फक्त 15 हजारांचा खर्च, 3 महिन्यात 3 लाखांची कमाई, फक्त एका व्यवसायाने व्हाल मालामाल, लगेचच सोडाल नोकरी
तुळस लागवड हा एक फायदेशीर व्यवसाय आहे. कमी गुंतवणुकीत, फक्त ३ महिन्यांत यातून चांगला नफा मिळवता येतो. रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी तुळस सध्या जागतिक बाजारात खूप मागणीत आहे.

तुळस ही केवळ एक पवित्र वनस्पती नाही, तर तिच्यातील आयुर्वेदिक आणि औषधी गुणधर्मांमुळे आज जागतिक बाजारपेठेत तिला मोठी मागणी आहे. कोरोना काळानंतर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या नैसर्गिक उत्पादनांबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढली आहे. यामुळे अनेक लोक हे तुळशीच्या रोपाकडे व्यवसायाची संधी म्हणून पाहत आहेत. तुळशीची लागवड कमी खर्चात सुरू करता येते. विशेष म्हणजे साधारण ३ महिन्यांत म्हणजे अगदी कमी वेळेत यातून तुम्हाला चांगले उत्पन्न मिळू शकते.
तुळशीची लागवड करण्यासाठी कंत्राटी शेती हा सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर मार्ग आहे. डाबर, वैद्यनाथ, पतंजली यांसारख्या अनेक आयुर्वेदिक कंपन्या शेतकऱ्यांशी करार करून तुळशीची लागवड करून घेतात. यामुळे उत्पादनाची विक्री निश्चित होते. तसेच बाजारपेठेतील किमतीच्या चढउताराचा धोका कमी होतो. एका अंदाजानुसार, प्रति एकर तुळशीच्या लागवडीसाठी सुमारे १५ हजार रुपये खर्च येतो. तर, ३ महिन्यांच्या कालावधीत, एका एकरातून सरासरी ३ लाख रुपयांपर्यंत नफा मिळू शकतो. हा नफा तुळशीचा प्रकार, व्यवस्थापन आणि काढलेल्या उत्पादनावर अवलंबून असतो.
तुळशीचा वापर करुन करा व्यवसाय
तुळशीचे पीक साधारणपणे ३ महिन्यांत काढणीसाठी तयार होते. तुळशीची पाने, बियाणे आणि तेल विकून शेतकरी कमाई करू शकतात. तुळस हे रसायनमुक्त शेतीसाठी आदर्श आहे. सेंद्रिय तुळस उत्पादनांना बाजारात जास्त किंमत मिळते, ज्यामुळे नफ्याचे प्रमाण वाढते. तुळशीचा कच्चा माल खरेदी करून किंवा स्वतः लागवड करून, त्यावर प्रक्रिया करून अनेक लहान-मोठे व्यवसाय सुरू करता येतात. शेतीव्यतिरिक्त तुळशीपासून चहा, तेल, साबण, क्रीम आणि धूप यांसारखी उत्पादने तयार करता येतात. अगदी लहान स्तरावर प्रक्रिया व्यवसाय सुरू करता येतो. यातून लक्षणीय नफा मिळवता येतो.
३ महिन्यात करु शकता कापणी
तुळशीच्या लागवडीसाठी जुलै महिना सर्वोत्तम मानला जातो. तुळशीची लागवड जवळजवळ सर्व प्रकारच्या मातीत करता येते, परंतु पाण्याचा निचरा होणारी जमीन उत्तम असली पाहिजे. या पिकाला पाण्याची आवश्यकता खूप कमी लागते. पीक लावल्यानंतर साधारण ९० ते १२० दिवसांत पहिली कापणी करता येते. रोपांवर फुले येण्यास सुरुवात झाल्यास कापणी करणे अधिक फायदेशीर ठरते. कारण या वेळेस पानांमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते. तुळस हे एक बहुगुणी आणि बहुपयोगी पीक आहे. कमी गुंतवणूक, कमी श्रम आणि बाजारात मोठी मागणी असल्याने तुळशीची शेती आणि त्यावर आधारित उत्पादनांचा व्यवसाय नवीन उद्योजकांसाठी फायद्याचा ठरतो.
