Watermelon : कलिंगडला ‘विकेल ते पिकेल’ अभियानाचा आधार, शेतकऱ्यांनी कसा घ्यायचा लाभ? वाचा सविस्तर

यंदा शेतकऱ्यांना मुख्य पिकातून नाही पण हंगामी पिकातून अधिकचे उत्पादन मिळाले आहे. उन्हाळी हंगामात याची प्रचिती अधिक आली आहे. कांदा, लिंबू आणि आता कलिंगडातून अधिकचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत आहे. हंगामी पिकांचे दर वाढत असतानाच विकेल ते पिकेल या राज्य सरकारच्या अभियानाचाही फायदा शेतकऱ्यांना होत आहे. कृषी विभागाकडून सुरु करण्यात आलेल्या या अभियानाचा सध्या कलिंगड उत्पादकांना होत आहे.

Watermelon : कलिंगडला 'विकेल ते पिकेल' अभियानाचा आधार, शेतकऱ्यांनी कसा घ्यायचा लाभ? वाचा सविस्तर
कलिंगडच्या किंमतीमध्ये वाढ झाली असून आता 'विकेल ते पिकेल' या अभियानाचाही फायदा होत आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 1:29 PM

नाशिक : यंदा शेतकऱ्यांना (Main Crop) मुख्य पिकातून नाही पण हंगामी पिकातून अधिकचे उत्पादन मिळाले आहे. उन्हाळी हंगामात याची प्रचिती अधिक आली आहे. कांदा, लिंबू आणि आता (Watermelon) कलिंगडातून अधिकचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत आहे. हंगामी पिकांचे दर वाढत असतानाच विकेल ते पिकेल या राज्य सरकारच्या अभियानाचाही फायदा शेतकऱ्यांना होत आहे. (Agricultural Department) कृषी विभागाकडून सुरु करण्यात आलेल्या या अभियानाचा सध्या कलिंगड उत्पादकांना होत आहे. कारण याच अभियानाचा आधार घेत मालेगाव तालुक्यातील कलिंगड हे काश्मिरच्या बाजारपेठेत दाखल झाले आहेत. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून गुणवत्तापुर्वक मालच पाठवला जात असून शेतकऱ्यांना याचा अधिक फायदा होत आहे. मालेगाव तालुक्यातील लेंडाणे येथील शेतकऱ्याचा माल पाठवण्यात आला आहे.

असा नोंदवा अभियनात सहभाग

‘विकेल ते पिकेल’ हे अभियान कृषी विभागाच्या माध्यमातून राबवले जात आहे. शेतकऱ्यांना बाजारपेठेच्या अनुशंगाने पिकाबद्दल माहिती द्यावयाची आहे. शिवाय ज्या शेतकऱ्यांना या अभियानाच्या माध्यमातून शेती मालाची विक्री करायची आहे त्यांना तालुका कृषी कार्यालयात पिक लागवड करण्यापूर्वी नोंदणी करावी लागणार आहे. कृषी विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन शेतीमाल दर्जेदार कसे होईल यावर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. यानंतर सानुग्र अनुदान म्हणून शेतकऱ्यांना मार्केटींग, डिजीटल बॅनर, शिवाय मार्केट उभे करुन देण्यासाठीचे प्रयत्न हे कृषी विभागाच्या माध्यमातून केले जातात. याचाच लाभ मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यास झाला आहे.

‘विकेल ते पिकेल’ अभियानाचा उद्देश काय?

शेतीमालास हमीभाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे, यासाठी राज्य शासनाने ‘विकेल ते पिकेल’ हे अभियान 2020 मध्ये हाती घेतले आहे. हे अभियान सुरु करतानाच गटशेतीच्या माध्यमातून बाजारात कुठल्या शेतीमालास मागणी आहे, याचे शेतकऱ्यांनीच नियोजन करुन विभागवार शेती करावी, दर्जेदार उत्पादन घ्यावे तसेच थेट शेतीमाल विक्रीसाठी कृषी विभागाने प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यातून शेतीमाल विक्रीतील दलाल, मध्यस्थ हद्दपार होतील, शेतीमालाचा दर शेतकऱ्यांना ठरविता येईल, यात ग्राहकांनाही रास्त दरात शेतीमाल मिळेल. परंतू हे सर्व शेतकऱ्यांनी जे पिकविले तेच विक्रीसाठीचे प्रयत्न आहेत.

रमजान महिन्यामुळे कलिंगडच्या मागणीत वाढ

वाढते ऊन आणि सध्याचा पवित्र रमजान महिन्यामुळे कलिंगडच्या मागणीत वाढ होत आहे. नाशिक गिरणाई शेतकरी उत्पादक कंपनीचे किरण शिंदे यांनी निर्यातक्षम कलिंगडची निवड करुन काश्मिर अनंतनाग बाजारपेठेत पाठविण्यात आला होते. त्यामुळे अधिकचा दर तर मिळाला आहे शिवाय कलिंगडचा दर्जा चांगला असल्याने मागणीत वाढ होत आहे. शेतकऱ्याला जागेवर 10 ते 11 रुपये किलो असा दर देऊन खरेदी केली जात आहे.

संबंधित बातम्या :

Success Story : पानमळ्याने फुलले शेतकऱ्यांचे जीवन, 20 गुंठ्यामध्ये 10 कुटुंबाचा उदरनिर्वाह

Kharif Season : खत पुरवठ्यापासून पेरणीपर्यंत कृषी विभागाचे नियोजन, शेतकऱ्यांना नेमका फायदा काय?

Sugarcane Fire : महावितरणचा असा हा ‘शॉक’, गतवर्षीच्या घटनेची पुनरावृत्ती, उसाचे क्षेत्रही अ्न कारणही तेच

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.