मराठवाड्यात नुकसानीचा पाऊस, 300 जनावरांचा मृत्यू, फळबागाही आडव्या

खरीप हंगामाच्या अंतिम टप्यात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठाड्यात झालेल्या पावसामुळे खरीप पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. नगर जिल्ह्यातील 90 जनावरांचा मृत्यू झाला तर 100 हून अधिक जनावरे ही बेपत्ता आहेत. राजकीय नेत्यांनी पाहणी दौरे सुरू केले आहेत.

मराठवाड्यात नुकसानीचा पाऊस, 300 जनावरांचा मृत्यू, फळबागाही आडव्या
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 03, 2021 | 5:43 PM

मुंबई : खरीप हंगामाच्या अंतिम टप्यात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठाड्यात झालेल्या पावसामुळे खरीप पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. पीक ऐन पदरात पडण्याच्या प्रसंगी पावसाने हाहाकार केल्याने केवळ पीकेच नाही तर शेत जमिनही खरबडून गेली आहे. नगर जिल्ह्यातील 90 जनावरांचा मृत्यू झाला तर 100 हून अधिक जनावरे ही बेपत्ता आहेत. राजकीय नेत्यांनी पाहणी दौरे सुरू केले आहेत. पण केवळ पाहणी न करता प्रत्यक्ष मदतीची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. (Rain Damaged kharip crop,300 animals killed, orchards horizontal)

मध्यंतरी तीन आठवडे पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे खरीपातील पीके वाया जाणार असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, गेल्या चार दिवसांपासून मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. सलग चार दिवस पाऊस बरसल्याने खरीपातील उडीद, मूग पीकाचे नुकसान झाले आहे तर फळबागाही आडव्या झाल्याचे चित्र बीड, अहमदनगर जिल्ह्यात आहे. नगर जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी या तालुक्यातील सर्वच मंडळास सरासरीच्या तुलनेत पाचपट अधिक पाऊस झाला आहे. शिवाय देवगाव, रतडगाय, पोखर्डी, जेऊर, डोंगरगण या गावातील घरांचीही पडझड झाली आहे. शेती आणि पीकाचेच नाही तर जनानरेही दगावलेली आहेत. सर्वाधिक फटका हा शेवगाव येथील शेतकऱ्यांचे बसलेला आहे. याच तालुक्यातील 81 जनावरे ही बेपत्ता असून मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बीड जिल्ह्यातील कडा, आष्टी परीसरात पपईच्या फळबागा ह्या उध्वस्त झाल्या आहेत. पावसामुळे कोट्यावधीचे नुकसान झाले असून सरकारने तातडीने मदत करण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. (Rain Damaged kharip crop,300 animals killed, orchards horizontal)

कांदे वाहून गेले अन् पपई पाण्यात पोहतेय साहेब

पावसाविना खरीपातली नगदी पीकं वाया गेली तर राहिलं-साहिल्यां फळबागा पावसाने हिरावून घेतल्या…सांगा जगाचयं कस? असा खडा सवालच बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या समोर कडा येथील शेतकऱ्याने उपस्थित केला. केवळ पाहणी नको तर प्रत्यक्ष मदत त्वरीत देण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. तर नगर जिल्ह्यात राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे, डॅा. सुजय विखे-पाटील, आ. मोनिका जावळे, शिवाजीराव काकडे, हर्षदा काकडे, जिल्हाधिकारी डॅा. राजेंद्र भोसले यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला.

शेतकऱ्यांना दुहेरी फटका

हात ऊसने पैसे घेऊन शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली. परंतू, अगोदर पाऊस नसल्याने खरीपातील सोयाबीन, उडीद या पीकांचे नुकसान झाले आहे. याचा परिणाम उत्पादनावर तर होणारच आहे शिवाय फळबागांचीही पडझड झाली आहे. त्यामुळे पदरी ऊत्पन्न नाहीच परंतू शेतकऱ्यांना खरीपातून झळच बसलेली आहे.

काळजी करूच नका : पालकमंत्री धनंजय मुंडे

बीड जिल्ह्यातील आष्टी, कडा परिसरात पावसामुळे खरीपासह फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीकांची पाहणी केली. शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. यावेळी धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना धीर देत काळजी करु नकात नुकसान भरपाई दिल्याशिवाय शांत बसणार नसल्याचे सांगितले.

संबंधित इतर बातम्या :

मिरची नेमकी कुणाला झोंबली? मिरचीला पीक विम्यातून वगळल्याने शेतकरी हतबल

नागपुरातील कृषी साहित्य वाटपातील भ्रष्टाचाराची चौकशी होणार, कृषी विभागाकडून आदेश

कांद्याचा – वांदाच, आवक घटूनही दर घसरलेलेच

Non Stop LIVE Update
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.