Gondia : धान खरेदी केंद्रावर सुविधांपेक्षा अडचणी अधिक, ऑनलाईन नोंदणी होत नसल्याने खरेदी रखडली

धान खरेदीची अंतिम मुदत ही 31 ऑगस्ट ही असणार आहे. यापुर्वीच शेतकऱ्यांना धानाची खरेदी करावी लागणार आहे. अशातच नोंदणी एका केंद्रावर आणि खरेदी दुसऱ्या केंद्रावर केल्यावर बिलाला अडचणी येतील अशी शेतकऱ्यांची मानसिकता झाली आहे.त्यामुळे पूर्वीप्रमाणे सौंदड येथील खरेदी केंद्रावरच धान घ्यावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी गोंधळ घातला आहे.

Gondia : धान खरेदी केंद्रावर सुविधांपेक्षा अडचणी अधिक, ऑनलाईन नोंदणी होत नसल्याने खरेदी रखडली
धान पिकाच्या विक्रीवरुन गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर एकच गोंधळ घातला
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 3:57 PM

गोंदिया : यंदाच्या हंगामात (Paddy Crop) धान खरेदी केंद्रावर विक्रीपेक्षा येथील असुविधा आणि शेतकऱ्यांची केलेली गैरसोय यामुळेच जिल्ह्यातील केंद्र ही चर्चेत राहिलेली आहेत. आता कुठे (Irregularities in procurement) खरेदीमधील अनियमितता प्रकरण मिटले आहे. असे असतानाच येथील खरेदी केंद्रावर ऑनलाईनची नोंदणीच होत नसल्याने शेतकऱ्यांचे धान्य घेतले जात नाही. त्यामुळे खरेदी केंद्र उभारुन तरी काय उपयोग अशी नाराजी शेतकरी व्यक्त करीत आहेत. जिल्ह्यातील अर्जुनी तालुक्यातील खरेदी केंद्रावर हा गोंधळ उडाला आहे. धानाची ऑफलाईन खरेदी केल्यावर त्याची दुसरीकडे (Online) ऑनलाईन नोंदणी होणे गरजेचे असते, पण तसे होत नाही. त्यामुळे खरेदी केंद्रावरील कर्मचारी आणि शेतकरी यांच्यामते मतभेदही निर्माण झाले आहेत. आता हा निर्णय जिल्हा मार्केटींग अधिकारी यांच्याकडे आहे. त्यामुळे काय निर्णय होणार हे पहावे लागणार आहे.

पर्यायी मार्गही ठरला अडचणीचा

सौंदड येथील सहकारी भात गिरनी येथील धान खरेदी केन्द्रने परिसरातिल शेतकऱ्यांची धान खरेदी केली. मात्र अचानक या संस्थेची मान्यता रद्द झाल्याने धान खरेदी करण्यास शासनाने नकार दिला. त्यामुळे शासनाच्या पोर्टल वर ऑनलाइन नोंदणी होत नसल्याने ऑफ लाइन खरेदी केलेला धान परत करण्याची वेळ केंद्र सचालकांना आली. यावर पर्याय म्हणून गिरोला हेटी येथील केंद्रावर धानाची खरेदी होईल असे सांगण्यात आले होते पण आता खरेदीचे तीनच दिवस उरले असताना बिले कसी अदा होणार. त्यामुळे सौंदड येथील केंद्रावरच खरेदी करुन घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

शेतकऱ्यांची नेमकी अडचण काय ?

धान खरेदीची अंतिम मुदत ही 31 ऑगस्ट ही असणार आहे. यापुर्वीच शेतकऱ्यांना धानाची खरेदी करावी लागणार आहे. अशातच नोंदणी एका केंद्रावर आणि खरेदी दुसऱ्या केंद्रावर केल्यावर बिलाला अडचणी येतील अशी शेतकऱ्यांची मानसिकता झाली आहे.त्यामुळे पूर्वीप्रमाणे सौंदड येथील खरेदी केंद्रावरच धान घ्यावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी गोंधळ घातला आहे. आता यावर जिल्हा मार्केटींग अधिकारी हे काय तोडगा काढतात हे पहावे लागणार आहेत.

हे सुद्धा वाचा

खरेदीविनाच धानाची वापसी

खुल्या बाजारपेठेपेक्षा खरेदी केंद्रावर अधिकचा दर मिळतो म्हणून याच ठिकाणी धानाची घालण्याची शेतकऱ्यांची धडपड असते. पण खरेदी केंद्रचालकांच्या मनमानी कारभारामुळे धानाची खरेदी तर होत नाही पण इतर बाबींचाच अधिकचा सामना करावा लागतो. सौंदड धान खरेदी केंद्रातून धान परत करताच शेतकऱ्यांनी एकच गोंधळा घातला. यावेळी परिसरातील 100 शेतकरी उपस्थित होते.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.