Monsoon: मान्सून वेळेपूर्वी, खरीप पेरण्या मात्र महिनाभर उशीराने, उत्पादनावर काय होणार परिणाम?

राज्यात अपेक्षित पाऊस झाला नसताना देखील 20 लाख हेक्टरावर खरीप हंगामातील पेरण्या झाल्या आहेत. सरासरीच्या तुलनेत केवळ 20 टक्के पेरण्या झाल्या आहेत. राज्यात पेरण्यांचा टक्का घसरला असला तरी पावसाचा अंदाज घेऊनच शेतकरी पेरणीचा निर्णय घेत असल्याने दुबारचे संकट नसल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट केले आहे.

Monsoon: मान्सून वेळेपूर्वी, खरीप पेरण्या मात्र महिनाभर उशीराने, उत्पादनावर काय होणार परिणाम?
राज्यात पाऊस सक्रीय होत असल्याने पेरणी कामांना गती मिळत आहे.
राजेंद्र खराडे

|

Jul 01, 2022 | 10:55 AM

पुणे : देशात (Monsoon) मान्सून दाखल होऊन महिना झाला आहे. यंदा कधी नव्हे तो नियमित वेळेपेक्षा तीन दिवस आगोदरच मान्सूनचे आगमन झाले होते. त्यामुळे सर्वकाही वेळेत होईल असा अंदाज होता. मात्र, त्यानंतरच्या काळात राज्यात पावसाचा आणि (Kharif Sowing) खरीप पेरण्यांचा असा काय वेग मंदावला आहे त्यामुळे सरासरीएवढाही पेरा झालेला नाही. (Maharashtra) राज्यात 20 लाख हेक्टरावर पेरा झाला असून सरासरीच्या तुलनेत केवळ 35 टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने हजेरी लावल्याने आता कुठे शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवली आहे. आगमनापासून मान्सूनची कोकणावर कृपादृष्टी राहिली असून आजही ती कायम आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह कोकणात पावसाची संततधार सुरु आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात देखील पावसाने हजेरी लावल्याने रखडलेल्या खरीप पेरण्या आता वेगात होत आहेत.

मुंबई शहरासह उपनगरात पाऊस

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईसह उपनगरात पावसाने हजेरी लावलेली आहे. सततच्या संततधारेमुळे सखल भागात पाणी साचले आहे तर कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुंबई आणि आसपासच्या प्रदेशाला हवामान खात्याकडनं ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. उर्वरित राज्यात देखील पावसाने हजेरी लावल्याने रखडलेल्या खरीप पेरण्यांनी आता वेग घेतला आहे. त्यामुळेन मान्सूनचे आगमन होऊन महिना उलटल्यानंतर आता कुठे सर्वकाही सुरळीत होऊ लागले आहे.

काय आहे पेरणीची स्थिती?

राज्यात अपेक्षित पाऊस झाला नसताना देखील 20 लाख हेक्टरावर खरीप हंगामातील पेरण्या झाल्या आहेत. सरासरीच्या तुलनेत केवळ 20 टक्के पेरण्या झाल्या आहेत. राज्यात पेरण्यांचा टक्का घसरला असला तरी पावसाचा अंदाज घेऊनच शेतकरी पेरणीचा निर्णय घेत असल्याने दुबारचे संकट नसल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट केले आहे. शिवाय पेरण्या उशीराने झाल्याने उत्पादनावर परिणाम होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी 15 जुलैपर्यंत खरिपाचा पेरा केला तरी उत्पादन घटणार नाही. आगामी 15 दिवसांमध्ये पेरणी क्षेत्रात वाढ होईल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील उत्तर महाराष्ट्र, कोकण या विभागात अधिकच्या क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. खरीप हंगामात सोयाबीन, कापूस, धान, कडधान्य ही मुख्य पीके आहेत.

हे सुद्धा वाचा

15 दिवसांमध्ये वाढणार पेरणीचा टक्का

आतापर्यंत खरीप पेरणीचा टक्का घसरलेलाच आहे. खरीप हंगाम हा पूर्णत: पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनीही मान्सूनचा अंदाज घेऊनच चाढ्यावर मूठ ठेवली आहे. आता सबंध राज्यात पाऊस सक्रीय होत आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या विभागामध्येही पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे आगामी 15 दिवसांमध्ये सरासरी एवढा पेरा होईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें