दुहेरी संकट : वाढत्या थंडीने द्राक्षांची फुगवण थांबली अन् तडकण्याचा धोकाही वाढला

वाढत्या थंडीमुळे द्राक्ष बागांमधील वातावरण उबदार रहावे म्हणून शेतकरी रात्रीचा दिवस करुन शेकोट्या पेटवत आहे पण थंडीचा जोर अधिकच वाढत असल्याने द्राक्षांची फुगवण तर थांबली आहेच पण मणी तडकण्याचा धोका अधिक वाढला आहे.

दुहेरी संकट : वाढत्या थंडीने द्राक्षांची फुगवण थांबली अन् तडकण्याचा धोकाही वाढला
वाढत्या थंडीमुळे द्राक्ष बागांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेकोट्या पेटवून ऊब दिली जात असल्याचे चित्र नाशिक जिल्ह्यात आहे.
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 9:39 AM

नाशिक : गेल्या वर्षभरापासून द्राक्ष बागांवर सुरु असलेली संकटाची मालिका आता द्राक्षांची तोडणी सुरु असताना दुपटीने वाढलेली आहे. वातावरणात होत असलेला बदल आता थेट उत्पादनावरच परिणाम करणारा आहे. (Increase in winter) वाढत्या थंडीमुळे ( Vineyards) द्राक्ष बागांमधील वातावरण उबदार रहावे म्हणून शेतकरी रात्रीचा दिवस करुन शेकोट्या पेटवत आहे पण थंडीचा जोर अधिकच वाढत असल्याने  (Grape) द्राक्षांची फुगवण तर थांबली आहेच पण मणी तडकण्याचा धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणापुढे शेतकरी हा हतबल होताना पाहवयास मिळत आहे. आतापर्यंत कीड-रोगराईच्या सुरक्षतेसाठी वेळोवेळी फवारणीची कामे केली पण आता थेट घडावरच परिणाम होत असल्याने उत्पादनात मोठी घट होण्याचा धोका कायम आहे. उत्तर भारतामध्ये थंडीची लहर असून निफाडचा पारा 4.5 अंशावर आहे.

उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरुच

नाशिक जिल्ह्यात काही भागात द्राक्ष तोडणीचे काम सुरु आहे तर काही ठिकाणी मशागतीचे अंतिम टप्प्यात आहे. वाढत्या गारठ्यामुळे परिपक्व अवस्थेतील द्राक्षामधून पाणी उतरण्याचा धोका असतो. त्यामुळे शेतकरी थंडी वाढताच रात्रीच्या वेळी बागांमध्ये शेकोट्या पेटवतात. तर बागांच्या पेशीचे कार्य सुरु ठेवण्यासाठी ठिबकच्या माध्यमातून पाणी देण्याचेही काम सुरु आहे. वर्षभर तळहाताच्या फोडाप्रमाणे द्राक्ष बागा जोपासल्या गेल्या आहेत. आता अंतिम टप्प्यात पडेल ते काम करुन उत्पादन पदरी पाडून घेण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे.

अवकाळीनंतर वाढत्या थंडीचा परिणाम

यंदा महिन्याला अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. द्राक्षाला घड लागण्याच्या अवस्थेपासून या वातावरण बदलाचा सर्वाधिक परिणाम हा द्राक्ष बागांवर झालेला आहे. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुले मिल्ड्यू रोगाचा धोका वाढला होता. यावर बुरशीनाशक फवारुन शेतकऱ्यांनी नियंत्रण मिळवले मात्र, सध्याच्या अवस्थेत शेतकऱ्यांना काहीच करता येत नाही अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे थंडीपासून बचाव होण्यासाठी शेकोट्या पेटवून घड सुरक्षित ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकरी करीत आहेत.

किमान वीजपुरवठा तरी सुरळीच व्हावा

सध्याच्या वातावरणामुळे द्राक्षांची फुगवण तर थांबली आहे पण अधिकच्या गारठ्यामुळे मणीही तडकत आहे. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये पहाटे पाणी देऊन द्राक्षवेलींच्या मुळ्या सक्रीय ठेवल्या तर धोका कमी होतो. मात्र, याकरिताही अडचण आहे ती भारनियमनाची. द्राक्ष बागायतदार चौही बाजूने अडचणीत आहे. त्यामुळे किमान काही दिवस तरी विद्युत पुरवठा सुरळीत ठेवला तरी उत्पादन घटण्याचा धोका कमी होणार आहे. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी द्राक्ष समितीचे अध्यक्ष पानगव्हाणे यांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

काळाच्या ओघात लोप पावलेल्या ‘बरबडा’ मिरचीचा पुन्हा ठसका, काय आहे वेगळेपण?

पीएम किसान योजनेत महत्वपूर्ण बदल, ‘या’ कागदपत्राशिवाय मिळणार नाही आता लाभ

Cabbage : केशरी रंगाचा कोबी ; 10 हजाराचा खर्च अन् 80 हजाराचे उत्पादन, उत्पन्न वाढीचा उत्तम मार्ग

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.