Soybean Crop : उगवण झालेल्या सोयाबीनवर गोगलगायीचा ताव, धनंजय मुंडेंनी मांडले सरकारसमोर शेतकऱ्यांचे गऱ्हाणे

खरीप हंगामातील पेरण्या आता अंतिम टप्प्यात आहेत. असे असताना पेरणी झालेल्या क्षेत्रावर पिकांची उगवणही झाली आहे. पण पीक कोवळे असतानाच गोगलगायी त्यावर ताव मारत आहेत. त्यामुळे उगवताच पिके नष्ट होत असून याचा बंदोबस्त तरी करावा कसा असा प्रश्न आहे. गोगलगायींच्या प्रादुर्भावाने उगवलेली सोयाबीन पिके पूर्णत: नष्ट झाली आहेत.

Soybean Crop : उगवण झालेल्या सोयाबीनवर गोगलगायीचा ताव, धनंजय मुंडेंनी मांडले सरकारसमोर शेतकऱ्यांचे गऱ्हाणे
सोयाबीन उगवता त्यावर गोगलगायीचा प्रादुर्भाव होत आहे.
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 12:05 PM

बीड : उशिरा का होईना पण दमदार (Rain) पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यात (Kharif Sowing) खरिपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीन भर दिला असून गेल्या 10 दिवसातील पोषक वातावरणामुळे पिकांची उगवणही झाली आहे. मात्र, पिकांवर नवीनच संकट निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात गोगलगायींच्या प्रादुर्भावाने उगवलेली (Soybean Crop) सोयाबीन पिके पूर्णत: नष्ट झाली आहेत, तर सोयाबीन सह इतरही पिकांना गोगलगाईच्या नुकसानीचा मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांपुढे समस्या कायम असून आता राज्य सरकारने पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजाराची मदत जाहीर करावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.

नेमके पिकांचे नुकसान काय ?

खरीप हंगामातील पेरण्या आता अंतिम टप्प्यात आहेत. असे असताना पेरणी झालेल्या क्षेत्रावर पिकांची उगवणही झाली आहे. पण पीक कोवळे असतानाच गोगलगायी त्यावर ताव मारत आहेत. त्यामुळे उगवताच पिके नष्ट होत असून याचा बंदोबस्त तरी करावा कसा असा प्रश्न आहे. गोगलगायींच्या प्रादुर्भावाने उगवलेली सोयाबीन पिके पूर्णत: नष्ट झाली आहेत. त्यामुळे वाढ आणि उत्पादन ह्या गोष्टी तर दूरच राहत असून उगवलेले जोपासावे कसे हाच मोठा प्रश्न आहे.

हेक्टरी 50 हजार रुपयांची मागणी

कृषी विभागाने हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन-कार्यशाळा आदी उपाययोजना केल्या परंतु त्याला खूप उशीर झाला होता. यंदा प्रतिकूल परस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी खरिपाचा पेरा केला होता. असे असताना हे नवे संकट शेतकऱ्यांपुढे उभे राहिले आहे. त्यामुळे पिकांचे पंचनामे करुन त्वरीत हेक्टरी 50 हजाराची मदत करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारची बाजू सांगणारे मुंडे आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरीत आहेत. शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊन त्यांनी ही मागणी केली आहे.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांकडे काय आहे उपाय

पिकांची उगवण होताच किडीचा प्रादुर्भाव झाला तर मात्र वाढीवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बांध हे तणविरहीत ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे गोगलगाईला थांबण्यासाठी सुरक्षित जागा राहणार नाही. सकाळी किंवा संध्याकाळी ह्या गोगलगायी ह्या साबणाचे किंवा मिठाचे पाणी घेऊन त्यामध्ये मारुन टाकाव्यात. पिकाच्या क्षेत्रात 7 ते 8 मीटरवर वाळलेल्या गवताचे बुचाडे उभा करावेत. जेणेकरुन गोगलगायी त्याच्या आश्रयाला येतील आणि मग त्या अंडी घालण्यास एकत्र आल्यावर त्या नष्ट कराव्या लागणार आहेत.

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.