Jalgaon : पावसाचा जोर कायम, हतनुरचे 4 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले, तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

हतनुर धरणाचे 4 दरवाजे पूर्ण क्षमतेने आणि 20 दरवाजे हे 1 मीटरने उघडण्यात आल्याने तापी नदीपात्रात अचानक पाणी वाढले आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांचे नुकसान होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात नदीकाठी शेती असलेल्या शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

Jalgaon : पावसाचा जोर कायम, हतनुरचे 4 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले, तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
हतनुर धरणाचे 4 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 10:44 AM

जळगाव : हंगामाच्या सुरवातीला (Monsoon) मान्सूनचा लहरीपणा अनुभवयास मिळाला असला तरी जुलैच्या 1 तारखेपासून सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. त्याचेच परिणाम आता राज्यात पाहवयास मिळत आहेत. उत्तर महाराष्ट्रात सुरवातीपासूनच वरुणराजाची कृपादृष्टी राहिलेली आहे. त्यामुळेच भुसावळ तालुक्यातील  (Hatnur Dam) हतनुर धरणाचे 4 दरवाजे हे आता पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. यापूर्वी कमी प्रमाणात (Discharge of water) पाण्याचा विसर्ग सुरु होता पण गेल्या 8 दिवसांपासून पावसाचा जोर वाढत असल्याने 4 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्याल आले आहेत तर 20 दरवाजे एक मीटरने उघडले आहेत.

38 हजार 105 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

धरणातील अधिकच्या पाणीसाठ्याने नुकसान होऊ नये म्हणून एक विशिष्ट पातळी ओलांडल्यानंतर दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरु केला जातो. सध्या हतनुर धरणामध्ये पाणीपातळी ही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे 38 हजार 105 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा तापी नदी पात्रात सुरु करण्यात आला आहे. वाढत्या पाणीपातळीमुळे प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागला असून आता तापी नदीकाठच्या 26 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.

26 गावांना सतर्कतेचा इशारा

हतनुर धरणाचे 4 दरवाजे पूर्ण क्षमतेने आणि 20 दरवाजे हे 1 मीटरने उघडण्यात आल्याने तापी नदीपात्रात अचानक पाणी वाढले आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांचे नुकसान होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात नदीकाठी शेती असलेल्या शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पाणी साठ्यात वाढ होत असल्याने हा निर्णय घ्यावा लागला आहे. शिवाय अजूनही विदर्भात पावसाचा जोर वाढला तर परस्थितीनुसार निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे हतनुर धरणाची स्थिती?

हतनुर धरणातील पाणी पातळी क्षमता ही 209.68 मीटर एवढी आहे. तर सध्या 184.40 दलघमी पाणीसाठा धरणात आहे. एकूण क्षमतेच्या 47 टक्के पाणीसाठा असला तरी ज्या तुलनेत पाण्याची आवक आहे त्यामुळे विसर्ग करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे 1079 क्युमेक्स व 38105 क्युसेसने विसर्ग करण्यात आला आहे. अशा स्थितीमध्ये 4 दरवाजे पूर्ण क्षमतेने तर 20 दरवाजे हे 1 मीटरने उघडण्यात आले आहेत.

Non Stop LIVE Update
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.