AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रब्बी हंगामातील पिकांचे योग्य व्यवस्थापनच उत्पादनवाढीचा मार्ग, काय आहे शेतकऱ्यांना सल्ला?

वातावरणातील बदलाचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर होत आहे. सध्या पीक वाढीच्या अवस्थेत असतानाच होत असलेले बदल हे थेट उत्पादनावर परिणामकारक ठरणार आहे. त्यामुळे रब्बी हंगामाच्यादृष्टीने महत्वाचा काळ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या दरम्यानच्या काळात योग्य ती निघराणी केली तरच उत्पादनात वाढ होणार आहे.

रब्बी हंगामातील पिकांचे योग्य व्यवस्थापनच उत्पादनवाढीचा मार्ग, काय आहे शेतकऱ्यांना सल्ला?
रब्बी हंगामातील ज्वारी
| Updated on: Feb 01, 2022 | 2:03 AM
Share

मुंबई : वातावरणातील बदलाचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर होत आहे. सध्या पीक वाढीच्या अवस्थेत असतानाच होत असलेले बदल हे थेट उत्पादनावर परिणामकारक ठरणार आहे. त्यामुळे (Rabi Season) रब्बी हंगामाच्यादृष्टीने महत्वाचा काळ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या दरम्यानच्या काळात योग्य ती निघराणी केली तरच उत्पादनात वाढ होणार आहे. पीके वाढीच्या अवस्थेत असताना त्यामुले पेरणीच्या दरम्यान गंधक आणि बिजप्रक्रीया केली नसेल तर आता पान कुरतडणाऱ्या (Pest Outbreak) अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे पानावर कीडीचा प्रादुर्भाव होत असल्याचे लक्षात येताच उभ्या पिकामध्ये 1 किलो झिंक सल्फेट आणि 500 ग्रॅम चुना हा पाण्यात मिसळून 15 दिवसाच्या अंतराने 2 ते 3  (Crop Spray) फवारण्या कराव्या लागणार आहेत. त्याचप्रमाणात मँगॅनीजची कमतरता असलेल्या जमिनीत 200 लिटर पाण्यात 1किलो मॅंगनीज सल्फेट विरघळवून पहिल्या सिंचनाच्या 2 दिवस आधी 0.5% लोह सल्फेटचे द्रावण फवारावे लागणार आहे. यानंतर गरजेनुसार एका आठवड्याच्या अंतराने फवारण्या केल्या तर पिकाची वाढ अधिक जोमात होणार आहे.

पिकांकडील दुर्लक्ष होऊ शकते नुकसानीचे

पाच महिने उभ्या असलेल्या गव्हाला एकूण काळात सुमारे 35 ते 40 मीटर पाणी लागते. गहू या पिकाला लोंब्याची लागण होईपर्यंत पाण्याची आवश्यकता असते. या दरम्यान, जर वेळेवर पाणी दिले नाही तर उत्पादनात घट होण्याचा धोका कायम असतो. चांगल्या प्रतीची शेतजमिन असेल 4 वेळेस आणि हलक्या प्रतीची जमीन असेल 6 वेळेस पाणी देणे गरजेचे आहे. कमी तापमानात गव्हावर कोणत्या कीडीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका कमी असतो. मात्र, बुरशीजन्य रोगाचा धोका हा कायम असतो. त्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव होताच कृषी तज्ञांच्या सल्ल्यानुसार औषध फवारणी ही महत्वाची आहे. तर गव्हाच्या क्षेत्रात उंदराचाही धोका असतो. त्यामुळे उंदरापासून बचावासाठी झिंक फॉस्फाइड किंवा अॅल्युमिनियम फॉस्फाइड टिकियापासून बनवलेला चारा शेतामध्ये जागोजागी ठेऊन त्यांचा बंदोबस्त हा करतो येतो.

गारठ्यामध्ये पिकांचे नुकसान

थंडी तशी रब्बी हंगामातील पिकांना पोषक असते मात्र, मध्यंतरीच्या गारठ्याप्रमाणे वातावरण झाल्यास पिकांचे नुकसान होते. पीक वाढीवर त्यााच परिणाम होतो. अशा वेळेस आकाश निरभ्र झाल्यासच योग्य ती फवारणीन करणे फायद्याचे ठरते. वातावरण ढगाळ किंवा धुक्याचे असताना केलेली फवारणी पिकांसाठी धोकादायक होऊ शकते. त्यामुळे वातावरणाचा अंदाज घेऊनच केलेली फावरणी फायद्याची ठरणार आहे. नर्सरी तयार केली असेल तर रात्री चादरीने झाकून ठेवा. स्ट्रॉचा उपयोग वनस्पतींना आच्छादित करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. गारपीट झाल्यास शेतकऱ्यांना हलके सिंचन करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

Crop Insurance : यंदाचाच नव्हे गेल्या तीन वर्षापासूनच्या पीकविमा रकमेच्या प्रतिक्षेत आहेत ‘या’ मंडळातील शेतकरी

Agricultural prices : पणन मंडळाचा उपक्रम, आता घरबसल्याच शेतकऱ्यांना कळणार शेतीमालाचे दर

Kharif Season : हंगाम सुरु होताच तुरीची विक्रमी आवक, मोजमापसाठी दोन दिवसाचा कालावधी..!

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.