Special Story | जैविक शेतीतून केळी उत्पादनात दुप्पट फायदा मिळवणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा

कांतिलाल भिमानी यांनी कृषी विभाग आणि आत्माच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या मार्गदर्शनानंतर जैविक शेतीला सुरुवात केली. (Kantilal Bhimani)

Special Story | जैविक शेतीतून केळी उत्पादनात दुप्पट फायदा मिळवणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा
कांतिलाल भिमानी

गुजरातमधील कांतिलाल भिमानी यांनी पारंपारिक शेतीतून बाहेर पडून जैविक शेतीचा मार्ग स्वीकारला. पारंपारिक पिकांना पर्याय देत त्यांनी केळीबाग लावली. केळीच्या बागेसोबत जैविक शेतीचा मार्ग निवडला. कापूस आणि एरंडाची शेती करताना त्यांना जास्त फायदा होत नव्हता. त्यामुळे कांतिलाल भिमानी यांनी कृषी अधिकाऱ्यांची भेट घेत आधुनिक शेती करण्याबद्दल मार्गदर्शन घेतले. शासकीय अधिकारी आणि आत्मा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेत कांतिलाल भिमानी जैविक शेतीकडे वळले. गोमूत्र आणि शेणापासून जिवामृत तयार करुन शेतीसाठी लागणारा खर्च कमी केला त्यामुळे त्यांचा औषधं फवारणी वरचा खर्च कमी झाला.(Success story of organic farmer Kantilal Bhimani)

जैविक शेतीचा मार्ग स्वीकारला

कच्छ जिल्ह्यातील मांडवी तालुक्यातील रतनापूरमध्ये कांतिलाल भिमानी यांची 4 एकर शेती आहे. कांतिलाल भिमानी यांनी कृषी विभाग आणि आत्माच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या मार्गदर्शनानंतर जैविक शेतीला सुरुवात केली. कांतिलाल भिमानी यांनी पहिल्यांदा जिवामृत तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी गोमूत्र आणि शेणाचा वापर केला. भिमानी यांनी जिवामृताचा वापर केल्यानं जमिनीतील नायट्रोजन वाढण्यास मदत झाली. जिवामृत पिकाला देण्यासाठी ड्रीप इरिगेशनचा वापर करण्यात आला. जीवामृताचा फायदा असा झाला की रोग आणि किडीपासून पिकांचं संरक्षण झालं.

कापसाऐवजी केळीची बाग

कांतिलाल भिमानी यांनी कृषी अधिकारी आणि आत्माच्या अधिकाऱ्यांकडून पीक बदलण्याचा निर्णय घेतला. कापसाऐवजी केळीची बाग लावण्याचा निर्णय घेतला. केळीच्या झाडांना ड्रीप इरिगेशनद्वारे जीवामृत पुरवल्यानं फळाच्या चवीत देखली फरक पडला. जैविक शेती करण्याचा निर्णय घेतल्यानं भिमानी यांना रासायनिक औषध, केमिकल्स, मजुरीचा खर्च कमी झाला. हा खर्च वाचल्यानं भिमानी यांच्या उत्पादन खर्चात बचत झाली.

दोन वर्षात दुप्पट कमाई

कांतिलाल भिमानी यांनी सुरुवातीला केळीची बाग लावली तेव्हा त्यांना 28 हजार किलो केळीचं उत्पन्न झालं. यामधून त्यांना 1 लाख 40 हजार मिळाले. तर उत्पादन खर्च 60 हजार रुपये आला. दुसऱ्या वर्षी त्यांना 30 हजार किलो केळीचं उत्पन्न झालं. त्याला बाजारभावाप्रमाणे 1 लाख 87 हजार रुपये मिळाले. उत्पादनाचा खर्च 50 हजार वजा जाता त्यांना 1 लाख 37 हजार 500 रुपयांचा निव्वळ नफा झाला. तिसऱ्या वर्षी 30 हजार किलो केळी उत्पादन मिळालं. बदलेल्या बाजारभाव नुसार त्यांना 2 लाख 25 हजार मिळाले. उत्पादन खर्च 70 हजार रुपये आला. तर निव्वळ नफा 1 लाख 55 हजार रुपये झाला.

जिवामृताची महाराष्ट्रातील रत्नागिरीत विक्री

पारंपारिक शेतीतून जैविक शेतीकडे वळलेल्या कांतिलाल भिमानी यांनी जिवामृत निर्मिती करण्यावर भर दिला. त्यांनी जिवामृत निर्मिती करुन गावातील इतर शेतकऱ्यांना विक्री करण्यास सुरुवात केली. जिवामृताला चांगले ग्राहक मिळू लागल्यानं त्यांनी मांडवी तालुक्यासह कच्छ जिल्ह्यात विक्री सुरु केली. कांतिलाल भिमानी यांनी तयार केलेल्या जिवामृताची विक्री थेट महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करण्यात येत आहे.

कांतिलाल भिमानी यांनी जैविक शेतीतून साधलेल्या प्रगतीमुळे त्यांना विविध पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. सरदार पटेल कृषी पुरस्कार 2010, बेस्ट आत्मा प्रकल्प शेतकरी पुरस्कार देखील कांतिलाल भिमानी यांनी मिळाला आहे.

संबंधित बातम्या:

सातारच्या पठ्ठ्याची अभिमानास्पद कामगिरी, स्वप्नवत ऊस भरणी मशीन वास्तवात साकारली

साखर कारखाना महासंघाच्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचा डंका; मानाचा वसंतदादा पाटील पुरस्कार ‘या’ कारखान्याकडे

(Success story of organic farmer Kantilal Bhimani

Published On - 6:49 am, Sun, 31 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI