AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amravati : सोयाबीन बहरुनही उत्पादन घटण्याचा धोका, हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकरी हवालदिल

उन्हाळी हंगामातील सोयाबीन अंतिम टप्प्यात असताना आता उत्पादन घटण्याचा धोका वाढत आहे. आता सर्वकाही सुरळीत असताना कशाचा धोका असा सवाल तुमच्या मनामध्ये आला असेल पण बहरलेल्या सोयाबीनला शेंगाच लागत नाहीत. केवळ अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर असे प्रकार सोलापूर जिल्ह्यामध्येही समोर आले आहेत. त्यामुळे मूळात जे पेरले त्यामध्येच दोष असेल तर उत्पादनाची अपेक्षा काय असा सवाल उपस्थित होत आहे.

Amravati : सोयाबीन बहरुनही उत्पादन घटण्याचा धोका, हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकरी हवालदिल
पाणी पातळी घटल्याने उन्हाळी हंगमातील पीके धोक्यात आहेतImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 20, 2022 | 10:17 AM
Share

अमरावती: (Summer Crop) उन्हाळी हंगामातील (Soybean Crop) सोयाबीन अंतिम टप्प्यात असताना आता उत्पादन घटण्याचा धोका वाढत आहे. आता सर्वकाही सुरळीत असताना कशाचा धोका असा सवाल तुमच्या मनामध्ये आला असेल पण बहरलेल्या सोयाबीनला शेंगाच लागत नाहीत. केवळ (Amravati District) अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर असे प्रकार सोलापूर जिल्ह्यामध्येही समोर आले आहेत. त्यामुळे मूळात जे पेरले त्यामध्येच दोष असेल तर उत्पादनाची अपेक्षा काय असा सवाल उपस्थित होत आहे. चार महिने मेहनत करुन ही परस्थिती ओढावल्याने जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आता महाबीज कंपनीच्या विरोधात उपोषणाला सुरवात केली आहे. नुकसानभरपाईची मागणी शेतकरी करीत आहेत.

14 शेतकऱ्यांच्या बाबतीत एकच प्रकार

सध्या उन्हाळी हंगामातील सोयाबीन अंतिम टप्प्यात आहे. ज्या दरम्यान शेतकऱ्यांना अंदाजित उत्पादकता काढली जाते त्याच दरम्यान सोयाबीनला शेंगाच नाहीत हे वास्तव पहावे लागत आहे. एखाद्या शेतकऱ्याच्या बाबतीत हा प्रकार झाला तर तो त्याचा दोष असू शकतो मात्र, तिवसा तालुक्यातील निंभोरा, देलवाडी येथील 14 शेतकऱ्यांच्या बाबतीत हाच प्रकार घडला आहे. त्यामुळे बोगस बियाणेच आता नुकसानीसाठी कारणीभूत ठरत असल्याचे निषन्न झाले आहे. त्यामुळे नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांनी आता आमरण उपोषणाला सुरवात केली आहे. नुकासानभरापाई मिळाल्याशिवाय माघार नाही अशी भूमिका या गावातील शेतकऱ्यांनी घेतली आहे.

खर्च अन् मेहनत मातीमोल

वातावरणातील बदलामुळे चार महिन्यात सोयाबीनवर चार वेळा फवारणी करावी लागली होती. शिवाय मशागत, पेरणी याचा खर्च हा वेगळाच. एकरी 10 हजार रुपये खर्चून आता पीक पदरी पडण्याच्या अवस्थेत हे भयाण वास्तव समोर आले आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा सामना केल्यानंतर शेतकऱ्यांना आता महाबीज कंपनीशी दोन हात करावे लागत आहेत. मात्र, कंपनीकडून दाद दिली जात नसल्याने शेतीकामे सोडून शेतकऱ्यांना न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे.

बिजोत्पादनासाठी जनजागृती, मदतीसाठी हात आखडता

सोयाबीन बिजोत्पादनासाठी महाबीजकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाते. मात्र, अशा प्रसंगी ना महाबीज कंपनी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहते ना कृषी विभाग. त्यामुळे हतबल शेतकऱ्यांना उपोषणाची वेळ आली आहे. किमान कृषी विभागाने तरी शेतकऱ्यांच्या या समस्येकडे गांभिर्यांने पाहून भरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

संबंधित बातम्या :

Solapur : दुष्काळात तेरावा, बोगस बियाणांमुळे 4 एकरावर बहरलेल्या सोयाबीनवर फिरवला रोटर

Cotton Crop : यंदाही कापसाची झळाळी कायम राहणार, खरिपात क्षेत्र वाढण्याचा कृषी विभागाचा अंदाज

Wheat Production: वाढत्या उन्हामुळे गव्हाचे उत्पादन घटले पण केंद्राच्या एका निर्णयामुळे नुकसान टळले

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.