Grape Season : द्राक्ष हंगाम कडूच, फळबागायत शेतकरीही कर्जबाजारी, हंगामाच्या अंतिम टप्प्यात चित्र काय?

नाही म्हणलं तरी अखेर द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. द्राक्ष बाग छाटणीपासून सुरु झालेला निसर्गाचा लहरीपणा हा तोडणी आणि द्राक्ष विक्रीपर्यंत कायम होताच. त्यामुळे उत्पादनात तर वाढ झालीच नाही पण शेतकऱ्यांनी उत्पादनवाढीसाठी खर्च केला तेवढा देखील यामधून पदरी पडलेला नाही. केवळ नैसर्गिक आपत्तीच नाही तर गतवर्षीच्या तुलनेत 15 रुपयांनी दरातही घट झाली आहे.

Grape Season : द्राक्ष हंगाम कडूच, फळबागायत शेतकरीही कर्जबाजारी, हंगामाच्या अंतिम टप्प्यात चित्र काय?
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: राजेंद्र खराडे

Apr 20, 2022 | 11:30 AM

सांगली : नाही म्हणलं तरी अखेर द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. (Vineyard) द्राक्ष बाग छाटणीपासून सुरु झालेला निसर्गाचा लहरीपणा हा तोडणी आणि (Grape Rate) द्राक्ष विक्रीपर्यंत कायम होताच. त्यामुळे (Grape Production) उत्पादनात तर वाढ झालीच नाही पण शेतकऱ्यांनी उत्पादनवाढीसाठी खर्च केला तेवढा देखील यामधून पदरी पडलेला नाही. केवळ नैसर्गिक आपत्तीच नाही तर गतवर्षीच्या तुलनेत 15 रुपयांनी दरातही घट झाली आहे. त्यामुळे द्राक्ष शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडणेदेखील मुश्किल झाले आहे. दरवर्षी द्राक्षातून नाही तर किमान बेदाण्यातून का होईना शेतकऱ्यांना उत्पन्न मिळत असते पण यंदा सर्वकाही नुकसानीचे ठरले आहे.

हंगामाच्या सुरवातीपासूनच अवकाळीची अवकृपा

द्राक्ष हंगाम सुरु होताच राज्यात अवकाळी पावसालाही सुरवात झाली होती. एकतर वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम हा द्राक्ष बागावर होतो. त्यामुळे एक दिवसआड फवारणी, मशागत अशी कामे सुरुच होती. पण पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे नियोजनच बिघडले. परस्थिती हाताबाहेर गेल्याने जे पदरी पडेल ते आपले असे म्हणण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली होती. केवळ अवकाळीच नाही तर थंडीमुळे द्राक्ष हे तडकले तर अधिकच्या उन्हामुळेही नुकसान झाले होते. त्यामुले ना अपेक्षित उत्पादन ना द्राक्षाची निर्यात अशी स्थिती यंदाची आहे.

यंदा मार्केटही तयार, मात्र उत्पादनच घटले

गेल्या दोन वर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव राहिल्याने बाजारपेठेत अनेक अडचणींचा सामना द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना करावा लागला होता. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नियमावली शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मार्केट तयार होते पण उत्पादनातच घट झाल्याने शेतकऱ्यांचे सर्व गणितच हुकले. शिवाय वातावरणाचा परिणाम द्राक्ष घडावर झाल्याने दरही घसरलेले आहे. द्राक्षामधून वाढते उत्पन्न सोडा केलेला खर्चही शेतकऱ्यांच्या पदरी पडलेला नाही.

उत्पादन खर्चात वाढ, दरात घट

ज्याप्रमाणे उत्पादनावर खर्च होतो त्याच तुलनेत उत्पन्न मिळावे अशी शेतकऱ्यांना अपेक्षा असते. शिवाय याप्रमाणेच नियोजन झाले तर द्राक्षातून नफा मिळणार आहे. पण यंदा सर्वकाही उलटे झाले आहे. सततच्या वातावरणातील बदलामुळे औषध फवारणीचा खर्च तर वाढला पण दुसरीकडे दरातही घट झाली. अशा प्रतिकूल परस्थितीमुळे द्राक्ष उत्पादकांचे दुहेरी नुकसान झाले अहे. हे आता न भरुन निघणारे आहे.

संबंधित बातम्या :

Chickpea Crop : ‘नाफेड’ चा उद्देश साध्य, शेतकरी उत्पादक कंपन्याच्या माध्यमातून विक्रमी हरभरा खरेदी

Amravati : सोयाबीन बहरुनही उत्पादन घटण्याचा धोका, हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकरी हवालदिल

Cotton Crop : यंदाही कापसाची झळाळी कायम राहणार, खरिपात क्षेत्र वाढण्याचा कृषी विभागाचा अंदाज

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें