AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sangli : द्राक्षाचे नुकसान, बेदाण्यातून भरपाई, हंगामानंतरही दर टिकून

वातावरण बदलाचा परिणाम ज्याप्रमाणे द्राक्ष उत्पादनावर झाला होता त्याच प्रमाणे वादळी वारे आणि कडाक्याच्या उन्हामुळे बेदणा निर्मितीमध्येही अडथळे निर्माण झाले होते. राज्यात सोलापूर, सांगली, नाशिक आणि कर्नाटकातील काही राज्यांमध्ये बेदणा निर्मिती होते. यंदा डिसेंबर महिन्यातच या निर्मितीची प्रक्रिया ही सुरु झाली होती. मात्र, महिन्याकाठी अवकाळी पाऊस आणि वादळी वारे हे ठरलेलेच होते. त्याचा परिणाम बेदाणा निर्मितीवर झाला आहे.

Sangli : द्राक्षाचे नुकसान, बेदाण्यातून भरपाई, हंगामानंतरही दर टिकून
बेदाणा निर्मिती
| Updated on: May 09, 2022 | 6:10 AM
Share

सांगली : निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका यंदा (Grape Crop) द्राक्ष उत्पादकांना बसलेला होता. उत्पादनात घट तर झालीच पण द्राक्षाची गुणवत्ताही ढासळली होती. त्यामुळे द्राक्षातून नाही किमान (Raisin Product) बेदाण्यातून का होईना उत्पादन वाढीचा शेतकऱ्यांनी प्रयत्न केला. गतवर्षीच्या तुलनेत बेदाण्याचेही उत्पादन घटले असले तरी दर टिकून राहिल्याने द्राक्ष उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. (Festival) सण आणि लग्न समारंभामुळे बेदाण्याच्या मागणीत वाढ झाली आणि त्यामुळेच दरात काही अंशी सुधारणा झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. सध्याचे मागणी आणि दर हे द्राक्ष उत्पादकांना दिलासा देणारे आहेत.राज्यात यंदा 1 लाख 60 हजार टन बेदाण्याचे उत्पादन झाले आहे.

वातावरण बदलाचाही परिणाम बेदाणा निर्मितीवर

वातावरण बदलाचा परिणाम ज्याप्रमाणे द्राक्ष उत्पादनावर झाला होता त्याच प्रमाणे वादळी वारे आणि कडाक्याच्या उन्हामुळे बेदणा निर्मितीमध्येही अडथळे निर्माण झाले होते. राज्यात सोलापूर, सांगली, नाशिक आणि कर्नाटकातील काही राज्यांमध्ये बेदणा निर्मिती होते. यंदा डिसेंबर महिन्यातच या निर्मितीची प्रक्रिया ही सुरु झाली होती. मात्र, महिन्याकाठी अवकाळी पाऊस आणि वादळी वारे हे ठरलेलेच होते. त्याचा परिणाम बेदाणा निर्मितीवर झाला आहे. दर्जेदार बेदाणा तयार न झाल्याने अपेक्षित दर मिळाला नाही. पण प्रतिकूल परस्थितीमध्ये द्राक्ष उत्पादकांना या बेदाण्याचा आधार मिळाला हे नक्की. उत्पादनात घट झाली असली तरी दरात फारशी तेजी-मंदी आली नाही. त्यामुळे किमान नुकसान तर टळलेच पण उत्पन्नही शेतकऱ्यांच्या पदरी पडले आहे.

सण अन् लग्न समारंभाचा मिळणार आधार

सध्या बेदाणा निर्मितीची प्रक्रिया ही पूर्ण झाली आहे. राज्यात 1 लाख 60 हजार टन बेदाणा उत्पादन झाले आहे. सरासरीच्या तुलनेत उत्पादन घटले असले तरी सध्याचे सण उत्सव आणि लग्नसमारंभ यामुळे बेदाण्याला मागणी आहे. सांगली, तासगाव आणि पंढरपूर या तिन्ही बाजारपेठांमध्ये 1 हजार 500 टन बेदाण्याची विक्री झाली आहे. त्यामुळे येत्या काळात आणखीन मागणीत वाढ होईल असा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहे. त्यामुळे द्राक्षातून नुकसान झाले असले तरी बेदण्यातून उत्पन्न वाढावे अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

असे आहेत बेदाण्याचे दर

राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये बेदाणे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. एक नंबर प्रतीच्या बेदाण्याला 160 ते 220 रुपये किलो असा दर आहे तर दोन नंबरसाठी 110 ते 150 रुपये व निकृष्ट दर्जाचे बेदाणे हे 10 रुपये ते 60 रुपये किलो असा विकला जात आहे. हे दर सर्वसाधारण असल्याने भविष्यात मागणीत वाढ आणि दरात सुधारणा होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.