पांढऱ्या अंडरवेअर जमिनीत गाढल्या, प्रत्येक घरात 2 अंडरवेअर पाठवल्या, भलत्या रिसर्चचं कारण काय?

इंग्रजी वेबसाईट द टाईम्स डॉट युकेच्या रिपोर्टनुसार स्विझरलँडमध्ये 2000 अंडरवेअर पुरण्यात येत आहेत. underwear is being worn in the soil

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:19 PM, 19 Apr 2021
पांढऱ्या अंडरवेअर जमिनीत गाढल्या, प्रत्येक घरात 2 अंडरवेअर पाठवल्या, भलत्या रिसर्चचं कारण काय?
Soil Testing by underwear

नवी दिल्ली: शेतीमध्ये नवनवीन संशोधन होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. शेतीमधील संशोधनात किंवा शेती करण्यासाठी माती परीक्षण करणं महत्वाचं ठरतं. माती परीक्षणानंतर शेतकर्यांना जमिनीचा पोत समजण्यास मदत होते. कृषी विभागाच्या मदतीनं शेतकरी माती परीक्षण करु शकतात. स्विझरलँडमध्ये माती परीक्षणासाठी अनोखा प्रयोग राबवला जात आहे. स्विझरलँडमधील या प्रयोगाची पद्धत वाचून तुम्हाला हे जरा विलक्षण वाटू शकते. माती परीक्षणासाठी स्विझरलँडमध्ये दोन पांढऱ्या अंडरवेअर मातीत पुरल्या जात आहेत. स्विझरलँड सरकार यासाठी दोन अंडरवेअर शेतकऱ्यांना पाठवत आहेत. (Switzerland government research institute send White underwear is being worn in the soil for soil testing)

मातीचं आरोग्य आरोग्य तपासण्याचा प्रयत्न

इंग्रजी वेबसाईट द टाईम्स डॉट युकेच्या रिपोर्टनुसार स्विझरलँडमध्ये 2000 अंडरवेअर पुरण्यात येत आहेत. वैज्ञानिकांच्या उपस्थितीत अंडरवेअर पुरण्याचं काम केलं जात आहे. स्विझरलँडमधील बाग आणि शेतीच्या जमिनीच्या गुणवत्तेची चाचणी करण्यासाठी हा प्रयोग राबवला जात आहे.

एक रिपोर्टनुसार स्टेट रिसर्च इनस्टिट्यूट , अ‌ॅग्रोस्कोप तर्फे हा प्रयोग करण्यात येत आहे. यामध्ये स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. सध्या पांढऱ्या अंडरवेअर जमिनीत पुरण्याचं काम सुरु आहे. काही कालावधीनंतर त्या बाहेर काढल्या जाणार असून त्याचा अभ्यास केला जाईल.

तज्ञ काय म्हणतात?

या संशोधन प्रकल्पाचं नेतृत्व करणाऱ्या मार्सेल हेडन यांनी असा प्रयोग कॅनडामध्ये केला गेला असल्याचं म्हटलं आहे. मात्र, इतक्या मोठ्या पातळीवर पहिल्यांदाच स्विझरलँडमध्ये हा प्रयोग राबवण्यात येत आहे. यापूर्वी मातीचं आरोग्य तपासण्यासाठी टी बॅग्ज पुरल्या जात होत्या. मात्र, हा वेगळ्या प्रकारचा प्रकल्प असल्याचे हेडन म्हणाले.

प्रयोग कसा केला जातोय?

स्विझरलँडमध्ये या प्रयोगद्वारे मातीचं परीक्षण करण्यात येणार आहे. दोन पांढऱ्या अंडरवेअर जमिनीत पुरल्या जातील. त्याच्यासोबत टी बॅग्ज मातीत पुरल्या जातील. एका महिन्यानंतर एक अंडरवेअर जमिनीबाहेर काढली जाईल आणि त्याचा अभ्यास केला जाईल. अंडरवेअरला जास्त प्रमाणात छिद्र असल्यास ती माती सक्षम असेल, असं मानलं जाईल. अंडरवेअर आणि टी बॅग्जवर काय परिणाम होतो याचा देखील अभ्यास केला जाईल.

संबंधित बातम्या:

ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचं योजनेद्वारे निराधार महिला शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू बनले आधारवड

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना नेमकी काय? महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना किती लाभ झाला?

(Switzerland government research institute send White underwear is being worn in the soil for soil testing)