AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : व्यवहार्य मागण्यातूनच शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार, बांधावरचे प्रश्न अजित पवार मांडणार थेट सभागृहात

सध्याच्या स्थितीला शेतकरी हा शून्य टक्क्याने घेतलेले कर्जाचीही परतफेड करु शकत नाही. आता जर पुर्नगठनाचा विचार केला तर नव्याने घेतले जाणारे कर्ज आणि पूर्वीचे कर्ज असा भार शेतकऱ्यांवर पडणार आहे. त्यामुळे पुर्नगठन हा त्यावरील मार्ग नाहीतर आगोदर नियमित कर्जाची परतफेड कऱणाऱ्यांना 50 हजाराचे अनुदान हे महत्वाचे आहे.

Ajit Pawar : व्यवहार्य मागण्यातूनच शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार, बांधावरचे प्रश्न अजित पवार मांडणार थेट सभागृहात
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विदर्भातील पीक नुकसानीची पाहणी केली आहे.
| Edited By: | Updated on: Jul 28, 2022 | 10:12 AM
Share

नागपूर :  (Natural hazards) नैसर्गिक संकट आणि शेतकऱ्यांनी घेतलेले पीक अशा दुहेरी संकटात राज्यातील बळीराजा आहे. या संकटातून मार्ग काढणे हे आता सरकारच्या हातामध्ये असून शेतकऱ्यांच्या समस्या थेट सभागृहात मांडता याव्यात म्हणून (Ajit Pawar) विरोधी पक्षनेते अजित पवार हे विदर्भातील पीक नुकसानीची पाहणी करीत आहेत. ज्या मागण्या मान्य करणे सरकारला शक्य होईल आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांनाही होईल अशाच मागण्या करणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. यामुळे सातत्याने आक्रमक असलेले पवारांनी आगोदर शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले तर (State Government) सरकारकडून शेतकऱ्यांसाठी जे पदरात पाडून घेता येईल अशा मागण्या येत्या पावसाळी अधिवेशात केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितल. उगाचच अवास्तव मागण्या मांडून उपयोग नाही. त्यामुळे नुकसानभरपाई आणि नियमित कर्ज फेडणाऱ्यांसाठी 50 हजाराचे अनुदान त्वरीत मिळावे यावर आपला भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

कर्जाचे पुर्नगठन अडचणीचा मुद्दा

सध्याच्या स्थितीला शेतकरी हा शून्य टक्क्याने घेतलेले कर्जाचीही परतफेड करु शकत नाही. आता जर पुर्नगठनाचा विचार केला तर नव्याने घेतले जाणारे कर्ज आणि पूर्वीचे कर्ज असा भार शेतकऱ्यांवर पडणार आहे. त्यामुळे पुर्नगठन हा त्यावरील मार्ग नाहीतर आगोदर नियमित कर्जाची परतफेड कऱणाऱ्यांना 50 हजाराचे अनुदान हे महत्वाचे आहे. आणि कर्जाच्या बाबतीत राज्यातील इतर शेतकऱ्यांची म्हणणे काय आहे ते पाहून शासन दरबारी मागण्या केल्या जातील असेही अजित पवार यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांशी संवाद साधूनच निर्णय

शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी थेट बांधावर आल्याशिवाय पर्याय नाही. अधिकारी हे त्यांच्या सोईनुसार अहवाल सादर करातात. पण शेतकऱ्यांच्या समस्या ह्या दूरच राहतात. त्यामुळे अजित पवार यांनी विदर्भ आणि मराठवाडा या भागातील नुकसानीच्या पाहणी दोऱ्याला सुरवात केली आहे. शेतकऱ्यांच्या समस्या ह्या वेगवेगळ्या आहेत. विदर्भात भातशेती अधिक असल्याने येथील शेतकऱ्यांच्या मागण्या ह्या वेगळ्या आहेत. तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न हे वेगळे असणार आहेत. त्यामुळे त्यांच्या समस्या जाणून घेऊन मग सभागृहात भूमिका मांडणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. कोणती गोष्ट ठरवून नाहीतर शेतकऱ्यांचे काय म्हणणे आहे? यावरच आवाज उठवणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.

10 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान

अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे राज्यात खरीप हंगामाचे तब्बल 10 लाख हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. असे असले तरी अद्याप पंचनाम्यांना सुरवात देखील झालेली नाही. शासकीय अधिकारी-कर्मचारी हे कार्यलयात बसूनच कागदपत्रांची मागणी करतात. प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे प्रश्न हे निराळे आहेत. केवळ पिकांचेच नाही शेतजमिनीचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीच्या तुलनेत मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.