काय सांगता ? जांभूळ उत्पादकांनाही मिळणार अनुदान, पण कशासाठी? वाचा सविस्तर

पालघर तालुक्यातील जांभूळ उत्पादकांना झाडावरील जांभूळ काढण्यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी अनुदान देण्यात येणार आहे. परांचीसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हे अनुदान दिले जाणार असून याकरिता 10 लाखाच्या निधीची तरतूदही करण्यात आली आहे.

काय सांगता ? जांभूळ उत्पादकांनाही मिळणार अनुदान, पण कशासाठी? वाचा सविस्तर
जांभूळ काढणीसाठीही आता जाभूळ उत्पादकांना अनुदान देण्याचा निर्णय पालघर जिल्हा परिषदेने घेतला आहे.
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 10:19 AM

पालघर : शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी या अनुशंगाने (State Government) राज्य आणि केंद्र सरकारचे कायम प्रयत्न राहिलेले आहेत. केवळ उत्पादनात वाढच नाहीतर शेतकऱ्यांचे हीत जोपासतही अनुदान देण्याचा निर्णय अनेक वेळा सरकारने घेतलेला आहे. आता पालघर तालुक्यातील (Purple Growers) जांभूळ उत्पादकांना झाडावरील जांभूळ काढण्यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी अनुदान देण्यात येणार आहे. परांचीसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हे (Subsidy) अनुदान दिले जाणार असून याकरिता 10 लाखाच्या निधीची तरतूदही करण्यात आली आहे. पालघर तालुक्यातील बहाडोली हे गाव जांभळासाठी प्रसिध्द आहे. मात्र, झाडावरील जांभळे तोडण्याच्या परांची तयार करण्यासाठीचा खर्च अधिक असल्याने शेतकऱ्यांची अडचण होत होती. त्यामुळे याकरिता शासकीय मदत मिळते का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष होते अखेर शेतकऱ्यांची ही मागणी पूर्ण झाली असून निधीचीही तरतूद करण्यात आली आहे.

कशा पध्दतीने बनते परांची?

झाडावरील जांभूळ काढण्यासाठी विशिष्ट प्रकारची परांची बनवली जाते. यामध्ये अधकितर बांबूचा वापर केला जातो. जांभळाच्या फांद्या ह्या कडक असल्याने त्यावर चढून फळे काढणे शक्य नाही. त्यामुळे झाडाला गोलाकार पध्दतीने बांबूचा वापर करुन परांची तयार करतात. त्या परांचीवर चढून अलगद फळे काढली जातात. त्यामुळे मोठ्या झाडाला 100 तर लहान झाडाला किमान 70 बांबूची गरज असते. शिवाय बांबू एकमेकांना बांधण्यासाठी रस्सीचीही आवश्यकता असते. त्यामुळे एका झाडासाठी शेतकऱ्यास किमान 20 हजाराचा खर्च येतो. यामुळे परांचीसाठी अनुदान मिळावी ही मागणी शेतकऱ्यांची होती. अखेर याला ग्रीन सिग्नल मिळाल्याने शेतकऱ्यांची मोठी समस्या मिटलेली आहे.

एकाच गावात 6 हजार जांभळाची झाडे

पालघर तालुक्यातील बहाडोली गाव हे जांभळासाठी प्रसिध्द आहे. येथील जांभळाची चवच न्यारी असून येथील जांभूळ सबंध राज्यात प्रसिध्द आहे. मार्च महिन्यात जांभळाच्या झाडावरील फळे तयार होतात. एकट्या बहाडोली गाव शिवारात 6 उच्च प्रतीच्या जांभाळाच्या झाडांची लागवड आहे. येथील वातावरण पोषक असल्याने यामध्ये वाढ होत आहे. उत्पादन मोठ्या प्रमाणात असल्याने हे फळ काढण्यासाठी विशिष्ट प्रकारचे पारंची बनवावी लागते. यामध्ये मोठ्या प्रमाणात बांबूचा वापर केला जातो. शिवाय हे खर्चिक असल्याने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून परांचीसाठी लागणाऱ्या बांबूसाठी 10 लाखाच्या निधीची तरतूद केल्याचे जिल्हा परिषद सदस्या नीता पाटील यांनी सांगितले आहे.

चक्रीवादळात झाले होते मोठे नुकसान

वातावरणातील बदलाचा परिणाम पिकांसह फळबागांवरही झाला आहे. अगदी त्याचप्रमाणे जांभूळ उत्पादकांनाही मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. या वादळामुळे उत्पादनात घट होण्याचा धोका आहे. त्यामुळे परांचीसाठी अनुदान मिळावे अशी मागणी करण्यात आली होती. शेतकऱ्यांची अवस्था आणि गरज लक्षात घेऊन 10 लाखाचे अनुदान दिले जाणार आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस फळे तयार होऊन त्याची काढणी केली जाणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

दुहेरी संकट : वाढत्या थंडीने द्राक्षांची फुगवण थांबली अन् तडकण्याचा धोकाही वाढला

काळाच्या ओघात लोप पावलेल्या ‘बरबडा’ मिरचीचा पुन्हा ठसका, काय आहे वेगळेपण?

पीएम किसान योजनेत महत्वपूर्ण बदल, ‘या’ कागदपत्राशिवाय मिळणार नाही आता लाभ

Non Stop LIVE Update
राज्यातील सर्वंच आमदारांना अनुभव येणार, जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य काय
राज्यातील सर्वंच आमदारांना अनुभव येणार, जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य काय.
नकाबचा जवाब द्यावाच लागेल, फडणवीसांच्या पत्रावरून मनसेचं काय म्हणणंय?
नकाबचा जवाब द्यावाच लागेल, फडणवीसांच्या पत्रावरून मनसेचं काय म्हणणंय?.
मी बकरा नाही तर...नीलम गोऱ्हे यांच्या 'त्या' टीकेवर राऊतांचा पलटवार
मी बकरा नाही तर...नीलम गोऱ्हे यांच्या 'त्या' टीकेवर राऊतांचा पलटवार.
नांदेडमधील मैदान मराठ्यांच्या गर्दीनं कच्चून भरलं, नुसत भगवं वादळ
नांदेडमधील मैदान मराठ्यांच्या गर्दीनं कच्चून भरलं, नुसत भगवं वादळ.
मलिकांबाबत व्यक्त केलेल्या तीव्र भावनांचा आनंद पण.. दानवेंचा लेटरबॉम्ब
मलिकांबाबत व्यक्त केलेल्या तीव्र भावनांचा आनंद पण.. दानवेंचा लेटरबॉम्ब.
मलिक अजितदादांसोबत गेल्यावर मज्जा येईल, बच्चू कडूंचं मिश्कील भाष्य काय
मलिक अजितदादांसोबत गेल्यावर मज्जा येईल, बच्चू कडूंचं मिश्कील भाष्य काय.
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत...
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत....
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्..
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्...
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला.
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी.