खरीपाच्या अंतिम टप्प्यात हमीभाव केंद्रचा आधार, किनवटमध्ये खरेदी केंद्र

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य दर मिळावा म्हणून जिल्ह्यातील पहिले खरेदी केंद्र हे किनवटमध्ये सुरु करण्यात आलेले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. अखेर खरेदी केंद्र सुरु झाल्याने शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळणार आहे.

खरीपाच्या अंतिम टप्प्यात हमीभाव केंद्रचा आधार, किनवटमध्ये खरेदी केंद्र
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 4:00 PM

नांदेड : शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य दर मिळावा म्हणून जिल्ह्यातील पहिले खरेदी केंद्र (Grain Procurement Centre, ) हे किनवटमध्ये सुरु करण्यात आलेले आहे. (Nanded) गेल्या अनेक दिवसांपासून खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. अखेर खरेदी केंद्र सुरु झाल्याने शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळणार आहे. राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळातर्फे हे किनवट तालुक्यात हे खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. आता शेतकऱ्यांना 31 जानेवारीपर्यंत शेतीमाल या केंद्रावर विक्री करता येणार आहे.

यंदा पावसामुळे खरीप पीकांची काढणी लांबणीवर पडलेली होती. शिवाय बाजार भावापेक्षा हमीभावाचा दर हा कमी असल्याने खरेदी केंद्र ही सुरु करण्यात आलेली नव्हती. पण आता खरीपातील पिकांची काढणी कामे झालेली आहेत. त्यामुळे आवक वाढत आहे. शेतकऱ्यांची गरज ओळखून हे खरेदी केंद्र सुरु करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी सांगितले आहे. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा माल घेण्यासाठा आवश्यक असणारी साधनसामुग्री ही महामंडळाची राहणार आहे. याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रात कमी भावाने खरेदी केल्याचे निदर्शनास येताच कारवाई केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांना सांगितले आहे.

मुगाला होणार फायदा

सध्या सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. मात्र, हमीभावापेक्षा बाजारभावात सोयाबीन आणि उडदाला अधिकचा दर आहे. त्यामुळे शेतकरी हे खासगी व्यापाऱ्यांकडेच सोयाबीनची विक्री करणार आहेत. मात्र, मूगाला हमीभाव अधिकता असल्याने मूगाची खरेदी ही केंद्रावर होऊ शकते. शिवाय़ शेतीमाल हा शेतकऱ्याचाच असणे बंधनकारक राहणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खरेदी केंद्र सुरु होण्याची मागणी होत होती. पण आता मुगाची आवक कमी झाल्यानंतर हे केंद्र सुरु झाल्याने शेतकरी कसा प्रतिसाद देतात ते पहावे लागणार आहे.

शेतकऱ्यांसाठी आवश्यक कागदपत्रे

खरेदी केंद्रावर मालाची विक्री करताना शेतकऱ्यांना सातबारा उतारा, 8 अ, बॅंक पासबूकची झेरॅाक्स, पीकाची नोंद आदी कागदपत्रे ही जमा करावी लागणार आहेत. कारण हमी भाव केंद्रावर शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांच्या मालाची अधिकची खरेदी होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे ही नियमावली ठरवून देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांच्या उताऱ्यावरील पेऱ्यानुसारच त्यांचा शेतीमाल घेतला जाणार आहे. शिवाय शेतीमाल घेऊन येण्यापूर्वी मार्केटींग फेडरेशन विभागाकडे नोंद ही करावी लागणार आहे.

काय आहेत जिल्हाधिकारी यांच्या सुचना?

खरेदी केंद्रावर किमती संदर्भातील दरफलक लावणे बंधनकारक राहणार आहे. जेणे करुन शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही. आधारभूत किमतीसाठी शेतीमालाचा दर्जाची तपासणी करुनच शेतीमाल घेता येणार आहे. शिवाय मार्केटींग फेडरेशनला शेतीमाल साठवणूकीसाठी आवश्यक असणारा बारदाणा पुरलवावा लागणार आहे. धान्याची खरेदी करताना तहसीलदार यांना दक्षता पथकाची नेमणूक करावी लागणार आहे. जेणेकरुन केंद्रावर काही गोंधळ होणार नाही.

उशिरा सुचलेले शहाणपण

खरीप हंगाम अंतिम टप्यात आहे. खरीपातील मुख्यपीक सोयाबीन आणि उडदाची विक्री ही अंतिम टप्यात आहे. असे असताना आता खरेदी केंद्र सुरु करण्याचा सरकारचा उद्देश काय असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. (Shopping centre opened in Nanded, farmers get relief sooner or later)

संबंधित बातम्या :

असं नेमकं काय घडतं ? काळ्या म्हशीला पांढरं रेडकू होतं

यंदा कापसाचे दर तेजीतच, शेतकऱ्यांना काय आहे कृषी विद्यापीठाचा सल्ला?

यंदा कापसाचे दर तेजीतच, शेतकऱ्यांना काय आहे कृषी विद्यापीठाचा सल्ला?

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.