AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेणापासून पेंट बनवण्याचा व्यवसाय सुरु करा, ट्रेनिंग अवघ्या 5000 रुपयांत

केवळ सात दिवस व्यवसायाचे धडे घ्यावे लागणार आहेत. या व्यवसायात चांगली कमाई होऊ शकणार आहे. (Start a business of making paint from dung, training for just Rs.5000)

शेणापासून पेंट बनवण्याचा व्यवसाय सुरु करा, ट्रेनिंग अवघ्या 5000 रुपयांत
शेणापासून पेंट बनवण्याचा व्यवसाय सुरु करा
| Edited By: | Updated on: Mar 16, 2021 | 8:48 AM
Share

नवी दिल्ली : आपण जर गाईच्या शेणापासून पेंट बनवण्याचा व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात असाल तर बिनधास्त पुढे पाऊल टाका. या व्यवसायात यशस्वी बनण्यासाठी नेमके काय केले पाहिजे, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, याचे प्रशिक्षण अवघ्या 5000 रुपयांत मिळणार आहे. केवळ सात दिवस व्यवसायाचे धडे घ्यावे लागणार आहेत. या व्यवसायात चांगली कमाई होऊ शकणार आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी टाकाऊपासून काही उपयुक्त बनवण्याच्या उपक्रमात पुढाकार घेतला आहे. गाईच्या शेणापासून पेंट बनवणे हा व्यवसायदेखील त्यांच्याच उपक्रमाचा भाग आहे. (Start a business of making paint from dung, training for just Rs.5000)

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हा हेतू

शेतकऱ्यांचे उपन्न वाढवणे हा उद्देश समोर ठेवून केंद्रीय मंत्री गडकरी यांनी ही कल्पना अमलात आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गडकरी यांनी या योजनेबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना विस्ताराने माहिती दिली. शेणापासून पेंट बनवण्याच्या कारखान्याबद्दलही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, बाजारात डिस्टेंपर आणि इनेमल पेंट उपलब्ध आहे. दोन्ही पेंट खादी ग्रामोद्योगच्या जयपुर येथील कुमारप्पा इंस्टीट्यूटच्या लोकांनी मिळून बनवले आहे. भारतात एकूण पशुधनची संख्या 535.78 दशलक्ष आहे.

ब्रँडेड पेंटच्या जागी नैसर्गिक पेंटचा वापर

शेणापासून बनवलेले पेंट ब्रँडेड इनेमल पेंट आणि डिस्टेंपर पेंटचे आंतरराष्ट्रीय पातळीवर आखून देण्यात आलेल्या नियमावलीचे पूर्तता करते. गडकरी यांनी त्यांचे कार्यालय आणि घर दोन्ही ठिकाणी शेणापासून बनवलेल्या पेन्टपासून रंगकाम केले आहे. हे रंगकाम पाहून कुणाचाही विश्वास बसणार नाही कि रंगकामासाठी वापरलेले पेंट शेणापासून बनवलेले आहे. यापुढे पंतप्रधान आवास योजना, सरकारी कार्यालये आदी ठिकाणी ब्रँडेड पेंटच्या जागी नैसर्गिक पेंटचा वापर केला जाईल, असेही केंद्रीय मंत्री गडकरी यांनी जाहीर केले.

प्रत्येक गावात फॅक्टरी

देशातील प्रत्येक गावामध्ये जनावरे आहे. याचाच विचार करून प्रत्येक गावामध्ये पेंट बनवण्याची फॅक्टरी खोलण्याची आमची योजना आहे. प्रत्येक गावात फॅक्टरी खोलण्यामुळे देशभर 12 ते 15 लाख फॅक्टरी खुल्या होऊ शकतात. डिस्टेंपर आणि ऑइल पेंट ग्रामीण भागातही बनण्यास सुरूवात होईल. यासाठी सध्या एक किलो शेण 5 रुपये किलोच्या भावाने खरेदी केले जाईल. जर कोणी स्टार्टअपच्या माध्यमातून या व्यवसायाची सुरुवात करणार असेल, तर त्या व्यक्तींना खादी ग्रामोद्योग कमिशनकडून 5 हजार रुपयांत जयपूरमध्ये प्रशिक्षण दिले जात आहे.

फिल्म बनविण्याची योजना

शेणापासून पेंट कसे बनवायचे यावर आधारीत एक फिल्म बनवून ऑडिटोरिअममध्ये स्क्रीनिंग करण्याचीही योजना आहे. हे स्क्रीनिंग एकावेळी 2200 लोकांना दाखवले जाणार आहे. हे एक प्रकारचे शॉर्ट ट्रेनिंग असणार आहे. या माध्यमातून गोरगरिबांमध्ये जागरूकता निर्माण करून पुरेसा रोजगार उपलब्ध करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. (Start a business of making paint from dung, training for just Rs.5000)

इतर बातम्या

‘सचिन वाझे राजकारणाचा बळी’, वाझेंच्या भावाची ‘हेबियस कॉर्पस’ याचिका

मुंबई एपीएमसी बाजारात कांद्याच्या दरात मोठी घसरण, बटाटा आणि लसूणही गडगडला, वाचा आजचे दर

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.