AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kharif Season : भलरीची गाणे अन् शेतकऱ्यांचा उत्साह, भात शेतीने फुलतोय भोर तालुक्याचा शिवार..!

पूर्वमोसमी पाऊस बरसल्या नंतर बराच काळ पावसानं ओढ दिल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवेल का कायं? अशी भीती होती. मात्र जुलैच्या सुरुवाती पासूनचं वरुनराजाची दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेती कामांना वेग आला आहे. दुबार पेरणीचे संकट टळले आहे. आता भात शेतीवर शेतकऱ्यांचा भर आहे.

Kharif Season : भलरीची गाणे अन् शेतकऱ्यांचा उत्साह, भात शेतीने फुलतोय भोर तालुक्याचा शिवार..!
राज्यात भात लागवडीला वेग आला आहे.
| Edited By: | Updated on: Jul 11, 2022 | 10:05 AM
Share

पुणे : (Heavy Rain) पावसाने शेती व्यवसयाचे चित्र कसे बदलते याचे प्रत्यय सध्या राज्यात येत आहे. मराठवाडा, विदर्भात खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर या पिकांनी शिवार हिरवागार झाला आहे तर पुण्यातील भोर तालुक्यात भलरीची गाणे गात बळीराजा (Paddy cultivation) भात लागवड करीत आहे. ही सर्व निसर्गाची कृपा असून गेल्या 10 दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा उत्साह दुणावला आहे. एकमेकांना स्फूर्ती मिळावी यासाठी समूहाने गाणी म्हणून थकवा दूर केला जातो. सध्या या भलरी गीतांचे स्वर ग्रामीण भागातील शेतात ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे (Agricultural activities) शेती कामे तर वेगात होतच आहेत पण अनुकूल वातावरण निर्माण होत आहे. शिवाय चारसूत्री कार्यक्रम राबवून ही लागवड केली जात असल्याने उत्पादनातही वाढ होईल अशी अपेक्षा आहे.

दुबार पेरणीच संकट टळलं अन् चित्रच बदललं

पूर्वमोसमी पाऊस बरसल्या नंतर बराच काळ पावसानं ओढ दिल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवेल का कायं? अशी भीती होती. मात्र जुलैच्या सुरुवाती पासूनचं वरुनराजाची दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेती कामांना वेग आला आहे. दुबार पेरणीचे संकट टळले आहे. आता भात शेतीवर शेतकऱ्यांचा भर आहे. भोर तालुक्यात गेल्या काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने ओढा,वाहळ,परिसरातील भात खाचरे पाण्याने वाहू लागलीयेत. त्यामुळं या परिसरात भात लावणीला कामांना वेग आला आहे. भात पीक हेच खरिपातील मुख्य पीक आहे तर यावरच शेतकरी कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो.

पारंपरिक भलरीच्या गाण्यावर भात लागवड

भात लावणी करताना पारंपरिक भलरीची गाणी भात खाचरात धुमधूमू लागली आहेत. गाणी गुणगुणत भात लावणी सुरू असल्याचं चित्र सध्या जागोजागी पाहायला मिळतंय.भात लावणी करताना वरून कोसळणारा मुसळधार पाऊस आणि चिखलात ही लावणी करावी लागते. त्यामुळे शारीरिक थकवा येतो, अशी कष्टाची कामे करताना थकवा जाणवू नये, श्रमपरिहार व्हावा, लावणी करताना उत्साह वाढावा म्हणून भलरीची गाणी गायली जात असतात. शिवाय यामुळे वेळ कसा जातो हे कळतं नाही , लावणी लवकर होते. पुर्वी जंगलाचे प्रमाण जास्त होते,जनावर, प्राणी शेतात किंवा परिसरात असेल तर या आवाजाने जनावरे पळून जातात.

चारसूत्री कार्यक्रम राबवून रोवणी

भाताची लागवड करताना दोन्ही रोपांमधील अंतर 15*25 सेंटीमाटर ते 15*25 असे ठेवावे लागणार आहे. प्रत्येक सरीमध्ये आलटूनपालटून असेच अंतर ठेवणे गरजेचे आहे. भात लागवडीसाठी चिखलणी करताना गिरिपुष्पाची हिरवी पाने मिसळावीत. सुधारित लावणी दोरीवर 15 सें.मी. अंतरावर असलेल्या प्रथम एक व नंतर दुसरा चूड लावावा. अंदाजाने 15 सें.मी. पुढे आणखी तिसरा व चौथा चूड लावावा. अशा प्रकारे एका वेळी जोड-ओळ पद्धत वापरून त्याच दोरीत लावणीचे काम पूर्ण करावे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.