AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेरलं तरच उगवेन..आगामी खरिपासाठी कशी राबवली जातेय बीजोत्पादन प्रक्रिया, शेतकऱ्यांचा सहभागही महत्वाचा

उन्हाळी हंगामातील सोयाबीन चांगले बहरले तर याच सोयाबीनचे बियाणे आगामी खरीप हंगामासाठी केले जाते. त्यामुळे महाबीजच्या वतीने परभणी विभागात 6 हजार 996 हेक्टरावर हा बीजोत्पदनाचा कार्यक्रम राबवला जात आहे.

पेरलं तरच उगवेन..आगामी खरिपासाठी कशी राबवली जातेय बीजोत्पादन प्रक्रिया, शेतकऱ्यांचा सहभागही महत्वाचा
सोयाबीन बिजोत्पादन
| Edited By: | Updated on: Nov 26, 2021 | 3:02 PM
Share

परभणी : आगामी खरीप हंगामाच्या दृष्टीने सध्याचा उन्हाळी हंगाम महत्वाचा आहे. कारण यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हेच नुकसान भरुन काढण्यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरु झाले आहेत. कारण (summer season) उन्हाळी हंगामातील सोयाबीन चांगले बहरले तर याच सोयाबीनचे बियाणे आगामी खरीप हंगामासाठी केले जाते. त्यामुळे महाबीजच्या वतीने परभणी विभागात 6 हजार 996 हेक्टरावर (seed production process) हा बीजोत्पदनाचा कार्यक्रम राबवला जात आहे.

परभणी विभागात हिंगोली, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, परभणी आणि सोलापूर जिल्ह्याचा समावेश होतो. या सहा जिल्ह्यांमध्ये हा बीजोत्पदनाचा कार्यक्रम राबवला जात आहे. एवढेच नाही तर शेतकऱ्यांनी बियाणांसाठी सोयाबीनचा पेरा करावा यासाठी प्रोत्साहनपर अनुदान आणि बोनस दिला जाणार आहे.

यंदाच्या हंगामात भासली टंचाई

शेतकऱ्यांना बियाणे कमी पडू नये याची काळजी दरवर्षी घेतली जाते. त्यानुसार यंदाही परभणी विभागाच्या वतीने 17 हजार 892 हेक्टरावर सोयाबीनचा बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात आला. मात्र, बियाणाला देखील पावसाचा फटका बसला होता. पावसात बियाणे भिजल्याने केवळ 2 लाख 99 हजार 669 एवढे बियाणे अपेक्षित होते. मात्र, 2 लाख 17 हजार क्ंविंटलच बियाणे उपलब्ध होऊ शकते. त्यामुळेच पुढे बियाणांची टंचाई भासू नये म्हणून ही बीजोत्पादन कार्यक्रम राबविला जात आहे.

असा होणार शेतकऱ्यांना फायदा

येत्या उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी शेतकऱ्यांकडून बियाणे खरेदी करतांना यंदाच्या खरिपातील सोयाबीनला डिसेंबर-जानेवारी महिन्यात बाजार समित्यांमध्ये मिळालेले उच्चतम दर दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकरी या बीजोत्पादन कार्यक्रमात सहभाग नोंदवून आपले उत्पादन देखील वाढू शकरणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांना महाबीजकडे नोंदणी करावी लागणार आहे. याशिवाय अधिक प्रोत्साहन अनुदान, अधिक बोनस या पद्धतीने सोयाबीन बियाणाला दर दिला जाणार आहे.

बीजोत्पादन करताना काय काळजी घ्यावी लागते?

हंगामापूर्वी केले जाणारे बीजोत्पादनावरच त्या हंगामातील उत्पादनक्षमता ही अवलंबून असते. त्यामुळे योग्य काळजी घेतली तरच शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे. त्यामुळे कोणत्याही वाणाची वाणाची उत्पादन क्षमता ही त्याच्या अनुवंशिक गुणधर्मावर आधारीत असते. त्यामुळे उत्पादन क्षमता पिढ्यानिपढ्या टिकून ठेवायची असेल तर यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ असू नये हे सर्वात महत्वाचे आहे. बियाणामध्ये भेसळ ही पेरणी, काढणी, मळणी व पिशवीत भरण्यापूर्वी कधीही होऊ शकते. त्यामुळे 100 टक्के भेसळ टाळून बीजोत्पादन करणे महत्वाचे आहे.

असे मिळावावे प्रमाणीत बियाणे

येत्या उन्हाळी हंगामात सोयाबीनच्या एमएयूएस 71, एमएयूएस 162, एमएयूएस 612, फुले किमया, फुले संगम या वाणांचा 6 हजार 996 हेक्टरवर बीजोत्पादन प्रस्तावित आहे. बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना सातबारा, आधार कार्ड, बॅंक पासबूकची झेरॅाक्स ही जिल्हा महाबीज कार्यालयात जमा करावे लागणार आहे. त्यानंतरच आरक्षण करुन घेतले जाणार असल्याचे विभागीय व्यवस्थापक ए. एल. सोनोने यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

सोयाबीनच्या दरही वाढले अन् आवकही, 7 हजाराकडे वाटचाल

…अखेर कृषी आयुक्तांचे भाकित खरे ठरले, काय होते केंद्र सरकारला लिहलेल्या पत्रात?

खरीप अंतिम टप्प्यात तरीही शेतकऱ्यांना विमा रकमेचीच प्रतिक्षा, वाढीव विमा रकमेसाठी राष्ट्रवादीचा रास्तारोको

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.