बुलडाण्यात सोयाबीनला 9675 रुपये भाव, हमीभावाच्या दुप्पटीपेक्षा जास्त भाव, खामगाव बाजार समितीत उच्चांकी दर

खामगावच्या बाजार समितीत सोयाबीनला मंगळवारी 27 जुलै रोजी 9675 रुपयांपर्यंत उच्चांकी भाव मिळाला तर आज 9500 चा भाव मिळालाय. मंगळवारी 1 हजार 15 क्विंटल सोयाबीन मार्केटला आलं होतं.

बुलडाण्यात सोयाबीनला 9675 रुपये भाव, हमीभावाच्या दुप्पटीपेक्षा जास्त भाव, खामगाव बाजार समितीत उच्चांकी दर
सोयाबीन
गणेश सोळंकी

| Edited By: Yuvraj Jadhav

Jul 28, 2021 | 11:03 PM

बुलडाणा: जिल्ह्यात शेतकऱ्याच्या सोयाबीनला हमीभावाच्या दुप्पटीपेक्षा जास्त भाव मिळत असल्याचं चित्र खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळत आहे. खामगावच्या बाजार समितीत सोयाबीनला मंगळवारी 27 जुलै रोजी 9675 रुपयांपर्यंत उच्चांकी भाव मिळाला तर आज 9500 चा भाव मिळालाय. मंगळवारी 1 हजार 15 क्विंटल सोयाबीन मार्केटला आलं होतं. तर आज 1 हजार 79 क्विंटल आवक झालीय. एकीकडे शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले असताना इकडे बुलडाणा जिल्ह्यातील विदर्भातील मोठ्या बाजार समित्यांपैकी एक असलेल्या खामगाव येथील बाजार समिती शेतकऱ्यांच्या सोयाबीनला आता पर्यंतचा सर्वात जास्त उच्चांक दर मिळत आहे, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे दिलीप देशमुख यांनी सांगितलं.

अचानक वाढलेल्या सोयाबीनच्या भावामुळे बाजारात सोयाबीनची मोठी मागणी निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. बुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते, आणि हे पीक शेतकऱ्याच्या दृष्टीने नगदी पीक समजले जाते, जिल्ह्यात गेल्या वर्षी 3 लाख 84 हजार हेक्टर क्षेत्रफळावर सोयाबीन पिकाची पेरणी झाली होती, तर यावर्षी आतापर्यंत 3 लाख 55 हजार हेक्‍टरवर पेरणी झालेली आहे.

सोयाबीनवर खोडमाशीचं आक्रमण

बुलडाणा जिल्हाभर पिकांची चांगली परिस्थिती असून शेतकरी समाधानी दिसतोय. मात्र काही ठिकाणी या सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा तसेच खोडमाशी आक्रमण करत आहे, याबाबत देखील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

सोयाबीनच्या दराचा उच्चांक

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सोयाबीनला विक्रमी भाव मिळाला आहे. सोयाबीनचा कमाल भाव 9 हजार 881 तर 9 हजार 600 सर्वसाधारण भाव मिळाला आहे. गेल्या काही वर्षातला हा सगळ्यात जास्त भाव आहे.

दरवाढीचा फायदा कुणाला?

सोयाबीनच्या ऐन हंगामात बाजारभाव गडगडतात, याचा अनुभव दरवर्षीच शेतकऱ्यांना येतो. दर वाढले असले तरी सध्या बहुतांश शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन नाही. त्यामुळे या वाढीव दराचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच अधिक होत आहे.

इतर बातम्या:

लातूरमध्ये सोयाबीनला उच्चांकी भाव, क्विंटलला 9600 रुपयांचा दर, दरवाढीचा फायदा नेमका कुणाला?

सांगलीला कृष्णा आणि वारणा नदीच्या महापुराचा फटका, तब्बल 40 हजार हेक्टर शेती बाधित, ऊस, सोयाबीनचं मोठं नुकसान

Soybean rates hike in Buldana Khamgaon apmc price reach to nine thousand

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें