फायदा मिळाला आहे. आता पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. नियमित लाभार्थ्यांना या योजनेत 2,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. ही चूक दुरूस्त केल्यास खात्यात चार हजार रुपये येऊ शकतात.

PM Kisan Yojana:… तर खात्यात 4,000 रुपये जमा होणार... ती चूक दुरुस्त केली का? पीएम किसान योजनेची मोठी अपडेट
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना
| Updated on: Aug 25, 2026 | 10:23 PM
Share

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतंर्गत काल दुसऱ्या टप्प्यातील कर्जमाफी वितरीत झाली. दोन्ही टप्पे मिळून जवळपास 12 लाख 56 हजार शेतकऱ्यांना फायदा मिळाला आहे. आता शेतकऱ्यांना पीएम किसानच्या 24 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. नियमित लाभार्थ्यांना या योजनेत 2,000 रुपयांची मदत मिळते. पंतप्रधान शेतकरी सन्माननिधी योजनेतंर्गत वार्षिक 6,000 रुपयांची मदत करण्यात येते. पण एक चूक दुरुस्त केल्यास शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळू शकतात. पण ही रक्कम कुणाला आणि कशी मिळणार?

24व्या हप्त्यात 4 हजार कसे मिळणार?

या योजनेत नियमाप्रमाणे दोन हजार रुपये मिळतील. मात्र काही शेतकऱ्यांना मागील हप्ता मिळाला नसेल आणि या हप्त्यात असलेली अडचण दूर झाली तर शेतकर्‍यांच्या खात्यात चार हजार रुपये जमा होऊ शकतात. 24 व्या हप्त्यासह रखडलेला हप्ताही त्यांना मिळेल. यामुळे त्यांच्या खात्यात चार हजार रुपये जमा होतील.

मागील हप्ता मिळवण्यासाठी काय कराल?

मागील हप्ता मिळाला नसेल तर अगोदर pmkisan.gov.in या पोर्टलवर जा. साईटवर फार्मर कॉर्नरवर लॉगिन करा. ‘Know Your Status’ हा पर्याय निवडून स्टेट्‍स चेक करा. त्यात ‘Land Seeding’ वा ‘e-KYC’ समोर ‘No’ असे समोर आल्यास तात्काळ CSC केंद्रावर जाऊन ती माहिती अपडेट करा.

ही माहिती शेतकऱ्यांना घरबसल्याही अपडेट करता येते. फार्मर कॉर्नरवर एडिट अथवा अपडेट आधार, बँकेचा तपशील हा पर्याय निवडावा. तिथे तुमचे योग्य नाव, बँकेचा योग्य खाते क्रमांक, IFSC क्रमांक टाकावा. त्यानंतर ही माहिती योग्य आहे की नाही याचा पडताळा करावा. त्यानंतर ही माहिती सबमिट करावी.

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक आहे. या डिजिटल प्रणालीत प्रत्येक शेतकर्‍याला एक युनिक फार्मर आयडी दिला जातो. शेतीसंबंधीत योजना, पीक विमा आणि अनुदानाचा थेट लाभ मिळण्यासाठी ही नोंदणी बंधनकारक आहे. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसीसोबतच ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक आहे.

24 वा हप्ता कधी मिळणार?

20 ऑक्टोबरपर्यंत हा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. तर काही दाव्यानुसार हा हप्ता नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळू शकतो.  पण याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती सरकारने अद्याप जाहीर केलेली नाही.ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर शेतकऱ्यांना पीएम किसानचा नवीन हप्ता मिळणार नाही. शेतकऱ्यांनी वेळेपूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

Follow Us
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम यात्रेची तयारी सुरू
शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
Nana Patekar Passes Away: शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
Delhi India Alliance : इंडिया आघाडीचा मोठा प्लॅन; 10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या...
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या पदाधिकाऱ्याने दिली मोठी माहिती
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव... नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?